iPhone 15 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Apr 2023 12:42:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/ https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/#respond Thu, 20 Apr 2023 12:42:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20406 काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple […]

The post लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यावर्षीच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुपनं बनवलेले iPhone मार्केटमध्ये येऊ शकतात.
  • लवकरच टाटा बेंगळुरू मधील मॅनुफॅक्चरींग प्लांट विकत घेऊ शकते.
  • प्लांट विकत घेण्यासाठी 5000 कोटी रुपयांचा सौदा केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple products चं प्रोडक्शन सुरु केलं जाऊ शकतं.

अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स बनवू शकते टाटा

समोर आलेल्या माहितीनुसार Tata Sons आणि Wistron दरम्यान होणार सौदा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि टाटा ग्रुप्स लवकरच या सौद्यावर शिक्कामोर्तब करू शकतो. रिपोर्टनुसार बेंगळुरूमधील विस्ट्रॉन प्लांट खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप्सकडून 5 हजार कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, जी तैवानची कंपनी स्वीकारू शकते. या प्लांटमध्ये सध्या Apple iPhone 14 आणि iPhone 12 मॉडेल्सची निर्मिती होत आहे.

बातमी आहे की टाटा आणि विस्ट्रॉनची ही डील येत्या महिन्यात पूर्ण होईल ज्यामुळे सप्टेंबर 2023 पासून या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा कारभार टाटा ग्रुप्सद्वारे सांभाळला जाईल. विशेष म्हणजे यामुळे पहिल्यांदाच एखादी भारतीय कंपनी अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स व आयफोन्सची निर्मिती करेल. याआधी भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट बनू लागले होते परंतु सर्व कारभार परदेशी कंपन्यांकडे होता.

टाटाचे आयफोन

जवळपास 44 एकरमध्ये पसरलेल्या विस्ट्रॉन प्लांटमध्ये 8 असेंबली लाइन्स आहेत ज्यावर सध्या आयफोन 12 सीरीज तसेच आयफोन 14 सीरीजचे मोबाइल फोन्स बनवले जात आहेत. जर हे फोन मॉडेल डिस्कंटिन्यू नाही झाले तर आपल्याला टाटा द्वारे निर्मित आयफोन 12 आणि आयफोन 14 मॉडेल्स बाजारात दिसू शकतात. फक्त इतकेच नव्हे तर आगामी Apple iPhone 15 चे मॉडेल्स देखील भारतात Tata द्वारे बनवले जाऊ शकतात.

Apple करेल 6,300 कोटींची गुंतवणूक

रिपोर्टनुसार Tata Sons Chairman N Chandrasekaran यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत Apple CEO Tim Cook यांची भेट घेतली होती आणि भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सच्या निर्मिती आणि विक्रीवर चर्चा केली होती. अ‍ॅप्पल कंपनी तमिळनाडुमधील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये 6,300 कोटी रुपयांचा गुंतवणूक करण्याची योजना बनवत असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रोजेक्ट अंतगर्त जून पासून टाटाच्या प्लांटवर देखील अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सची निर्मिती केली जाऊ शकते.

The post लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-to-start-manufacture-iphones-in-india-after-buying-wistron-plant/feed/ 0
बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग https://www.91mobiles.com/marathi/old-apple-iphones-could-discountinues-before-iphone-15-series-launch/ https://www.91mobiles.com/marathi/old-apple-iphones-could-discountinues-before-iphone-15-series-launch/#respond Tue, 18 Apr 2023 07:20:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20316 Apple iPhone 15 series ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्यावर्षी आयफोन 14 सीरीजसह कंपनीनं आपल्या डिस्प्ले डिजाइनमध्ये मोठा बदल केला होता आणि आता आयफोन 15 मध्ये देखील मोबाइल युजर नवीन अपडेटची अपेक्षा ठेवून आहेत. सध्या नवीन सीरीजच्या लाँचची जास्त माहिती तर मिळाली नाही परंतु एका ताज्या रिपोर्टमधून समोर आलं आहे की आयफोन 15 सीरीज […]

The post बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Apple चे अनेक जुने आयफोन डिस्कंटीन्यू होऊ शकतात.
  • हे मॉडेल iPhone 15 सीरीज आल्यामुळे बंद होऊ शकतात.
  • यात iPhone 12 पासून 14 Pro Max पर्यंतचा समावेश आहे.

Apple iPhone 15 series ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्यावर्षी आयफोन 14 सीरीजसह कंपनीनं आपल्या डिस्प्ले डिजाइनमध्ये मोठा बदल केला होता आणि आता आयफोन 15 मध्ये देखील मोबाइल युजर नवीन अपडेटची अपेक्षा ठेवून आहेत. सध्या नवीन सीरीजच्या लाँचची जास्त माहिती तर मिळाली नाही परंतु एका ताज्या रिपोर्टमधून समोर आलं आहे की आयफोन 15 सीरीज येण्यापूर्वी अनेक जुने iPhones डिस्कंटीन्यू म्हणजे बंद होणार आहेत.

जे आयफोन होऊ शकतात डिस्कंटीन्यू

परदेशी वेबसाइट टॉम्स गाइडनं रिपोर्ट पब्लिश करत सांगितलं आहे की अ‍ॅप्पल कंपनी आपल्या iPhone 15 series च्या लाँचपूर्वी अनेक जुने आयफोन मॉडेल्स डिस्कंटीन्यू करू शकते. थक्क करणारी बाब म्हणजे यात फक्त त्या आयफोन्सचा समावेश नाही जे काही वर्षांपूर्वी लाँच झाले आहेत. तर असे मॉडेल पण आहेत ज्यांनी गेल्यावर्षीच मार्केटमध्ये एंट्री घेतली होती. रिपोर्टनुसार डिस्कंटीन्यू होणारे आयफोन पुढील प्रमाणे आहेत :

  • Apple iPhone 12
  • Apple iPhone 13 mini
  • Apple iPhone 14 Pro
  • Apple iPhone 14 Pro Max

अ‍ॅप्पल आयफोन 15 सीरीज

Apple iPhone 15 series बद्दल कंपनीनं आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही परंतु लीक्स व रिपोर्ट्सनुसार या सीरीजमध्ये 4 मोबाइल फोन येऊ शकतात. यातील बेस मॉडेल iPhone 15 असू शकतो तसेच iPhone 15 Plus देखील येऊ शकतो. तसेच सीरीजमध्ये दोन प्रो मॉडेलचा समावेश केला जाऊ शकतो जे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max नावाने लाँच होऊ शकतात.

रिपोर्टनुसार आयफोन 15 सीरीजच्या या मॉडेल्समध्ये वेगवेगळे प्रोसेसर दिला जाऊ शकतो. iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये Bionic A16 चिपसेट मिळू शकतो असं लीकमध्ये समोर आलं आहे. तसेच iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये Bionic A17 चिपसेट दिला जाऊ शकतो. या चारही अ‍ॅप्पल फोन्समध्ये iOS 17 मिळू शकतो जो कंपनी येत्या काही दिवसांत सादर करू शकते.

The post बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/old-apple-iphones-could-discountinues-before-iphone-15-series-launch/feed/ 0