बंद होऊ शकतात हे आयफोन मॉडेल्स; iPhone 15 series च्या लाँचपूर्वी Apple बनवत आहे नवीन प्लॅनिंग

Highlights

  • Apple चे अनेक जुने आयफोन डिस्कंटीन्यू होऊ शकतात.
  • हे मॉडेल iPhone 15 सीरीज आल्यामुळे बंद होऊ शकतात.
  • यात iPhone 12 पासून 14 Pro Max पर्यंतचा समावेश आहे.

Apple iPhone 15 series ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्यावर्षी आयफोन 14 सीरीजसह कंपनीनं आपल्या डिस्प्ले डिजाइनमध्ये मोठा बदल केला होता आणि आता आयफोन 15 मध्ये देखील मोबाइल युजर नवीन अपडेटची अपेक्षा ठेवून आहेत. सध्या नवीन सीरीजच्या लाँचची जास्त माहिती तर मिळाली नाही परंतु एका ताज्या रिपोर्टमधून समोर आलं आहे की आयफोन 15 सीरीज येण्यापूर्वी अनेक जुने iPhones डिस्कंटीन्यू म्हणजे बंद होणार आहेत.

जे आयफोन होऊ शकतात डिस्कंटीन्यू

परदेशी वेबसाइट टॉम्स गाइडनं रिपोर्ट पब्लिश करत सांगितलं आहे की अ‍ॅप्पल कंपनी आपल्या iPhone 15 series च्या लाँचपूर्वी अनेक जुने आयफोन मॉडेल्स डिस्कंटीन्यू करू शकते. थक्क करणारी बाब म्हणजे यात फक्त त्या आयफोन्सचा समावेश नाही जे काही वर्षांपूर्वी लाँच झाले आहेत. तर असे मॉडेल पण आहेत ज्यांनी गेल्यावर्षीच मार्केटमध्ये एंट्री घेतली होती. रिपोर्टनुसार डिस्कंटीन्यू होणारे आयफोन पुढील प्रमाणे आहेत :

  • Apple iPhone 12
  • Apple iPhone 13 mini
  • Apple iPhone 14 Pro
  • Apple iPhone 14 Pro Max

अ‍ॅप्पल आयफोन 15 सीरीज

Apple iPhone 15 series बद्दल कंपनीनं आतापर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही परंतु लीक्स व रिपोर्ट्सनुसार या सीरीजमध्ये 4 मोबाइल फोन येऊ शकतात. यातील बेस मॉडेल iPhone 15 असू शकतो तसेच iPhone 15 Plus देखील येऊ शकतो. तसेच सीरीजमध्ये दोन प्रो मॉडेलचा समावेश केला जाऊ शकतो जे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max नावाने लाँच होऊ शकतात.

रिपोर्टनुसार आयफोन 15 सीरीजच्या या मॉडेल्समध्ये वेगवेगळे प्रोसेसर दिला जाऊ शकतो. iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये Bionic A16 चिपसेट मिळू शकतो असं लीकमध्ये समोर आलं आहे. तसेच iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये Bionic A17 चिपसेट दिला जाऊ शकतो. या चारही अ‍ॅप्पल फोन्समध्ये iOS 17 मिळू शकतो जो कंपनी येत्या काही दिवसांत सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here