लवकरच येऊ शकतात Tata नी बनवलेले iPhone! होणार आहे 5,000 कोटींची डील

Highlights

  • यावर्षीच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुपनं बनवलेले iPhone मार्केटमध्ये येऊ शकतात.
  • लवकरच टाटा बेंगळुरू मधील मॅनुफॅक्चरींग प्लांट विकत घेऊ शकते.
  • प्लांट विकत घेण्यासाठी 5000 कोटी रुपयांचा सौदा केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की टाटा कंपनी भारतात अ‍ॅप्पल आयफोन्सची निर्मिती करू शकते आणि आपल्याला भारतीय कंपनीनं बनवलेले मेड इन इंडिया आयफोन्स मिळू शकतात. याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे की Tata Group लवकरच तैवानच्या Wistron या टेक कंपनीचा बेंगळुरूमधील प्लांट खरेदी करू शकतो आणि तसेच iPhone 15 सह अन्य आयफोन्स आणि Apple products चं प्रोडक्शन सुरु केलं जाऊ शकतं.

अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स बनवू शकते टाटा

समोर आलेल्या माहितीनुसार Tata Sons आणि Wistron दरम्यान होणार सौदा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि टाटा ग्रुप्स लवकरच या सौद्यावर शिक्कामोर्तब करू शकतो. रिपोर्टनुसार बेंगळुरूमधील विस्ट्रॉन प्लांट खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप्सकडून 5 हजार कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, जी तैवानची कंपनी स्वीकारू शकते. या प्लांटमध्ये सध्या Apple iPhone 14 आणि iPhone 12 मॉडेल्सची निर्मिती होत आहे.

बातमी आहे की टाटा आणि विस्ट्रॉनची ही डील येत्या महिन्यात पूर्ण होईल ज्यामुळे सप्टेंबर 2023 पासून या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा कारभार टाटा ग्रुप्सद्वारे सांभाळला जाईल. विशेष म्हणजे यामुळे पहिल्यांदाच एखादी भारतीय कंपनी अ‍ॅप्पल प्रोडक्ट्स व आयफोन्सची निर्मिती करेल. याआधी भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट बनू लागले होते परंतु सर्व कारभार परदेशी कंपन्यांकडे होता.

टाटाचे आयफोन

जवळपास 44 एकरमध्ये पसरलेल्या विस्ट्रॉन प्लांटमध्ये 8 असेंबली लाइन्स आहेत ज्यावर सध्या आयफोन 12 सीरीज तसेच आयफोन 14 सीरीजचे मोबाइल फोन्स बनवले जात आहेत. जर हे फोन मॉडेल डिस्कंटिन्यू नाही झाले तर आपल्याला टाटा द्वारे निर्मित आयफोन 12 आणि आयफोन 14 मॉडेल्स बाजारात दिसू शकतात. फक्त इतकेच नव्हे तर आगामी Apple iPhone 15 चे मॉडेल्स देखील भारतात Tata द्वारे बनवले जाऊ शकतात.

Apple करेल 6,300 कोटींची गुंतवणूक

रिपोर्टनुसार Tata Sons Chairman N Chandrasekaran यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत Apple CEO Tim Cook यांची भेट घेतली होती आणि भारतात अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सच्या निर्मिती आणि विक्रीवर चर्चा केली होती. अ‍ॅप्पल कंपनी तमिळनाडुमधील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये 6,300 कोटी रुपयांचा गुंतवणूक करण्याची योजना बनवत असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रोजेक्ट अंतगर्त जून पासून टाटाच्या प्लांटवर देखील अ‍ॅप्पल प्रोडक्ट्सची निर्मिती केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here