iPhone SE 2020 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 14 Oct 2020 14:16:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-iphone-xr-se-2020-price-cut-in-india-after-12-series-launch/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-iphone-xr-se-2020-price-cut-in-india-after-12-series-launch/#respond Wed, 14 Oct 2020 14:16:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8518 प्राइस कट नंतर बाजारात उपलब्ध असलेले Apple iPhones कमी किंमतीत विकत घेता येतील.

The post Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने खूप प्रतीक्षेनंतर काल रात्री आपली ‘आयफोन 12’ सीरीज सादर केली आहे. कंपनीने एक साथ 4 नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत जे Apple iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हे चारही फोन्स 5G ला सपोर्ट करतात. ऍप्पलने आयफोन 12 सीरीज भारतात ऑफिशियल केली आहे आणि प्राइस व सेल डेटची घोषणा पण झाली आहे. नेहमीपरामें यावेळी पण नवीन iPhone सीरीज येताच ऍप्पलने आपल्या जुन्यात आयफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. या प्राइस कट नंतर बाजारात उपलब्ध असलेले Apple iPhones कमी किंमतीत विकत घेता येतील.

Apple iPhone 11

सर्वप्रथम ऍप्पल आयफोन 11 सीरीज पाहता भारतात Apple iPhone 11 तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनचा बेस वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 128 जीबी स्टोरेज आणि तिसऱ्या वेरिएंट मध्ये 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ऍप्पलने या आयफोनच्या किंमतीत जवळपास 15,000 रुपयांची मोठी कपात केली आहे.

iPhone 11 चा 64 जीबी स्टोरेज मॉडेल आतापर्यंत 68,300 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण प्राइस कट नंतर या मॉडेलची किंमत कमी होऊन 54,900 रुपये झाली आहे. तसेच Apple iPhone 11 ची किंमत 73,600 रुपये होती लेककिंमत कमी झाल्यानंतर या मॉडेलची किंमत 59,900 रुपये झाली आहे. 256 जीबी स्टोरेज असलेला iPhone 11 बाजारात 84,100 रुपयांमध्ये विकला जात होता, लपरंतु किंमतीत कपातीनंतर या मॉडेलची प्राइस 69,900 रुपये झाली आहे.

Apple iPhone SE 2020

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या ऍप्पल आयफोन एसई 2020 ची किंमत पण कंपनीने कमी केली आहे. विशेष म्हणजे हा आयफोन आधीच ऍप्पलच्या सर्वात स्वस्त मोबाईल फोन्स पैकी एक होता, आता कंपनीने 3,500 रुपयांच्या आसपास किंमत कमी करून हा iPhone अजून अफॉर्डेबल बनवला आहे. हा फोन तीन मॉडेल्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

iPhone SE 2020 चा बेस मॉडेल 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या मॉडेलची किंमत 42,500 होती जी किंमतीत कपात झाल्यामुळे कमी होऊन 39,900 रुपये झाली आहे. तसेच आयफोन एसई 2020 चा दुसरा मॉडेल 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मॉडेल 47,800 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता पण आता प्राइस कटनंतर हा 44,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 256 जीबी स्टोरेज असलेल्या Apple iPhone SE 2020 ची किंमत पण 58,300 रुपयांवरून 54,900 रुपये करण्यात आली आहे.

Apple iPhone XR

iPhone 12 सीरीज लॉन्च केल्यानंतर ऍप्पलने गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या iPhone XR च्या किंमतीत पण कपात केली आहे. आयफोन एक्सआर चा 64 जीबी स्टोरेज मॉडेल आधी 52,500 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण प्राइस कट नंतर या मॉडेलची किंमत 47,900 रुपये झाली आहे. तसेच Apple iPhone XR के 128 जीबी मेमरी मॉडेलची किंमत आधी 57,800 रुपये होती, आता या फोनची किंमत कमी होऊन 52,900 रुपये झाली आहे.

The post Apple चा मास्टर स्ट्रोक, कमी केली iPhone 11, iPhone SE 2020 आणि iPhone XR ची किंमत, 14 हजारांपर्यंत कमी झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-iphone-xr-se-2020-price-cut-in-india-after-12-series-launch/feed/ 0
iPhone SE 2020 लॉन्च नंतर ऍप्पलने बंद केले iPhone 8 आणि iPhone 8 Plus https://www.91mobiles.com/marathi/apple-stops-selling-iphone-8-iphone-8-plus/ https://www.91mobiles.com/marathi/apple-stops-selling-iphone-8-iphone-8-plus/#respond Thu, 16 Apr 2020 10:43:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7122 iPhone 8 आणि 8 Plus नंतर तेव्हा कंपनीने iPhone 7 आणि iPhone 7 Plus बंद केले होते. विशेष म्हणजे Apple ने iPhone SE 2020 शानदार हार्डवेयर सह तीन वर्ष जुन्या डिजाइन सह सादर केला आहे.

The post iPhone SE 2020 लॉन्च नंतर ऍप्पलने बंद केले iPhone 8 आणि iPhone 8 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने बुधवारी आपला बहुप्रतीक्षित iPhone SE 2020 लॉन्च केला आहे. Apple ने नवीन iPhone च्या लॉन्च नंतर लगेचच iPhone 8 आणि iPhone 8 Plus बंद केले आहेत. यात आश्चर्यकारक असे काही नाही कारण iPhone SE 2020 मुळात iPhone 8 चा अपग्रेडेड वर्जन आहे असे म्हणता येईल.

MacRumours च्यानुसार, हे फोन्स आता Apple विकणार नाही पण निवडक ई-कॉमर्स वेबसाईट्स जसे कि अमेझॉन, फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध होतील आणि काही ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून विकले जातील. ऍप्पलच्या इंडियन वेबसाइट वरून पण iPhone 8 सीरीज काढून टाकण्यात आली आहे.

कंपनीने iPhone 8, iPhone 8 Plus सप्टेंबर 2017 मध्ये फ्लॅगशिप फोन iPhone X सह सादर केला होता. iPhone 8 आणि 8 Plus नंतर तेव्हा कंपनीने iPhone 7 आणि iPhone 7 Plus बंद केले होते. विशेष म्हणजे Apple ने iPhone SE 2020 शानदार हार्डवेयर सह तीन वर्ष जुन्या डिजाइन सह सादर केला आहे.

Apple iPhone SE च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याची किंमत 42,500 रुपयांपासून सुरु होत आहे जी 64GB वेरिएंटची आहे. 128GB वेरिएंटची किंमत Rs 47,800 आणि 256GB वेरिएंटची किंमत 58,300 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर मध्ये विकत घेता येईल.

Apple iPhone SE 2020 कंपनीने ऍप्पलच्या लेटेस्ट आईओएस 13 वर लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे कि हि जगातील सर्वाधिक सिक्योर आणि खाजगी मोबाईल आपरेटिंग सिस्टम आहे जी खूप फीचर्स सह येते. तसेच प्रोसेसिंगसाठी आईफोन एसई 2020 मध्ये A13 Bionic चिपसेट देण्यात आला आहे जो तिसऱ्या जनरेशनचा आहे. या चिपसेटमुळे नवीन iPhone SE लॅग फ्री वर स्मूद चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Apple iPhone SE 2020 सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी ट्रू टोन फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी आईफोन एसई 2020 एफ/2.2 अपर्चर असलेला 7 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आईफोन एसई चा कॅमेरा एचडीआर, पोर्टरेट मोड, डेफ्थ कंट्रोल सारख्या फोटो फीचर्स सोबतच स्लोमोशन, टाईम लॅप्स आणि 4के वीडियो रिकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

Apple iPhone SE 2020 कंपनीने आईपी67 रेटिंग सह सादर केला आहे जी याला धूळ व पाण्यापासून वाचवते. फोनची बॅटरी 18वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. खास बाब अशी कि हा फोन वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

The post iPhone SE 2020 लॉन्च नंतर ऍप्पलने बंद केले iPhone 8 आणि iPhone 8 Plus first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-stops-selling-iphone-8-iphone-8-plus/feed/ 0