Apple ने बुधवारी आपला बहुप्रतीक्षित iPhone SE 2020 लॉन्च केला आहे. Apple ने नवीन iPhone च्या लॉन्च नंतर लगेचच iPhone 8 आणि iPhone 8 Plus बंद केले आहेत. यात आश्चर्यकारक असे काही नाही कारण iPhone SE 2020 मुळात iPhone 8 चा अपग्रेडेड वर्जन आहे असे म्हणता येईल.
MacRumours च्यानुसार, हे फोन्स आता Apple विकणार नाही पण निवडक ई-कॉमर्स वेबसाईट्स जसे कि अमेझॉन, फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध होतील आणि काही ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून विकले जातील. ऍप्पलच्या इंडियन वेबसाइट वरून पण iPhone 8 सीरीज काढून टाकण्यात आली आहे.
कंपनीने iPhone 8, iPhone 8 Plus सप्टेंबर 2017 मध्ये फ्लॅगशिप फोन iPhone X सह सादर केला होता. iPhone 8 आणि 8 Plus नंतर तेव्हा कंपनीने iPhone 7 आणि iPhone 7 Plus बंद केले होते. विशेष म्हणजे Apple ने iPhone SE 2020 शानदार हार्डवेयर सह तीन वर्ष जुन्या डिजाइन सह सादर केला आहे.
Apple iPhone SE च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याची किंमत 42,500 रुपयांपासून सुरु होत आहे जी 64GB वेरिएंटची आहे. 128GB वेरिएंटची किंमत Rs 47,800 आणि 256GB वेरिएंटची किंमत 58,300 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर मध्ये विकत घेता येईल.
Apple iPhone SE 2020 कंपनीने ऍप्पलच्या लेटेस्ट आईओएस 13 वर लॉन्च केला आहे. कंपनीचा दावा आहे कि हि जगातील सर्वाधिक सिक्योर आणि खाजगी मोबाईल आपरेटिंग सिस्टम आहे जी खूप फीचर्स सह येते. तसेच प्रोसेसिंगसाठी आईफोन एसई 2020 मध्ये A13 Bionic चिपसेट देण्यात आला आहे जो तिसऱ्या जनरेशनचा आहे. या चिपसेटमुळे नवीन iPhone SE लॅग फ्री वर स्मूद चालेल.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Apple iPhone SE 2020 सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी ट्रू टोन फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी आईफोन एसई 2020 एफ/2.2 अपर्चर असलेला 7 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आईफोन एसई चा कॅमेरा एचडीआर, पोर्टरेट मोड, डेफ्थ कंट्रोल सारख्या फोटो फीचर्स सोबतच स्लोमोशन, टाईम लॅप्स आणि 4के वीडियो रिकॉर्ड करण्यास सक्षम आहे.
Apple iPhone SE 2020 कंपनीने आईपी67 रेटिंग सह सादर केला आहे जी याला धूळ व पाण्यापासून वाचवते. फोनची बॅटरी 18वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. खास बाब अशी कि हा फोन वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो.















