iQOO 11 Legend - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Jul 2023 07:34:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB रॅम असलेल्या iQOO 11 Legend च्या किंमतीत झाली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-gets-a-price-cut-of-rs-7000/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-gets-a-price-cut-of-rs-7000/#respond Tue, 04 Jul 2023 07:34:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21879 iQOO च्या फ्लॅगशिप फोन iQOO 11 Legend च्या किंमतीत कपात झाली आहे. फोन कंपनी यावर्षीच्या सुरवातीला लाँच केला होता. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो. ह्यात तुम्हाला चांगल्या कॅमेऱ्यासह 144Hz डिस्प्ले, 16GB जीबी पर्यंत रॅम, 120 वॉट फ्लॅशचार्ज इत्यादी मिळतात. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर आता चांगली संधी आहे. […]

The post 16GB रॅम असलेल्या iQOO 11 Legend च्या किंमतीत झाली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO 11 Legend वर 7000 रुपयांपर्यंतची सूट.
  • स्मार्टफोन 8GB/16GB रॅम व 256GB स्टोरेज मध्ये उपलब्ध.
  • फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी.

iQOO च्या फ्लॅगशिप फोन iQOO 11 Legend च्या किंमतीत कपात झाली आहे. फोन कंपनी यावर्षीच्या सुरवातीला लाँच केला होता. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो. ह्यात तुम्हाला चांगल्या कॅमेऱ्यासह 144Hz डिस्प्ले, 16GB जीबी पर्यंत रॅम, 120 वॉट फ्लॅशचार्ज इत्यादी मिळतात. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर आता चांगली संधी आहे. कारण ह्यावर तुम्हाला चांगली डील मिळेल.

iQOO 11 Legend ची नवीन किंमत

iQOO नं iQOO 11 Legend स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे, ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 256GB स्टोरेजचा समावेश आहे. ह्या व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 61,999 रुपये आणि 66,999 रुपये आहे. प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत आता 7,000 रुपयांची कपात झाली आहे. ग्राहक आता 8GB व्हेरिएंट 54,999 रुपये आणि 16GB व्हेरिएंट 59,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कंपनी आयसीआयसीआय बँक कार्डवर 3,000 रुपयांची इन्स्टंट सूट आणि 15 दिवसांची रिप्लेसमेंट देखील ऑफर करत आहे.

आयकू 11 लीजेंड स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच 2K डिस्प्ले आहे, जो 144Hz च्या हाय रिफ्रेश रेटसह सॅमसंग E6 टेक्नॉलॉजीचा वापर करतो. पॅनल एचडीआर 10+ सपोर्टसह येतो आणि 1800 निट्सची पीक ब्राइटनेस देऊ शकतो. चांगल्या व्हिज्युअल्ससाठी ह्यात डेडिकेटेड V2 चिप आहे.

  • प्रोसेसर : iQOO 11 लीजेंडमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आहे.
  • रॅम-स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये 8GB/16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, युजर्सकडे 3GB पर्यंत अतिरिक्त रॅम वाढवण्याचा पर्यायही आहे.
  • बॅटरी-चार्जिंग : स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी आहे. जी फक्त 8 मिनट मध्ये 50% पर्यंत चार्ज होते.
  • कॅमेरा : फोनमध्ये 50MP GN5 प्रायमरी सेन्सर, 13MP टेलीफोटो आणि पोर्ट्रेट कॅमेरा, सह 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे.

    The post 16GB रॅम असलेल्या iQOO 11 Legend च्या किंमतीत झाली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-gets-a-price-cut-of-rs-7000/feed/ 0 16GB RAM सह येऊ शकतो iQOO 11 Legend; टिपस्टरनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-ram-and-storage-revealed-exclusive-news/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-ram-and-storage-revealed-exclusive-news/#respond Thu, 17 Nov 2022 05:15:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15032 iQOO 11 सोबतच कंपनी आपल्या फ्लॅगशिप मॉडेल iQOO 11 Legend वर काम करत आहे, ज्याची माहिती 91mobiles ला एक्सक्लूसिव्हली टिप्सटर Sudhanshu कडून मिळाली आहे. आम्हाला या आगामी फोनच्या RAM आणि storage व्हेरिएंट विषयी सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार iQOO 11 Legend कंपनी 16GB RAM आणि 256GB सह सादर करेल. या स्मार्टफोनचे अन्य रॅम आणि स्टोरेज […]

    The post 16GB RAM सह येऊ शकतो iQOO 11 Legend; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    iQOO 11 सोबतच कंपनी आपल्या फ्लॅगशिप मॉडेल iQOO 11 Legend वर काम करत आहे, ज्याची माहिती 91mobiles ला एक्सक्लूसिव्हली टिप्सटर Sudhanshu कडून मिळाली आहे. आम्हाला या आगामी फोनच्या RAM आणि storage व्हेरिएंट विषयी सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार iQOO 11 Legend कंपनी 16GB RAM आणि 256GB सह सादर करेल. या स्मार्टफोनचे अन्य रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट लाँच होतील की नाही याविषयी ठोस माहिती मात्र मिळाली नाही. विशेष म्हणजे फोन सर्वप्रथम एशियन मार्केटमध्ये लाँच केला जाईल.

    भारतात येऊ शकतो iQOO 11 Legend

    नावावरून समजतंय की iQOO 11 लेजेंड सीरीजमध्ये टॉप-एन्ड व्हर्जन असेल आणि हा फोन भारतात देखील हा लाँच केला जाऊ शकतो. फोनबाबत आतापर्यंत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, iQOO 11 सीरीज कथितरित्या जानेवारी 2023 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे आणि iQOO 11 लीजेंड देखील त्याचवेळी सादर केला जाऊ शकतो. हा हँडसेट सध्या भारतात असलेल्या iQOO 9 सीरीजचा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत आला Oppo चा 108MP कॅमेरा असलेला 5G Phone; फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच

    iQOO 10

    iQOO 11 specifications (संभाव्य)

    iQOO 11: या सीरीजमध्ये एंट्री-लेव्हल iQOO 11 मध्ये 6.78-इंचाचा FHD+ 144Hz डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये काल लाँच झालेला पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen2 SoC असू शकते. तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13MP UW, 12MP टेलीफोटो कॅमेरा आणि 16MP सेल्फी शूटर सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर चालू शकतो आणि यात 125W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

    iQOO 11 Pro: iQOO 11 Pro मध्ये नवीन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC सह 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो. फोनमध्ये कंपनीनं स्वतः बनवलेली V2 इमेज प्रोसेसिंग चिप मिळू शकते जी काही दिवसांपूर्वी लाँच झाली आहे. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच E6 AMOLED डिस्प्ले असू शकतो, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Oppo स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; अशी आहे ऑफर

    IQOO 11 Pro अँड्रॉइड 13 ओएसवर चालू शकतो. यात बीएमडब्ल्यू एम मोटरस्पोर्ट डिजाइन मिळू शकते. कॅमेऱ्यांसाठी iQOO 11 प्रो मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP सेकंडरी लेन्स, 48MP सेन्सर आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 32MP स्नॅपर मिळू शकतो. फोनमध्ये 200W चार्जिंग सपोर्ट असलेली 4,700mAh ची बॅटरी असू शकते, अशी चर्चा आहे.

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

    The post 16GB RAM सह येऊ शकतो iQOO 11 Legend; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-ram-and-storage-revealed-exclusive-news/feed/ 0