iQOO च्या फ्लॅगशिप फोन iQOO 11 Legend च्या किंमतीत कपात झाली आहे. फोन कंपनी यावर्षीच्या सुरवातीला लाँच केला होता. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो. ह्यात तुम्हाला चांगल्या कॅमेऱ्यासह 144Hz डिस्प्ले, 16GB जीबी पर्यंत रॅम, 120 वॉट फ्लॅशचार्ज इत्यादी मिळतात. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर आता चांगली संधी आहे. कारण ह्यावर तुम्हाला चांगली डील मिळेल.
iQOO 11 Legend ची नवीन किंमत
iQOO नं iQOO 11 Legend स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे, ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 256GB स्टोरेजचा समावेश आहे. ह्या व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 61,999 रुपये आणि 66,999 रुपये आहे. प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत आता 7,000 रुपयांची कपात झाली आहे. ग्राहक आता 8GB व्हेरिएंट 54,999 रुपये आणि 16GB व्हेरिएंट 59,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कंपनी आयसीआयसीआय बँक कार्डवर 3,000 रुपयांची इन्स्टंट सूट आणि 15 दिवसांची रिप्लेसमेंट देखील ऑफर करत आहे.
आयकू 11 लीजेंड स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच 2K डिस्प्ले आहे, जो 144Hz च्या हाय रिफ्रेश रेटसह सॅमसंग E6 टेक्नॉलॉजीचा वापर करतो. पॅनल एचडीआर 10+ सपोर्टसह येतो आणि 1800 निट्सची पीक ब्राइटनेस देऊ शकतो. चांगल्या व्हिज्युअल्ससाठी ह्यात डेडिकेटेड V2 चिप आहे.