16GB RAM सह येऊ शकतो iQOO 11 Legend; टिपस्टरनी दिली माहिती

iQOO 11 सोबतच कंपनी आपल्या फ्लॅगशिप मॉडेल iQOO 11 Legend वर काम करत आहे, ज्याची माहिती 91mobiles ला एक्सक्लूसिव्हली टिप्सटर Sudhanshu कडून मिळाली आहे. आम्हाला या आगामी फोनच्या RAM आणि storage व्हेरिएंट विषयी सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार iQOO 11 Legend कंपनी 16GB RAM आणि 256GB सह सादर करेल. या स्मार्टफोनचे अन्य रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट लाँच होतील की नाही याविषयी ठोस माहिती मात्र मिळाली नाही. विशेष म्हणजे फोन सर्वप्रथम एशियन मार्केटमध्ये लाँच केला जाईल.

भारतात येऊ शकतो iQOO 11 Legend

नावावरून समजतंय की iQOO 11 लेजेंड सीरीजमध्ये टॉप-एन्ड व्हर्जन असेल आणि हा फोन भारतात देखील हा लाँच केला जाऊ शकतो. फोनबाबत आतापर्यंत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, iQOO 11 सीरीज कथितरित्या जानेवारी 2023 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे आणि iQOO 11 लीजेंड देखील त्याचवेळी सादर केला जाऊ शकतो. हा हँडसेट सध्या भारतात असलेल्या iQOO 9 सीरीजचा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत आला Oppo चा 108MP कॅमेरा असलेला 5G Phone; फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच

iQOO 10

iQOO 11 specifications (संभाव्य)

iQOO 11: या सीरीजमध्ये एंट्री-लेव्हल iQOO 11 मध्ये 6.78-इंचाचा FHD+ 144Hz डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये काल लाँच झालेला पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen2 SoC असू शकते. तसेच फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13MP UW, 12MP टेलीफोटो कॅमेरा आणि 16MP सेल्फी शूटर सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर चालू शकतो आणि यात 125W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

iQOO 11 Pro: iQOO 11 Pro मध्ये नवीन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC सह 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो. फोनमध्ये कंपनीनं स्वतः बनवलेली V2 इमेज प्रोसेसिंग चिप मिळू शकते जी काही दिवसांपूर्वी लाँच झाली आहे. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच E6 AMOLED डिस्प्ले असू शकतो, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Oppo स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; अशी आहे ऑफर

IQOO 11 Pro अँड्रॉइड 13 ओएसवर चालू शकतो. यात बीएमडब्ल्यू एम मोटरस्पोर्ट डिजाइन मिळू शकते. कॅमेऱ्यांसाठी iQOO 11 प्रो मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP सेकंडरी लेन्स, 48MP सेन्सर आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 32MP स्नॅपर मिळू शकतो. फोनमध्ये 200W चार्जिंग सपोर्ट असलेली 4,700mAh ची बॅटरी असू शकते, अशी चर्चा आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here