iQOO 7 Legend - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Apr 2021 12:25:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/iqoo-7-legend-and-iqoo-7-launched-in-india-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-7-legend-and-iqoo-7-launched-in-india-price-and-specs/#respond Mon, 26 Apr 2021 12:25:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10699 iQOO 7 Legend आणि iQOO 7 दोन्ही स्मार्टफोन प्रीमियम आणि स्लीक डिजाइनसह सादर केले गेले आहेत.

The post iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा सबब्रँड iQOO ने भारतात आपली फ्लॅगशिप iQOO 7 सीरीज सादर केली आहे. कंपनीने या सीरीजचे दोन स्मार्टफोन iQOO 7 Legend आणि iQOO 7 भारतीय बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 5G कनेक्टक्टिविटी आणि लेटेस्ट स्नेपड्रेगन चिपसेटसह सादर केले गेले आहेत. iQOO 7 Legend स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला गेला आहे. तसेच iQOO 7 स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेटसह सादर केला गेला आहे. चिपसेट व्यतिरिक्त दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. इथे आम्ही तुम्हाला iQOO 7 Legend आणि iQOO 7 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत संपूर्ण माहिती देत आहोत. (iQOO 7 legend and iQOO 7 launched in India price and specs)

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : डिजाइन आणि लुक

iQOO 7 Legend आणि iQOO 7 दोन्ही स्मार्टफोन प्रीमियम आणि स्लीक डिजाइनसह सादर केले गेले आहेत. स्मार्टफोनचा बॅक पॅनल काचेपासून बनला आहे, जी AG matte काच आहे. कंपनीचा दावा आहे कि याच्या बॅक पॅनलमध्ये फिंगरप्रिंट आणि डाग दिसत नाहीत. तर iQOO 7 Legend स्मार्टफोन आइकॉनिक अवार्ड विनिंग डिजाइनसह सादर केला गेला आहे. फोनच्या मागे असलेला रेसिंग ट्रॅक या स्मार्टफोनचा सुपरलाइटनिंग परफॉर्मन्स दर्शवतो. फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात तीन कॅमेरा सेंसर आणि LED फ्लॅश मिळतो. तसेच फोनच्या डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

iQOO 7

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : डिस्प्ले

iQOO 7 Series च्या दोन्ही स्मार्टफोन QOO 7 Legend आणि iQOO 7 मध्ये 6.62 इंचाचा 2400×1080 AMOLED IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 300Hz आहे. iQOO 7 Series चे स्मार्टफोन HDR10 आणि HDR10+ हाई डायनमिक रेंज वडियो कंटेंट आणि विविड कलरला सपोर्टसह येतात. फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : परफॉर्मन्स

iQOO 7 Legend स्मार्टफोन कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच कंपनीने iQOO 7 मध्ये प्रीमियम मिड रेंज Snapdragon 870 चिपसेट दिला आहे. iQOO 7 Legend आणि iQOO 7 स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार चिपसेटसह ग्राफिक्ससाठी क्रमश: Adreno 660 GPU आणि Adreno 650 GPU दिला आहे. iQOO 7 सीरीज स्मार्टफोनमध्ये 66W फ्लॅशचार्ज सपोर्ट आहे. iQOO 7 Legend स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 22 मिनिटांत फुल चार्ज होते. तर iQOO 7 स्मार्टफोनमध्ये 4400mAh ची बॅटरी देण्यात आहे, जी 30 मिनिटांत फुल चार्ज होते.

iQOO 7 Camera

iQOO 7 सीरीज स्मार्टफोनमध्ये पावरफुल परफॉर्मन्ससाठी इंडस्ट्री लीडिंग कूलिंग सिस्टम आहे. iQOO 7 Legend स्मार्टफोनमध्ये लीक्विड कूलिंग सिस्टम 4096mm2 Vapor Chamber आहे जो सर्व हीटिंग कोरला कवर करतो. तसेच iQOO 7 स्मार्टफोनमध्ये 6000mm2 Graphite Layer फुल कवरेज लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हि कूलिंग सिस्टम युजरला स्मूद गेमिंग एक्सपीरियंस देते.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : कॅमेरा

iQOO 7 Series स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 48MP चा मेन कॅमेरा आहे, जो SONY IMX598 सेंसर आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये 13MP चा सुपर वाइड अँगल मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये तिसरा कॅमेरा सेंसर वेगवेगळा देण्यात आला आहे. iQOO 7 स्मार्टफोनमध्ये 2MP मोनो कॅमेरा देण्यात आला आहे, तर iQOO 7 Legend स्मार्टफोन 13MP ची Pro Portrait Lens मिळते.

व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 7 Series स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला प्राइमेरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS)ला सपोर्ट करतो. फोटोग्राफी फीचर्स पाहता iQOO 7 Series स्मार्टफोनमध्ये एक्सट्रीम नाइट विजन प्रो, स्पोर्टस मोड, सुपर नाइट मोड, सुपर नाइट पॅनो, डबल एक्सपोजर मोड देण्यात आले आहेत.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : इतर फीचर्स

iQOO 7 Legend आणि iQOO 7 दोन्ही स्मार्टफोन Android 11 वर आधारित कंपनीच्या कस्टमाइज्ड युजर इंटरफेस Funtouch OS 11.1 वर चालतात. दोन्ही स्मार्टफोनमध्ये डुअल स्पीकर सपोर्ट देण्यात आला आहे जे सराउंड साउंड ऑफर करतात. कनेक्टिविटी पाहता दोन्ही स्मार्टफोनमध्ये डुअल सिम 5G आणि 4G, डुअल WiFi बॅंड, Bluetooth 5.1, USB Type C पोर्ट देण्यात आले आहेत. iQOO 7 दोन कलर ऑप्शन – स्ट्रॉम ब्लॅक आणि आइस ब्लू मध्ये सादर केला गेला आहे.

iQOO 7 Legend

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : किंमत

iQOO ने भारतात iQOO 7 Legend स्मार्टफोन दोन वेरिएंट आणि iQOO 7 तीन वेरिएंटमध्ये सादर केला आहे. iQOO 7 Legend स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 39,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. तर याचा टॉप वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरोजसह 43,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

iQOO 7 स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 31,990 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे. तर दुसरा वेरिएंट 8GB रॅम + 256 GB स्टोरेजसह 33,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. टॉप वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 35,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : प्रीऑर्डर ऑफऱ

दोन्ही स्मार्टफोन विक्रीसाठी 1 मेला अमेझॉनवर उपलब्ध होतील. iQOO 7 सीरीजची प्री बुकिंग अमेझॉन आणि iQOO च्या ऑफिशियल वेबसाइटवर सुरु झाली आहे. iQOO 7 स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच 2000 रुपयांची अमेझॉन कुपन ऑफर मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन को प्री ऑर्डर केल्यास फोन 27,990 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

iQOO 7 Legend ची प्री ऑर्डर पण अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाइटवर सुरु झाली आहे. यात ICICI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट आणि 2000 रुपयांचा अमेझॉन कुपन डिस्काउंट मिळत आहे. प्री-ऑर्डर करताना iQOO 7 Legend स्मार्टफोन 34,990 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

The post iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-7-legend-and-iqoo-7-launched-in-india-price-and-specs/feed/ 0