iQOO Neo 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Jun 2020 06:58:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iQOO 3 च्या किंमतीत मोठी कपात, 4000 रुपयांपेक्षा कमी झाली किंमत https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-price-cut-in-india-5g-4g-model-12gb-ram-snapdragon-865-chipset-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-price-cut-in-india-5g-4g-model-12gb-ram-snapdragon-865-chipset-specs-price-sale-offer/#respond Fri, 24 Apr 2020 06:55:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7500 iQOO 3 Quantum Silver आणि Tornado Black कलर मध्ये विकत घेता येईल.

The post iQOO 3 च्या किंमतीत मोठी कपात, 4000 रुपयांपेक्षा कमी झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO सोबत हिट झाल्यानंतर फेब्रुवारी मध्ये iQOO ने स्वतंत्र ब्रँड म्हणून भारतात आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन iQOO 3 नावाने बाजारात आला होता जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला होता. या फोनने फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एंट्री घेतील होती जो हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतो. देशात आईक्यू चे यश पाहता कंपनीने आता आपल्या या डिवाईसची किंमत कमी केली आहे. कंपनीने iQOO 3 च्या सर्व मॉडेल्स व वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

अश्या आहेत नवीन किंमती

iQOO 3 दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 5G आणि 4G चा समावेश आहे. सर्वात आधी 5G मॉडेल पाहता फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 46,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता, पण आता प्राइस कट नंतर या फोन मॉडेलची किंमत कमी होऊन 44,990 रुपये झाली आहे. तसेच iQOO 3 च्या 4G मॉडेल मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटचा समावेश आहे.

फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 38,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता ज्याचं किंमत आता कमी होऊन 34,990 रुपये झाली आहे. तसेच आईक्यू 3 चा 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल मेमरी असलेला वेरिएंट 41,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता ज्याची किंमत आता प्राइस कट नंतर 37,990 रुपये झाली आहे. iQOO 3 Quantum Silver आणि Tornado Black कलर मध्ये विकत घेता येईल.

iQOO 3

iQOO 3 91.40 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. कंपनीने या स्क्रीनला पोलर व्यू डिस्प्लेचे नाव दिले आहे. आईक्यू 3 प्रो मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर 10+ तसेच 1200+ निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने iQOO ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह दिली आहे जिच्या सोबत डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी E3 पॅनल देण्यात आला आहे.

iQOO 3 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.46 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची 20X डिजीटल झूम टेलीफोटो लेंस, एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी आईक्यू 3 एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

iQOO 3 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आईक्यू यूआई 1.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 64बिट 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 865 देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी iQOO 3 एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो.

iQOO 3 कंपनीने इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे या फीचर सोबतच कंपनीने फोन स्क्रीन गोरिल्ल ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली आहे. तसेच पावर बॅकअप साठी आईक्यू 3 मध्ये 4,440 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55वॉट सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलजीला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 15 मिनिटांत फोनची बटरी 50 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

The post iQOO 3 च्या किंमतीत मोठी कपात, 4000 रुपयांपेक्षा कमी झाली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-3-price-cut-in-india-5g-4g-model-12gb-ram-snapdragon-865-chipset-specs-price-sale-offer/feed/ 0
होल-पंच डिजाइन सह येईल iQoo Neo 3, लॉन्चच्या आधी किंमत झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-3-launch-with-punch-hole-display-and-snapdragon-865-chipset-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-3-launch-with-punch-hole-display-and-snapdragon-865-chipset-know-price/#respond Thu, 16 Apr 2020 10:22:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7119 iQOO Neo 3 एंडरॉयड 10 वर सादर केला जाऊ शकतो जो वीवोच्या यूजर इंटरफेस फनटच ओएस वर चालेल.

The post होल-पंच डिजाइन सह येईल iQoo Neo 3, लॉन्चच्या आधी किंमत झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO या महिन्यात आपला नवीन फोन iQoo Neo 3 23 एप्रिलला लॉन्च करणार आहे. याआधी कंपनीने यावर्षी फेब्रुवारी मध्ये भारतीय बाजारात iQOO 3 फोन सादर केला होता जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये आला होता. आता कंपनी आइक्यू 3 सादर करणार आहे. हा फोन कंपनी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये सादर करेल.

लॉन्चच्या आधी फोन अनेक स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत, ज्यात डिस्प्ले आणि चिपसेटच्या माहितीचा समावेश आहे. आता फोनच्या डिजाइनची माहिती देत कंपनीने एक अधिकृत वीडियो प्रसिद्ध केला आहे, ज्यात डिवाइसच्या फ्रंटची डिजाइन स्पष्ट दिसत आहे. याव्यतिरिक्त एका रिपोर्ट मध्ये फोनची किंमत पण लीक झाली आहे

iQoo ने चीनी सोशल मीडिया साइट वीबो वर 34 सेकंदांचा टीजर वीडियो शेयर केला आहे. त्याद्वारे समजले आहे कि फोन मध्ये होल-पंच डिस्प्ले असेल. तसेच खालच्या बाजूला बारीक बेजल असेल. त्याचबरोबर दुसऱ्या पोस्ट मध्ये एका लीकस्टरने दावा केला आहे कि iQoo Neo 3 ची किंमत CNY 2,998 (जवळपास 32,00 रुपये) पासून सुरु होईल.

आईक्यू नियो 3 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात वेगवेगळी माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच वीबो वर एक पोस्ट समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि आईक्यू नियो 3 कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले वर लॉन्च करेल. आणि जर असे झाले तर iQOO Neo 3 ब्रँडचा पहिला फोन असेल जो या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

याव्यतिरिक्त iQOO Neo 3 एंडरॉयड 10 वर सादर केला जाऊ शकतो जो वीवोच्या यूजर इंटरफेस फनटच ओएस वर चालेल. त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 मिळेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि iQOO Neo 3 बाजारात V1981A मॉडेल नंबर सह एंट्री घेईल. तसेच या फोन मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे लीक मध्ये समोर आले होते.

The post होल-पंच डिजाइन सह येईल iQoo Neo 3, लॉन्चच्या आधी किंमत झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-3-launch-with-punch-hole-display-and-snapdragon-865-chipset-know-price/feed/ 0
120हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च होईल iQOO Neo 3, स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-3-v1981a-snapdragon-865-chipset-120hz-punch-hole-display-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-3-v1981a-snapdragon-865-chipset-120hz-punch-hole-display-specs-leaked/#respond Tue, 07 Apr 2020 12:48:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7023 वेईबो वर सांगण्यात आले आहे कि iQOO Neo 3 बाजारात V1981A मॉडेल नंबर सह येईल.

The post 120हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च होईल iQOO Neo 3, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo अंतर्गत हिट झाल्यानंतर iQOO आता एक वेगळा ब्रँड बनला आहे. फेब्रुवारी मध्ये आईक्यूने भारतीय बाजारात स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला पहिला स्मार्टफोन iQOO 3 नावाने बाजारात आणला होता. हा फोन 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला होता. भारतात लोकप्रिय झालेल्या आईक्यू 3 नंतर आता कंपनी लवकरच अजून एक नवीन फोन iQOO Neo 3 आणण्याची तयारी करत आहे. या फोन बद्दल आतापर्यंत अनेक लिस्टिंग व लीक्स आले आहेत. आज पुन्हा iQOO Neo 3 ची एक मोठी बातमी समोर आली आहे. ताज्या बातमी मध्ये आईक्यू नियो 3 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे.

iQOO Neo 3 संबंधित हि बातमी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या माध्यमातून मिळाली आहे. वेइबो पोस्टनुसार आईक्यू नियो 3 कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सह लॉन्च करेल. विशेष म्हणजे जर असे झाले तर iQOO Neo 3 ब्रँडचा पहिला फोन असेल जो या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोन मध्ये पंच-होल डिस्प्ले दिली जाईल आणि हा होल स्क्रीनच्या उजवीकडे असेल.

iQOO Neo 3 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वीवोच्या यूजर इंटरफेस फनटच ओएस वर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 मिळेल. वेईबो वर सांगण्यात आले आहे कि iQOO Neo 3 बाजारात V1981A मॉडेल नंबर सह येईल. तसेच या फोन मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे या लीक मध्ये समोर आले आहे. iQOO Neo 3 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्चसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

iQOO 3

iQOO 3 दोन मॉडेल्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 5G आणि 4G चा समावेश आहे. आईक्यू फोन LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 Flash Storage ला सपोर्ट करतो. सर्वात आधी 5G मॉडेल बद्दल बोलायचे तर हा फोन 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने आईक्यू 3 चा 5जी मॉडेल 44,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

तसेच iQOO 3 चा 4G मॉडेल कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. किंमत पाहता iQOO 3 4G चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 36,990 रुपये तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 39,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 120हर्ट्ज पंच-होल डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च होईल iQOO Neo 3, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-3-v1981a-snapdragon-865-chipset-120hz-punch-hole-display-specs-leaked/feed/ 0