होल-पंच डिजाइन सह येईल iQoo Neo 3, लॉन्चच्या आधी किंमत झाली लीक

iQOO या महिन्यात आपला नवीन फोन iQoo Neo 3 23 एप्रिलला लॉन्च करणार आहे. याआधी कंपनीने यावर्षी फेब्रुवारी मध्ये भारतीय बाजारात iQOO 3 फोन सादर केला होता जो 4G आणि 5G दोन मॉडेल्स मध्ये आला होता. आता कंपनी आइक्यू 3 सादर करणार आहे. हा फोन कंपनी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये सादर करेल.

लॉन्चच्या आधी फोन अनेक स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत, ज्यात डिस्प्ले आणि चिपसेटच्या माहितीचा समावेश आहे. आता फोनच्या डिजाइनची माहिती देत कंपनीने एक अधिकृत वीडियो प्रसिद्ध केला आहे, ज्यात डिवाइसच्या फ्रंटची डिजाइन स्पष्ट दिसत आहे. याव्यतिरिक्त एका रिपोर्ट मध्ये फोनची किंमत पण लीक झाली आहे

iQoo ने चीनी सोशल मीडिया साइट वीबो वर 34 सेकंदांचा टीजर वीडियो शेयर केला आहे. त्याद्वारे समजले आहे कि फोन मध्ये होल-पंच डिस्प्ले असेल. तसेच खालच्या बाजूला बारीक बेजल असेल. त्याचबरोबर दुसऱ्या पोस्ट मध्ये एका लीकस्टरने दावा केला आहे कि iQoo Neo 3 ची किंमत CNY 2,998 (जवळपास 32,00 रुपये) पासून सुरु होईल.

आईक्यू नियो 3 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात वेगवेगळी माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच वीबो वर एक पोस्ट समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि आईक्यू नियो 3 कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले वर लॉन्च करेल. आणि जर असे झाले तर iQOO Neo 3 ब्रँडचा पहिला फोन असेल जो या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

याव्यतिरिक्त iQOO Neo 3 एंडरॉयड 10 वर सादर केला जाऊ शकतो जो वीवोच्या यूजर इंटरफेस फनटच ओएस वर चालेल. त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 मिळेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि iQOO Neo 3 बाजारात V1981A मॉडेल नंबर सह एंट्री घेईल. तसेच या फोन मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे लीक मध्ये समोर आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here