iQOO Z1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iQOO Z1 च्या लॉन्चच्या आधी लीक झाली किंमत आणि रेंडर्स, अशी असेल डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z1-launch-on-19-may-render-price-leaked-before-official-announcement/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z1-launch-on-19-may-render-price-leaked-before-official-announcement/#respond Wed, 13 May 2020 14:44:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7211 iQOO ने सांगितले आहे कि iQOO Z1 स्क्रीन 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

The post iQOO Z1 च्या लॉन्चच्या आधी लीक झाली किंमत आणि रेंडर्स, अशी असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQoo ने अलीकडेच आपल्या चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइटच्या अकाउंट वर घोषणा केली होती कि ते आपला नवीन स्मार्टफोन 19 मे ला सादर करतील. या दिवशी लॉन्च होणारा फोन iQoo Z1 5G असेल, ज्या बाबत आधीच माहिती मिळाली आहे कि यात मीडियाटेक डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर दिला जाईल. तसेच नावावरून स्पष्ट झाले आहे कि या फोन मध्ये 5जी सपोर्ट असेल. इतकेच नव्हे तर हा आइकू चा पहिला असा फोन असेल, ज्यात मीडियाटेक प्रोसेसर दिला जात आहे. याआधी कंपनीचे सर्व फोन स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सोबतच सादर केले गेले आहेत. तसेच आता लॉन्चच्या आधी फोनच्या रियर डिजाइन आणि किंमतीची माहिती समोर आली आहे.

फोनची लॉन्च डेट सांगत आईक्यू ने टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोन मधील 144हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि डायमनसिटी 1000+ चिपसेटचा पण खुलासा केला होता. तसेच पोस्ट मध्ये फ्लॅगशिप चिपसेट, फास्ट 5जी, अनरेस्ट्रेन्ड स्क्रीन, इमॉर्टल साउंड क्वालिटी, स्ट्रॉन्ग बॅटरी लाइफ, फुल परफॉर्मेंस इत्यादी फीचर्सचा उल्लेख होता. आता iQOO Z1 च्या रेंडर मध्ये डिवाइसच्या रियर डिजाइनची माहिती समोर आली आहे.

नवीन रेंडर नुसार iQOO Z1 दोन कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. तसेच स्मार्टफोनच्या इमेजनुसार मागे चौकोनी आकारात कॅमेरा टॉप-लेफ्ट कॉर्नर वर असेल. यात एक एलईडी फ्लॅश आणि तीन कॅमेरा आहेत. डिवाइसच्या उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर आहे. डिवाइस मागून iQOO Neo3 फोन सारखा दिसतो जो गेल्या महिन्यात अधिकृतपणे वर लॉन्च झाला होता.

IQOO Z1 च्या फ्रंटच्या रेंडरचा खुलासा झाला नाही. या आठवड्यात समोर आलेल्या Z1 च्या लॉन्च डेट पोस्टर आणि लीक झालेल्या फोटोज वरून समजले होते कि फोनच्या टॉप-राइट कॉर्नर वर पंच-होल डिस्प्ले असेल. तसेच , iQOO ने सांगितले आहे कि iQOO Z1 स्क्रीन 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

IQOO Z1 आता चीन मध्ये रिजर्वेशनसाठी तयार आहे. एक लीक झालेल्या प्रोमो पोस्टर वरून समजले आहे कि Z1 च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 2,498 युआन (जवळपास 26,000 रुपये) असेल. पण हे लीक आहे त्यामुळे यावर इतक्यात विश्व्स ठेवता येणार नाही. मीडियाटेकने सांगतिले होते त्यांचा नवीन चिपसेट सर्वात आधी iQoo स्मार्टफोन मध्ये दिला जाईल. तेव्हापासून बोलले जात आहे कि तो फोन आइकू झेड1 5जी असेल.

The post iQOO Z1 च्या लॉन्चच्या आधी लीक झाली किंमत आणि रेंडर्स, अशी असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z1-launch-on-19-may-render-price-leaked-before-official-announcement/feed/ 0
जगातील पहिला Dimensity 1000+ चिपसेट असलेला फोन 19 मे ला होईल लॉन्च, बघा हा का आहे वेगळा https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z1-to-launch-on-19-may-with-144hz-punch-hole-display-mediatek-dimensity-1000-plus-chipset-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z1-to-launch-on-19-may-with-144hz-punch-hole-display-mediatek-dimensity-1000-plus-chipset-specs-sale/#respond Mon, 11 May 2020 11:53:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7269 iQOO Z1 चे फोटोज एका चीनी टिपस्टरने शेयर केले आहेत. या फोटोज मध्ये फोनचा फक्त फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे.

The post जगातील पहिला Dimensity 1000+ चिपसेट असलेला फोन 19 मे ला होईल लॉन्च, बघा हा का आहे वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या सतत iQOO च्या आगामी नवीन स्मार्टफोन iQOO Z1 ची माहिती समोर येत आहे. आधी या फोन संबंधित लीक्स समोर आले, त्यानंतर फोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला. तर आता आईक्यू झेड1 ची नवीन आणि महत्वाची माहिती पण समोर आली आहे. कोणताही वेळ न दवडता कंपनीने आज iQOO Z1 ची लॉन्च डेट सांगितली आहे. आईक्यू ने सांगितले आहे कि ब्रँडचा हा नवीन फोन येत्या 19 मे ला टेक मंचावर सादर केला जाईल.

iQOO Z1 च्या लॉन्चची माहिती ब्रँडने माइक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या माध्यमातून दिली आहे. आईक्यूने सांगितले आहे कि कंपनी येत्या 19 मे ला आपला आगामी डिवाईस iQOO Z1 सादर करेल. या दिवशी हा फोन चीनी बाजारात लॉन्च केला जाईल, त्यानंतर आगामी काळात जगातील इतर बाजारांमध्ये येईल. फोनची लॉन्च डेट समोर ठेवत आईक्यूने टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोन मधील 144हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि डायमनसिटी 1000+ चिपसेटचा पण खुलासा केला आहे.

लुक व डिजाईन

आजच iQOO Z1 चे फोटोज एका चीनी टिपस्टरने शेयर केले आहेत. या फोटोज मध्ये फोनचा फक्त फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. एका फोटो मध्ये फोनची स्क्रीन बंद आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये फोनचा सेटिंग मेन्यू ओपन करून दाखवण्यात आला आहे. फोनचा लुक आणि डिजाईन पाहता आईक्यू झेड1 राउंड ऐजज असलेल्या बॉडी वर बनवण्यात आला आहे. फोनचे वरचे आणि खालच्या कडा कर्व्ड आहे.

आईक्यू झेड1 मध्ये पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यावर आहे. फोनचा फ्रंट पॅनल तिन्ही बाजुंनी पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला खूप बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर दिसत आहे. या बटणच्या खाली पावर की आहे. हा पावर बटण फोन बॉडीच्या वर येत नाही तर अगदी समांतर आहे. हा पाहून अंदाज लावला जात आहे कि iQOO Z1 चा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

स्पेसिफिकेशन्स

iQOO Z1 च्या फोटो मध्ये सेटिंग मेन्यू ओपन आहे जिथे या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट लिहिण्यात आला आहे. हा फोेन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत 60हर्ट्ज, 90हर्ट्ज आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर पण चालेल. तसेच टीजर ईमेज वरून समजले आहे कि हा फोन मीडियाटेकच्या लेटेस्ट चिपसेट डायमनसिटी 1000+ वर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट मीडियाटेक द्वारे अलीकडेच लॉन्च केला गेला आहे जो डुअल मोड 5G म्हणजे SA/NSA वर चालतो. आता पर्यंत कोणत्या ब्रँडचा कोणताही फोन या चिपसेट वर लॉन्च झालेला नाही. आईक्यू झेड1 च्या इतर माहिती साठी वाट बघावी लागेल.

The post जगातील पहिला Dimensity 1000+ चिपसेट असलेला फोन 19 मे ला होईल लॉन्च, बघा हा का आहे वेगळा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z1-to-launch-on-19-may-with-144hz-punch-hole-display-mediatek-dimensity-1000-plus-chipset-specs-sale/feed/ 0