जगातील पहिला Dimensity 1000+ चिपसेट असलेला फोन 19 मे ला होईल लॉन्च, बघा हा का आहे वेगळा

सध्या सतत iQOO च्या आगामी नवीन स्मार्टफोन iQOO Z1 ची माहिती समोर येत आहे. आधी या फोन संबंधित लीक्स समोर आले, त्यानंतर फोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला. तर आता आईक्यू झेड1 ची नवीन आणि महत्वाची माहिती पण समोर आली आहे. कोणताही वेळ न दवडता कंपनीने आज iQOO Z1 ची लॉन्च डेट सांगितली आहे. आईक्यू ने सांगितले आहे कि ब्रँडचा हा नवीन फोन येत्या 19 मे ला टेक मंचावर सादर केला जाईल.

iQOO Z1 च्या लॉन्चची माहिती ब्रँडने माइक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या माध्यमातून दिली आहे. आईक्यूने सांगितले आहे कि कंपनी येत्या 19 मे ला आपला आगामी डिवाईस iQOO Z1 सादर करेल. या दिवशी हा फोन चीनी बाजारात लॉन्च केला जाईल, त्यानंतर आगामी काळात जगातील इतर बाजारांमध्ये येईल. फोनची लॉन्च डेट समोर ठेवत आईक्यूने टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोन मधील 144हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि डायमनसिटी 1000+ चिपसेटचा पण खुलासा केला आहे.

लुक व डिजाईन

आजच iQOO Z1 चे फोटोज एका चीनी टिपस्टरने शेयर केले आहेत. या फोटोज मध्ये फोनचा फक्त फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. एका फोटो मध्ये फोनची स्क्रीन बंद आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये फोनचा सेटिंग मेन्यू ओपन करून दाखवण्यात आला आहे. फोनचा लुक आणि डिजाईन पाहता आईक्यू झेड1 राउंड ऐजज असलेल्या बॉडी वर बनवण्यात आला आहे. फोनचे वरचे आणि खालच्या कडा कर्व्ड आहे.

आईक्यू झेड1 मध्ये पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यावर आहे. फोनचा फ्रंट पॅनल तिन्ही बाजुंनी पूर्णपणे बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला खूप बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर दिसत आहे. या बटणच्या खाली पावर की आहे. हा पावर बटण फोन बॉडीच्या वर येत नाही तर अगदी समांतर आहे. हा पाहून अंदाज लावला जात आहे कि iQOO Z1 चा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

स्पेसिफिकेशन्स

iQOO Z1 च्या फोटो मध्ये सेटिंग मेन्यू ओपन आहे जिथे या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट लिहिण्यात आला आहे. हा फोेन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत 60हर्ट्ज, 90हर्ट्ज आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर पण चालेल. तसेच टीजर ईमेज वरून समजले आहे कि हा फोन मीडियाटेकच्या लेटेस्ट चिपसेट डायमनसिटी 1000+ वर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट मीडियाटेक द्वारे अलीकडेच लॉन्च केला गेला आहे जो डुअल मोड 5G म्हणजे SA/NSA वर चालतो. आता पर्यंत कोणत्या ब्रँडचा कोणताही फोन या चिपसेट वर लॉन्च झालेला नाही. आईक्यू झेड1 च्या इतर माहिती साठी वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here