iQOO Z1 च्या लॉन्चच्या आधी लीक झाली किंमत आणि रेंडर्स, अशी असेल डिजाइन

iQoo ने अलीकडेच आपल्या चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइटच्या अकाउंट वर घोषणा केली होती कि ते आपला नवीन स्मार्टफोन 19 मे ला सादर करतील. या दिवशी लॉन्च होणारा फोन iQoo Z1 5G असेल, ज्या बाबत आधीच माहिती मिळाली आहे कि यात मीडियाटेक डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर दिला जाईल. तसेच नावावरून स्पष्ट झाले आहे कि या फोन मध्ये 5जी सपोर्ट असेल. इतकेच नव्हे तर हा आइकू चा पहिला असा फोन असेल, ज्यात मीडियाटेक प्रोसेसर दिला जात आहे. याआधी कंपनीचे सर्व फोन स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सोबतच सादर केले गेले आहेत. तसेच आता लॉन्चच्या आधी फोनच्या रियर डिजाइन आणि किंमतीची माहिती समोर आली आहे.

फोनची लॉन्च डेट सांगत आईक्यू ने टीजर पोस्टरच्या माध्यमातून फोन मधील 144हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि डायमनसिटी 1000+ चिपसेटचा पण खुलासा केला होता. तसेच पोस्ट मध्ये फ्लॅगशिप चिपसेट, फास्ट 5जी, अनरेस्ट्रेन्ड स्क्रीन, इमॉर्टल साउंड क्वालिटी, स्ट्रॉन्ग बॅटरी लाइफ, फुल परफॉर्मेंस इत्यादी फीचर्सचा उल्लेख होता. आता iQOO Z1 च्या रेंडर मध्ये डिवाइसच्या रियर डिजाइनची माहिती समोर आली आहे.

नवीन रेंडर नुसार iQOO Z1 दोन कलर वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. तसेच स्मार्टफोनच्या इमेजनुसार मागे चौकोनी आकारात कॅमेरा टॉप-लेफ्ट कॉर्नर वर असेल. यात एक एलईडी फ्लॅश आणि तीन कॅमेरा आहेत. डिवाइसच्या उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर आहे. डिवाइस मागून iQOO Neo3 फोन सारखा दिसतो जो गेल्या महिन्यात अधिकृतपणे वर लॉन्च झाला होता.

IQOO Z1 च्या फ्रंटच्या रेंडरचा खुलासा झाला नाही. या आठवड्यात समोर आलेल्या Z1 च्या लॉन्च डेट पोस्टर आणि लीक झालेल्या फोटोज वरून समजले होते कि फोनच्या टॉप-राइट कॉर्नर वर पंच-होल डिस्प्ले असेल. तसेच , iQOO ने सांगितले आहे कि iQOO Z1 स्क्रीन 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

IQOO Z1 आता चीन मध्ये रिजर्वेशनसाठी तयार आहे. एक लीक झालेल्या प्रोमो पोस्टर वरून समजले आहे कि Z1 च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 2,498 युआन (जवळपास 26,000 रुपये) असेल. पण हे लीक आहे त्यामुळे यावर इतक्यात विश्व्स ठेवता येणार नाही. मीडियाटेकने सांगतिले होते त्यांचा नवीन चिपसेट सर्वात आधी iQoo स्मार्टफोन मध्ये दिला जाईल. तेव्हापासून बोलले जात आहे कि तो फोन आइकू झेड1 5जी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here