JeetX E-Scooter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Aug 2022 13:13:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OLA पेक्षा जास्त रेंज असलेली शानदार Electric Scooter भारतात लाँच; किंमत मात्र परवडणारी https://www.91mobiles.com/marathi/200-km-range-ivoomi-energy-jeetx-electric-scooter-launched-in-india-check-price-sale-features/ https://www.91mobiles.com/marathi/200-km-range-ivoomi-energy-jeetx-electric-scooter-launched-in-india-check-price-sale-features/#respond Mon, 22 Aug 2022 13:13:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12372 Electric Vehicle च्या वाढत्या बाजारात इलेक्ट्रिक टू व्हिलर मॅन्युफॅक्चरर iVOOMi Energy नं आज भारतीय बाजारात आपली नवीन e-scooter JeetX लाँच केली आहे. ड्यूरेबल बॉडीसह आलेली ही ई-स्कूटर मोठी रेंज, दमदार बॅटरी तसेच शानदार फीचर्सना सपोर्ट करते. आयवूमी एनर्जीची ही बॅटरी असलेली स्कूटर जीतएक्स नावानं बाजारात आली आहे जिचे JeetX आणि JeetX 180 व्हेरिएंट्स ग्राहकांच्या सेवेत […]

The post OLA पेक्षा जास्त रेंज असलेली शानदार Electric Scooter भारतात लाँच; किंमत मात्र परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Electric Vehicle च्या वाढत्या बाजारात इलेक्ट्रिक टू व्हिलर मॅन्युफॅक्चरर iVOOMi Energy नं आज भारतीय बाजारात आपली नवीन e-scooter JeetX लाँच केली आहे. ड्यूरेबल बॉडीसह आलेली ही ई-स्कूटर मोठी रेंज, दमदार बॅटरी तसेच शानदार फीचर्सना सपोर्ट करते. आयवूमी एनर्जीची ही बॅटरी असलेली स्कूटर जीतएक्स नावानं बाजारात आली आहे जिचे JeetX आणि JeetX 180 व्हेरिएंट्स ग्राहकांच्या सेवेत दाखल होतील. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरु होते.

iVOOMi JeetX Electric Scooter

आयवूमी एनर्जीची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दोन मॉडेल्समध्ये लाँच झाली आहे ज्यांचं नाव JeetX आणि JeetX 180 आहे. हे दोन्ही मॉडेल Eco mode तथा sports mode/rider mode सह सादर करण्यात आले आहेत. रेंज पाहता JeetX इको मोडमध्ये 100 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देऊ शकते. तर स्पोर्ट्स मोडमध्ये जीतएक्स ई-स्कूटरची रेंज 90 किलोमीटर पेक्षा थोडी जास्त आहे. हे देखील वाचा: OLA S1 पेक्षा कमी किंमतीत लाँच झाली 120 किलोमीटर रेंज असलेली Electric Scooter; फीचर्स दर्जेदार

iVOOMi Energy नुसार JeetX 180 इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या दमदार मायलेज व रेंजमुळे भारतीय बाजारात हिट होऊ शकते. हा जीतएक्स 180 ई-स्कूटर मॉडेल इको मोडमध्ये 200 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देऊ शकतो. तर स्पोर्ट्स मोडमध्ये e-scooter JeetX180 वर 180 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर गाठता येईल.

iVOOMi JeetX चे फीचर्स

iVOOMi JeetX e-Scooter मध्ये ड्युअल रिमूव्हेबल बॅटरीचा वापर करण्यात आला जी याची एक मोठी खुबी आहे. या बॅटरी स्कूटरच्या इतर फीचर्सवर नजर टाकायची झाल्यास यात डिस्क ब्रेकसह CBS सिस्टम देखील देण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये फुट रेस्टचा देखील वेगळा वापर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आयवूमी एनर्जीची जीतएक्स स्कूटरची बॅटरी 3 वर्षांच्या वॉरंटीसह येते. JeetX मॅट फिनिश असलेल्या चार रंगात लाँच झाली आहे ज्यात Scarlet Red, Ink Blue, Posh White आणि Space Grey चा समावेश आहे. हे देखील वाचा: 499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज

iVOOMi JeetX प्राइस व सेल

JeetX Electric Scooter कोणत्याही आयवूमी डीलरशिपमधून विकत घेता येईल जिथे मॉडेल व्हेरिएंट्सनुसार किंमत 1 लाख ते 1.4 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. JeetX ची बुकिंग व सेल 1 सप्टेंबरपासून सुरु होईल तर JeetX180 साठी सेप्टेंबर अखेरची वाट पाहावी लागेल. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर 3,000 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत.

The post OLA पेक्षा जास्त रेंज असलेली शानदार Electric Scooter भारतात लाँच; किंमत मात्र परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200-km-range-ivoomi-energy-jeetx-electric-scooter-launched-in-india-check-price-sale-features/feed/ 0