499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज

Ola Electric नं स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रि-लाँच केली आहे. कंपनीनं ही बॅटरी असलेली स्कूटी Mission Electric 2022 event अंतगर्त सादर केली आहे. तसेच Ola electric car देखील टीज केली आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की साल 2024 मध्ये कार लाँच केली जाईल. इतकंच नव्हे तर कंपनीनं Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर limited edition Khaki shade मध्ये सादर केली आहे, जिचेज्याची फक्त 1,947 यूनिटच विकले जातील. चला जाणून घेऊया Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि सेलबद्दल संपूर्ण माहिती.

Ola S1 Electric Scooter Price, Sale आणि Booking

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर 99,000 रुपयांच्या आरंभिक एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुकिंगसाठी कंपनीच्या साइट आणि Ola Electric app वर उपलब्ध होईल. कंपनीनुसार नवीन Ola Electric S1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरु होईल. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितलं आहे की अर्ली अ‍ॅक्सेस परचेज विंडो 1 सप्टेंबरला उघडेल.

Ola S1 ची warranty

ओला कडे ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी फायनान्सचा ऑप्शन देखील आहे. त्याअंतर्गत ईएमआय 2,999 रुपयांपासून सुरु होईल आणि बँकिंग पार्टनरकडून फीमध्ये सूट मिळेल. तसेच ओला पाच वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी देखील देत आहे. वॉरंटी बॅटरी, मोटर आणि अन्य सर्व कव्हर करेल. जुने Ola S1 Pro युजर्स देखील ही वॉरंटी विकत घेऊन शकतील.

Ola S1 की रेंज, स्पेसिफिकेशन्स, कलर आणि डिजाइन

ओला एस1 ची डिजाइन ओला एस1 प्रो सारखी आणि त्याच प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ही रेड, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, नियो मिंट आणि लिक्विड सिल्व्हर अशा पाच रंगात आली आहे. तसेच यात ओला एस1 प्रो प्रमाणे मूवओएस सॉफ्टवेयर आहे आणि ज्याला भविष्यातील सर्व अपडेट्स मिळतील, ज्यात मूवओएस 3.0 चा देखील समावेश आहे, जो यंदा दिवाळीनंतर लाँच होईल.

Ola S1 Pro च्या 3.97kWh च्या तुलनेत Ola S1 ची बॅटरी क्षमता 3kWh आहे. ओला एस1 ची एआरएआय-प्रमाणित रेंज 131 किमी आहे. इको मोड मध्ये 128 किमी, सामान्य मोड मध्ये 101 किमी आणि स्पोर्ट्स मोड मध्ये 90 किमी ची रेंज ग्राहकांना मिळेल. कंपनीचा दावा आहे की Ola S1 मध्ये 95kmph चा टॉप स्पीड मिळतो. तसेच यात म्युजिक, नेव्हिगेशन, साथी अ‍ॅप आणि रिवर्स मोड सारखे फिचर देखील मिळतात.

तुम्हाला माहित असेल की Ola S1 गेल्यावर्षी 15 ऑगस्ट, 2021 रोजी लाँच करण्यात आली होती. परंतु यंदा जानेवारीत काही कारणास्तव ही बंद करण्यात आली होती. आता रि-लाँचनंतर पुन्हा एकदा या स्कूटरची टक्कर बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here