इलेक्ट्रिक वाहने बनवणारी कंपनी Benling India (बेनलिंग इंडिया) नं आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (New Electric Scooter) लाँच केली आहे. लाँच केलेल्या बॅटरी असलेल्या स्कूटर Believe (बिलीव) बद्दल कंपनीचा दावा आहे की ही एक हाय-स्पीड ई-स्कूटर आहे जी भारतीय रस्त्यांसाठी डिजाइन करण्यात आली आहे. तसेच, आपल्या नवीन मॉडेलसाठी, बेनलिंग इंडियानं इलेक्ट्रिक बॅटरीची एक नवीन जेनरेशन अर्थात LFP (लिथियम आयरन फॉस्फेट) देखील सादर केली आहे.
मोठी रेंज आणि टॉप स्पीड
कंपनीनं ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 3.2 किलोवॉट वॉटरप्रूफ बीएलडीसी मोटर आणि एक स्वॅपेबल बॅटरीसह सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जवर या इलेक्ट्रिक स्कूटरमधून 120 किमीची रेंज मिळेल, यासाठी इको मोडचा वापर करावा लागेल. तर स्पोर्ट्स मोडमध्ये 75 किलोमीटरची रेंज मिळेल तसेच हीचा टॉप-स्पीड 75 किमी प्रति तास आणि एकूण वजन 248 किलोग्राम आहे. ही स्कूटी फक्त 5.5 सेकंदांत ताशी 40 किमी वेग पकडू शकते. हे देखील वाचा: Mahindra लाँच करणार 5 दमदार इलेक्ट्रिक कार; पाहा यांची डिजाइन आणि लाँच डेट
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं LFP बॅटरी पॅक दिला आहे जो की मायक्रो चार्जर आणि ऑटो शटऑफ फीचरसह येतो. त्यामुळे जवळपास चार तासांत ही फुल चार्ज करता येते. तसेच नवीन बिलिव्ह ई-स्कूटरमध्ये कीलेस स्टार्ट, मल्टीपल स्पीड मोड, अँटी-थेफ्ट अलार्म फीचर, रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग, मोबाइल- अॅप कनेक्टिव्हिटी, पार्क-असिस्ट फंक्शन, मोबाइल-चार्जिंग आणि रियल टाइम ट्रॅकिंग सारखे अनेक फीचर्स मिळतात.
ब्रेकडाउन असीस्ट मिळेल
Benling Believe इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात मोठी खुबी म्हणजे यात स्मार्ट ब्रेकडाउन असिस्ट फीचर मिळतं, ज्यामुळे फक्त एक नॉब पकडून ब्रेकडाउनमध्ये स्कूटरवरील प्रवासी सहज 25 किलोमीटरचं अंतर पार करू शकतो. या स्कूटरवर तीन वर्षांची किंवा 50 हजार किलोमीटर (जे आधी पूर्ण होईल ते) ची वॉरंटी मिळेल. हे देखील वाचा: 499 रुपयांमध्ये बुक करा OLA ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; आता मिळणार 131 किलोमीटरची रेंज
Electric Scooter प्राइस आणि सेल
बॅटरी असलेल्या या स्कूटर Believe ची किंमत पाहता, कंपनीनं ही एक्स-शोरूम 97,520 रुपयांच्या किंमतीत सादर केली आहे. तसेच ही नवीन Benling Believe इलेक्ट्रिक स्कूटर 25 ऑगस्टपासून कंपनीच्या शोरूममध्ये उपलब्ध होईल. E-Scooter कंपनीनं येलो, ब्लू, ब्लॅक, व्हाइट, पर्पल आणि मॅजिक ग्रे या सहा कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे.