LAVA Z1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 देशी कंपनीने लाॅन्च केला जगातील पहिला ‘कस्टमाइजेबल फोन‘, तुमच्या मनाप्रमाणे बदलता येतील फोनचे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/indian-lava-myz-series-customisable-devices-price-start-rs-5499/ https://www.91mobiles.com/marathi/indian-lava-myz-series-customisable-devices-price-start-rs-5499/#respond Thu, 07 Jan 2021 13:43:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9577 MyZ आणि Zup सीरीज मध्ये MediaTek Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर सह स्टॉक अँड्रॉइड 10 युजर इंटरफेस असेल जो ब्लोटवेयर फ्री प्यूोर अँड्रॉइड एकस्पीरियंस देईल.

The post देशी कंपनीने लाॅन्च केला जगातील पहिला ‘कस्टमाइजेबल फोन‘, तुमच्या मनाप्रमाणे बदलता येतील फोनचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आत्‍मनिर्भर भारत अभियान (Atmanirbhar Bharat) अंतगर्त देशी मोबाईल फोन निर्माता कंपनी लावाने भारतात त्यांच्या इंजिनियर्सने डिजाइन केलेला पहिला फोन Lava Z1 लॉन्च केला आहे. या फोन सह कंपनीने हायएन्ड स्पेसिफिकेशन्स आणि मिलिट्री ग्रैड सर्टिफिकेशन असलेले Z2, Z4 आणि Z6 पण सादर केले आहेत. या फोन्स व्यतिरिक्त कंपनीने जगातील पहिला कस्टमाइजेबल फोन Lava MYz सादर केला आहे. याचा अर्थ असा आहे कि तुमचा फोन घेण्याआधी तो कस्टमाइज करता येईल. कस्टमाइज करणे भारतीय मोबाईल मार्केट सोबतच टेक वर्ल्डसाठी पण खूप नवा अनुभव असेल. फोन विकत घेतल्यानंतर थोडे पैसे देऊन कस्टमाइज करता येईल, हा प्रोग्रामला कंपनीने Lava Zup असे नाव दिले आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

MyZ म्हणजे काय

Lava ने आज जगातील पहिल्या स्मार्टफोन MyZ च्या लॉन्चची घोषणा केली – जो कस्टमाइज केला जाऊ शकतो. MyZ खासकरून डिजाइन केला गेला आहे जेणेकरून ग्राहक फोन विकत घेण्याआधी यात आपल्या मनाप्रमाणे रॅम, कॅमेरा आणि रोम सारखे फीचर्स कमी किंवा जास्त करू शकतील. खरेदीच्या आधी फोन कस्टमाइज करण्याची प्रक्रिया म्हणजे My-Z.

हे देखील वाचा : Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु

रॅम, रोम आणि कॅमेरा बदलण्याचा पर्याय मिळेल

लावाच्या MyZ फोनचे सर्व वेरिएंट्स मध्ये काही स्टॅंडर्ड स्पेसिफिकेशन्स असतील जे बदलता येणार नाहीत. कंपनी नुसार या सीरीजच्या सर्व फोन्स मध्ये मीडियाटेक जी35 प्रोसेसर, 5000एमएएच बॅटरी आणि 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले असेल. फोन मध्ये रॅम, रोम, रियर कॅमेरा, सेल्फी कॅमेरा आणि कलर ऑप्शन ग्राहकांना बदलता येतील.

इथे मिळेल यूनिक फोन

या यूनिक ‘Made-to-Order’ कॉन्सेप्ट मध्ये कस्टमरकडे 2GB, 3GB, 4GB आणि 6GB रॅम सह 32GB, 64GB आणि 128GB रोम कॉम्बिनेशन निवडण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच रियर कॅमेरा ऑप्शन मध्ये डुअल (13+2MP) आणि ट्रिपल (13+5+2MP) कॅमेऱ्यासह फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP आणि 16MP लेंसचा ऑप्शन मिळेल. जर तुम्ही MyZ फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा यूनिक ‘Made-to-Order’ डिवाइस लावा ई-स्टोर www.lavamobiles.com वरून विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह फक्त 9,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला हा शानदार ‘इंडियन’ फोन

लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि बिजनेस हेड सुनील रैना यांनी म्हटले आहेत कि आम्हाला आमच्या तरुण आरअँडडी आणि डिजाइन टीमचा गर्व आहे, ज्यांनी लावाला अशाप्रकारची अनोखी उपलब्धी मिळवणारी जगातील पहिली कंपनी बनवले आहे. त्यांनी म्हटले कि लवकरच, रिटेलर्स आणि ट्रेडर्स पण ग्राहकांच्या आवडीनुसार नुसार फोन निर्माण करू शकतील.

Lava Zup म्हणजे काय

लावा Zup सह ग्राहक आपला फोन विकत घेतल्यानंतर पण कंपनीच्या सर्विस सेंटर वर जाऊन डिवाइस मध्ये रॅम आणि रोम अपग्रेड करू शकतात. ऑन-द-स्पॉट अपग्रेडसाठी ग्राहकांना सर्विस सेंटर मध्ये आधी बुकिंग कारवाई लागेल. या अपग्रेडेशनसाठी काही शुल्क दयावे लागले. SUNIL RAINA यांनी म्हटले आहे कि या अनोख्या इनोवेशन सह आम्ही ग्राहकांचे पैसे वाचवू. तसेच ग्राहक नवीन फोन मध्ये डेटा ट्रांसफर करण्याच्या त्रासापासून पण वाचतील.

MyZ आणि Zup सीरीज

MyZ आणि Zup सीरीज मध्ये MediaTek Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर सह स्टॉक अँड्रॉइड 10 युजर इंटरफेस असेल जो ब्लोटवेयर फ्री प्यूोर अँड्रॉइड एकस्पीरियंस देईल. तसेच फोन वॉटर ड्रॉप नॉच, HD+ डिस्प्ले 6.5″ (16.55 cm) सह कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सह येईल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट पण असेल.

The post देशी कंपनीने लाॅन्च केला जगातील पहिला ‘कस्टमाइजेबल फोन‘, तुमच्या मनाप्रमाणे बदलता येतील फोनचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indian-lava-myz-series-customisable-devices-price-start-rs-5499/feed/ 0
Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/lava-z1-z2-z4-z6-myz-zup-made-in-india-smartphone-launched/ https://www.91mobiles.com/marathi/lava-z1-z2-z4-z6-myz-zup-made-in-india-smartphone-launched/#respond Thu, 07 Jan 2021 12:59:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9574 आज लावाने आपले नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने एक साथ चार नवीन फोन LAVA Z1, LAVA Z2, LAVA Z4, LAVA Z6 लाॅन्च केले आहेत आणि हे सर्व स्मार्टफोन Made In India आहेत.

The post Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने जेव्हा घोषणा केली होती कि कंपनी 7 जानेवारीला आपले नवीन प्रोडक्ट्स लाॅन्च करणार आहे जे फक्त भारतीय युजर्ससाठी खास नसतील तर इंडियन स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये पण मोठा बदल घडवून आणतील. तेव्हापासून मोबाईल युजर्स या लाॅन्च ईवेंटची वाट बघत होते. आज लावाने आपले नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने एक साथ चार नवीन फोन LAVA Z1, LAVA Z2, LAVA Z4, LAVA Z6 लाॅन्च केले आहेत आणि हे सर्व स्मार्टफोन Made In India आहेत.

सर्वप्रथम किंमतीबाबत बोलायचे झाले तर LAVA Z1 कंपनीने फक्त 5,499 रुपयांमध्ये लाॅन्च केला आहे. तर LAVA Z2 6,999 रुपयांच्या किंमतीसह बाजारात आला आहे. LAVA Z4 स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे तर LAVA Z6 9,999 रुपयांच्या प्राइस टॅग सह भारतात लाॅन्च केला गेला आहे. लावा जेड1 येत्या 26 जानेवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल तर इतर तिन्ही स्मार्टफोन्स 11 जानेवारी पासून विकत घेता येतील. नवीन स्मार्टफोन्स सोबतच लावा ने LAVA myZ आणि LAVA zUP सारख्या अनोख्या सर्विसची पण सुरवात केली आहे जिची माहिती पुढे देण्यात आली आहे.

LAVA Z1

लावा जेड1 एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे जो बेजल लेस डिस्प्ले वर लाॅन्च झाला आहे. या फोन मध्ये 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. अँड्रॉइड ओएस आधारित हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो ए20 चिपसेट वर चालतो. त्याचबरोबर फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी लावा जेड1 एलईडी फ्लॅश सह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. लावाने आपल्या या फोनला ‘मिलिट्री ग्रेड’ ड्यूरेबिलिटी दिली आहे त्यामुळे हा पडल्यावर पण तुटत नाही. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोन मध्ये 3,100एमएएचची बॅटरी आहे.

LAVA Z2

लावाचा हा फोन वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्ले वर लाॅन्च झाला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 ओएस सोबतच या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे त्याचबरोबर लावा जेड2 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. हा फोन 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

लावा जेड2 फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. एलईडी फ्लॅश सह फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिकसलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबतच पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-z1-z2-z4-z6-myz-zup-made-in-india-smartphone-launched/feed/ 0