देशी कंपनीने लाॅन्च केला जगातील पहिला ‘कस्टमाइजेबल फोन‘, तुमच्या मनाप्रमाणे बदलता येतील फोनचे स्पेसिफिकेशन्स

आत्‍मनिर्भर भारत अभियान (Atmanirbhar Bharat) अंतगर्त देशी मोबाईल फोन निर्माता कंपनी लावाने भारतात त्यांच्या इंजिनियर्सने डिजाइन केलेला पहिला फोन Lava Z1 लॉन्च केला आहे. या फोन सह कंपनीने हायएन्ड स्पेसिफिकेशन्स आणि मिलिट्री ग्रैड सर्टिफिकेशन असलेले Z2, Z4 आणि Z6 पण सादर केले आहेत. या फोन्स व्यतिरिक्त कंपनीने जगातील पहिला कस्टमाइजेबल फोन Lava MYz सादर केला आहे. याचा अर्थ असा आहे कि तुमचा फोन घेण्याआधी तो कस्टमाइज करता येईल. कस्टमाइज करणे भारतीय मोबाईल मार्केट सोबतच टेक वर्ल्डसाठी पण खूप नवा अनुभव असेल. फोन विकत घेतल्यानंतर थोडे पैसे देऊन कस्टमाइज करता येईल, हा प्रोग्रामला कंपनीने Lava Zup असे नाव दिले आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

MyZ म्हणजे काय

Lava ने आज जगातील पहिल्या स्मार्टफोन MyZ च्या लॉन्चची घोषणा केली – जो कस्टमाइज केला जाऊ शकतो. MyZ खासकरून डिजाइन केला गेला आहे जेणेकरून ग्राहक फोन विकत घेण्याआधी यात आपल्या मनाप्रमाणे रॅम, कॅमेरा आणि रोम सारखे फीचर्स कमी किंवा जास्त करू शकतील. खरेदीच्या आधी फोन कस्टमाइज करण्याची प्रक्रिया म्हणजे My-Z.

हे देखील वाचा : Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु

रॅम, रोम आणि कॅमेरा बदलण्याचा पर्याय मिळेल

लावाच्या MyZ फोनचे सर्व वेरिएंट्स मध्ये काही स्टॅंडर्ड स्पेसिफिकेशन्स असतील जे बदलता येणार नाहीत. कंपनी नुसार या सीरीजच्या सर्व फोन्स मध्ये मीडियाटेक जी35 प्रोसेसर, 5000एमएएच बॅटरी आणि 6.5-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले असेल. फोन मध्ये रॅम, रोम, रियर कॅमेरा, सेल्फी कॅमेरा आणि कलर ऑप्शन ग्राहकांना बदलता येतील.

इथे मिळेल यूनिक फोन

या यूनिक ‘Made-to-Order’ कॉन्सेप्ट मध्ये कस्टमरकडे 2GB, 3GB, 4GB आणि 6GB रॅम सह 32GB, 64GB आणि 128GB रोम कॉम्बिनेशन निवडण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच रियर कॅमेरा ऑप्शन मध्ये डुअल (13+2MP) आणि ट्रिपल (13+5+2MP) कॅमेऱ्यासह फ्रंटला सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP आणि 16MP लेंसचा ऑप्शन मिळेल. जर तुम्ही MyZ फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा यूनिक ‘Made-to-Order’ डिवाइस लावा ई-स्टोर www.lavamobiles.com वरून विकत घेता येईल.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह फक्त 9,999 रुपयांमध्ये लाॅन्च झाला हा शानदार ‘इंडियन’ फोन

लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि बिजनेस हेड सुनील रैना यांनी म्हटले आहेत कि आम्हाला आमच्या तरुण आरअँडडी आणि डिजाइन टीमचा गर्व आहे, ज्यांनी लावाला अशाप्रकारची अनोखी उपलब्धी मिळवणारी जगातील पहिली कंपनी बनवले आहे. त्यांनी म्हटले कि लवकरच, रिटेलर्स आणि ट्रेडर्स पण ग्राहकांच्या आवडीनुसार नुसार फोन निर्माण करू शकतील.

Lava Zup म्हणजे काय

लावा Zup सह ग्राहक आपला फोन विकत घेतल्यानंतर पण कंपनीच्या सर्विस सेंटर वर जाऊन डिवाइस मध्ये रॅम आणि रोम अपग्रेड करू शकतात. ऑन-द-स्पॉट अपग्रेडसाठी ग्राहकांना सर्विस सेंटर मध्ये आधी बुकिंग कारवाई लागेल. या अपग्रेडेशनसाठी काही शुल्क दयावे लागले. SUNIL RAINA यांनी म्हटले आहे कि या अनोख्या इनोवेशन सह आम्ही ग्राहकांचे पैसे वाचवू. तसेच ग्राहक नवीन फोन मध्ये डेटा ट्रांसफर करण्याच्या त्रासापासून पण वाचतील.

MyZ आणि Zup सीरीज

MyZ आणि Zup सीरीज मध्ये MediaTek Helio G35 ऑक्टा-कोर प्रोसेसर सह स्टॉक अँड्रॉइड 10 युजर इंटरफेस असेल जो ब्लोटवेयर फ्री प्यूोर अँड्रॉइड एकस्पीरियंस देईल. तसेच फोन वॉटर ड्रॉप नॉच, HD+ डिस्प्ले 6.5″ (16.55 cm) सह कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सह येईल. इतकेच नव्हे तर फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट पण असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here