Lava ने लाॅन्च केले 4 नवीन ‘Made In India’ स्मार्टफोन, किंमत फक्त 5,499 रुपयांपासून सुरु

इंडियन स्मार्टफोन कंपनी LAVA ने जेव्हा घोषणा केली होती कि कंपनी 7 जानेवारीला आपले नवीन प्रोडक्ट्स लाॅन्च करणार आहे जे फक्त भारतीय युजर्ससाठी खास नसतील तर इंडियन स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये पण मोठा बदल घडवून आणतील. तेव्हापासून मोबाईल युजर्स या लाॅन्च ईवेंटची वाट बघत होते. आज लावाने आपले नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने एक साथ चार नवीन फोन LAVA Z1, LAVA Z2, LAVA Z4, LAVA Z6 लाॅन्च केले आहेत आणि हे सर्व स्मार्टफोन Made In India आहेत.

सर्वप्रथम किंमतीबाबत बोलायचे झाले तर LAVA Z1 कंपनीने फक्त 5,499 रुपयांमध्ये लाॅन्च केला आहे. तर LAVA Z2 6,999 रुपयांच्या किंमतीसह बाजारात आला आहे. LAVA Z4 स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे तर LAVA Z6 9,999 रुपयांच्या प्राइस टॅग सह भारतात लाॅन्च केला गेला आहे. लावा जेड1 येत्या 26 जानेवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल तर इतर तिन्ही स्मार्टफोन्स 11 जानेवारी पासून विकत घेता येतील. नवीन स्मार्टफोन्स सोबतच लावा ने LAVA myZ आणि LAVA zUP सारख्या अनोख्या सर्विसची पण सुरवात केली आहे जिची माहिती पुढे देण्यात आली आहे.

LAVA Z1

लावा जेड1 एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे जो बेजल लेस डिस्प्ले वर लाॅन्च झाला आहे. या फोन मध्ये 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. अँड्रॉइड ओएस आधारित हा फोन आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो ए20 चिपसेट वर चालतो. त्याचबरोबर फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी लावा जेड1 एलईडी फ्लॅश सह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. लावाने आपल्या या फोनला ‘मिलिट्री ग्रेड’ ड्यूरेबिलिटी दिली आहे त्यामुळे हा पडल्यावर पण तुटत नाही. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोन मध्ये 3,100एमएएचची बॅटरी आहे.

LAVA Z2

लावाचा हा फोन वाॅटरड्राॅप नाॅच डिस्प्ले वर लाॅन्च झाला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 ओएस सोबतच या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे त्याचबरोबर लावा जेड2 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. हा फोन 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

लावा जेड2 फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. एलईडी फ्लॅश सह फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिकसलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबतच पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here