LG W30 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 08 Oct 2020 14:15:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4GB रॅम असलेला LG W31 होणार आहे लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/lg-w31-helio-p22-soc-4gb-ram-google-play-console/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w31-helio-p22-soc-4gb-ram-google-play-console/#respond Thu, 08 Oct 2020 14:15:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8445 LG आपल्या W-Series अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे, ज्याचे नाव LG W31 असेल.

The post 4GB रॅम असलेला LG W31 होणार आहे लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी LG अनेक दिवसांपासून आपल्या नवीन आणि शानदार स्मार्टफोन्सना टेक मार्केट मध्ये सादर करत आहे. आता समोर आलेल्या बातमीनुसार LG आपल्या W-Series अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे, ज्याचे नाव LG W31 असेल. हा फोन आता गूगल प्ले कंसोल वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच फोनची पहिली झलक पण या लिस्टिंग मध्ये दिसली आहे. प्रथमदर्शनी हा फोन LG W30 Plus चा अपग्रेडेड वर्जन वाटत आहे.

लिस्टिंग मध्ये फोनचा फ्रंट लुक समोर आला आहे, त्यानुसार स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिजाइन असेल, ज्यात सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी कॅमेरा देण्यात येईल. गूगल प्ले कंसोल वर लिस्ट इमेजनुसार हँडसेट मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन असेल. तसेच डावीकडे ऑन एक बटन दिसत आहे जो वॉयस असिसटेंटसाठी वापरता येईल.

लिस्टिंगनुसार LG W31 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो P22 चिपसेट असेल आणि यात 4GB रॅम असेल. तसेच गूगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये समजले आहे कि फोनची स्क्रीन रिज्युलेशन 720 x 1600 असेल. फोनच्या स्क्रीन साइजबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि W31 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच लिस्टिंगनुसार डिवाइस अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.

आधीच्या लीकनुसार, एलजी डब्ल्यू 31 आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. तसेच डिवाइसच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. रियर कॅमेरा मॉड्यूल मध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा + 12MP + 2MP सेंसर असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन मध्ये सेल्फीसाठी फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याचा अंदाज आहे. अफवांमधून असे पण समजले आहे कि LG W31 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी असेल. कंपनीने आतापर्यंत या आगामी स्मार्टफोन बाबत कोणतीही माहिती दिली नाही.

The post 4GB रॅम असलेला LG W31 होणार आहे लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w31-helio-p22-soc-4gb-ram-google-play-console/feed/ 0
LG W20 पण होणार आहे लॉन्च, गूगल पेज वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/lg-w20-listed-on-google-play-console-design-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w20-listed-on-google-play-console-design-specifications-leaked/#respond Mon, 20 Jan 2020 12:57:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6332 लिस्टिंगनुसार फोन मध्ये PowerVR GE 8322 जीपीयू मिळू शकतो.

The post LG W20 पण होणार आहे लॉन्च, गूगल पेज वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने जून मध्ये इंडियन स्मार्टफोन बाजारात ‘LG W’ सीरीज सादर केली होती. या सीरीजची सुरवात करून कंपनीने एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात LG W10, LG W30 आणि LG W30 Pro चा समावेश होता. एलजी ने हे तिन्ही लो बजेट सेग्मेंट मध्ये आणले होते, जे यूजर्सना आवडले होते. आता बातमी समोर येत आहे कि एलजी हि सीरीज वाढवणार आहे. एलजी डब्ल्यू सीरीजचा एक नवीन फोन समोर आला आहे जो LG W20 नावाने लवकरच टेक बाजारात येऊ शकतो.

LG W20 गूगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे नाव W20 लिहिण्यात आले आहे. लिस्टिंग मध्ये एकीकडे फोनच्या नावासह याचे काही स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत सोबतच फोनचा फोटो पण गूगल प्ले कंसोल वर दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दिसला आहे ज्यात एलजी डब्ल्यू20 बेजल लेस नॉच डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे.

डिजाईन पाहता LG W20 च्या फ्रंट पॅनल वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण पण आहे. फोटो मध्ये फोन डिस्प्ले वर ‘W’ लोगो पण आहे. लिस्टिंग पाहता यात फोनची स्क्रीन साईज नाही पण डिस्प्लेचे पिक्सल रेज्ल्यूशन 1520 × 720 दिसत आहे. म्हणजे LG W20 मध्ये एचडी+ डिस्प्ले दिला जाईल ज्याची पिक्सल डेनसिटी 320dpi असेल.

LG W20 चे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये Spreadtrum SC9863A चिपसेट असलचे गूगल प्ले कंसोल वर समोर आले आहे. लिस्टिंग मध्ये एलजी डब्ल्यू20 मध्ये 3 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे ज्यासोबत हा फोन आक्टाकोर कोर्टेक्स-ए55 प्रोसेसर वर चालेल. तसेच लिस्टिंगनुसार फोन मध्ये PowerVR GE 8322 जीपीयू मिळू शकतो.

LG W सीरीज

भारतीय बाजारात उपलब्ध असेल्या एलजी डब्ल्यू सीरीजच्या स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे तर LG W30 Pro कंपनीने 12,490 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच LG W30 एलजी ने 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी सह 9,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. LG W10 या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे. कंपनीने हा डिवाईस 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता जो 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post LG W20 पण होणार आहे लॉन्च, गूगल पेज वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w20-listed-on-google-play-console-design-specifications-leaked/feed/ 0
8200एमएएच बॅटरी आणि 8 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च होईल LG G Pad 8 https://www.91mobiles.com/marathi/lg-g-pad-8-8200-mah-battery-8-inch-display-usb-type-c-specifications-design-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-g-pad-8-8200-mah-battery-8-inch-display-usb-type-c-specifications-design-launch-soon/#respond Tue, 29 Oct 2019 11:50:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5614 किंमत भारतीय करंसीनुसार 26,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post 8200एमएएच बॅटरी आणि 8 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च होईल LG G Pad 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या डब्ल्यू सीरीजच्या नवीन स्मार्टफोन W30 Pro ची किंमत सांगून हा भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध केला आहे. हा स्मार्टफोन 12,490रुपयांमध्ये शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. LG W30 Pro लॉन्च नंतर आता कंपनी एका नवीन टॅबलेट डिवाईस बाजारात आणण्यास तयार आहे, ज्याची एक्सक्लूसिव माहिती 91मोबाईल्सच्या टीमला मिळाली आहे.

91मोबाईल्सला एलजीच्या टॅबलेट डिवाईस LG G Pad 8 ची एक्सक्सूसिव ईमेज मिळाली आहे. फोटो सोबतच या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे ज्यावरून समजते कि LG G Pad 8 मोठ्या डिस्प्ले सोबतच पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाईल. LG G Pad 8 ची डिजाईन आणि लुक पाहता हा टॅबलेट बटण लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यावर कोणतीही नॉच नसेल.

डिजाईन

टॅबलेटच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. LG G Pad 8 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला LG चा लोगो आहे. टॅबलेटच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. या पोर्टच्या दोन्ही बाजूंना स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. LG G Pad 8 मध्ये 3.5एमएम जॅक दिला जाईल कि ते सजून समजले नाही.

स्पेसिफिकेशन्स

LG G Pad 8 चे स्पेसिफिकेशन्स पाहता प्राप्त माहितीनुसार आपल्या नावाप्रमाणे हा टॅबलेट 8 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या डिस्प्लेचे रेज्ल्यूशन किती असेल हे सांगता येणार नाही. LG G Pad 8 च्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल तर सेल्फी साठी हा टॅबलेट डिवाईस 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

LG G Pad 8 मध्ये पावर बॅकअप साठी 8,200एमएएच ची दमदार बॅटरी असेल. आशा आहे कि LG G Pad 8 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह लॉन्च केला जाईल. आम्हला मिळालेल्या माहितीनुसार LG G Pad 8 367 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,000 रुपयांच्या आसपास असेल.

हे देखील वाचा: फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा

LG W30 Pro

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता एलजी डब्ल्यू सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. LG W30 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W30 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी LG W30 Pro 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या

LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. पावर बॅकअप साठी LG W30 Pro मध्ये 4,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यामुळे फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.

The post 8200एमएएच बॅटरी आणि 8 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च होईल LG G Pad 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-g-pad-8-8200-mah-battery-8-inch-display-usb-type-c-specifications-design-launch-soon/feed/ 0
फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/lg-w30-pro-launch-india-price-sale-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w30-pro-launch-india-price-sale-specifications/#respond Tue, 29 Oct 2019 10:30:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5608 हा डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल

The post फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने जून मध्ये इंडियन स्मार्टफोन बाजारात नवी स्ट्रेटजी वापरत ‘LG W’ सीरीज सादर केली होती. या सीरीजची सुरवात करत कंपनीने एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते ज्यात LG W10, LG W30 आणि LG W30 Pro चा समावेश होता. कंपनीने LG W10 आणि LG W30 स्मार्टफोन तेव्हा देशात सेल साठी उपलब्ध केले होते, जे शॉपिंग साइट अमेझॉन सोबत रिटेल स्टोर्सवरून पण विकत घेता येतील. आता एलजी ने डब्ल्यू सीरीजच्या सर्वात पावरफुल फोन LG W30 Pro ची किंमत सांगत हा सेल साठी उपलब्ध केला आहे.

किंमत व सेल

LG W30 Pro कंपनीने 12,490 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच हा डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विकत घेता येईल. कंपनीने हा फोन 4 जीबी की रॅम सह लॉन्च केला आहे. हा फोन 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

LG W30 Pro

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता एलजी डब्ल्यू सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. LG W30 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W30 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी LG W30 Pro 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या

LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. पावर बॅकअप साठी LG W30 Pro मध्ये 4,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यामुळे फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.

The post फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w30-pro-launch-india-price-sale-specifications/feed/ 0
LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-w30-w30-pro-official-launch-in-india-price-specifications-samsung-realme-xiaomi-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-w30-w30-pro-official-launch-in-india-price-specifications-samsung-realme-xiaomi-in-marathi/#respond Wed, 26 Jun 2019 11:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4661 LG W10 आणि LG W30 चा पहिला फ्लॅश सेल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर येत्या 3 जुलैला होईल.

The post LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट साठी हे वर्ष खूप बदल घेऊन आला आहे. एकीकडे Realme आणि Xiaomi सारख्या कंपन्या आपल्या बजेट स्मार्टफोन्सच्या जीवावर लाखो यूजर्स आपल्या ब्रँडशी जोडत आहेत तर Samsung ने भारतीय बाजारासाठी खास Galaxy M सीरीज सादर करून स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये मोठा बदल घडवला आहे. आता यात टेक कंपनी LG ची भर पडली आहे. LG ने पण इंडियन स्मार्टफोन बाजारात आपली योजना बदलली आहे आणि नवीन स्ट्रॅटेजी आजमावली आहे. या स्ट्रॅटेजी अंतर्गत कंपनीने भारतात अगदी नवीन ‘W’ सीरीजची सुरवात केली आहे. या स्वस्त व दमदार सीरीजची सुरवात करत कंपनीने आज भारतात एक साथ तीन नवीन फोन LG W10, LG W30 आणि LG W30 Pro लॉन्च केले आहेत.

अश्या आहेत किंमती

सर्वात आधी किंमतीबद्दल बोलायचे तर LG W10 या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे. कंपनीने हा डिवाईस 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. त्याचप्रमाणे LG W30 एलजीने 9,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. W सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल LG W30 Pro बद्दल बोलायचे तर कंपनीने या डिवाईसची किंमत अजूनपर्यंत सांगितली नाही. हा स्मार्टफोन याइतया काही आठवड्यांत भारतात सेल साठी उपलब्ध होईल. तसेच LG W10 आणि LG W30 चा पहिला फ्लॅश सेल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर येत्या 3 जुलैला होईल.

LG W10

LG W सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन LG W10 बद्दल बोलायचे तर हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.19-इंचाच्या एचडी+ नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

LG W10 कंपनी द्वारा 3जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W10 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी LG W10 मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एलजी चा हा नवीन स्मार्टफोन 4जी एलटीई व डुअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरने सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी LG W10 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन देशात टुलीप पर्पल आणि स्मॉकी ग्रे कलर मध्ये विकला जाईल.

LG W30 / W30 Pro

LG W सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने LG W30 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे तर LG W30 Pro मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक

एंडरॉयड 9 पाई आधारित LG W30 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. तर LG W30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. LG W30 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे W30 Pro मॉडेल 13 + 5 + 8 च्या रियर कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या स्मार्टफोन मॉडेल्स मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च

LG W30 आणि LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी साठी हे फोन मॉडेल रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतात. तसेच पावर बॅकअप साठी LG W10 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यात फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.

The post LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w10-w30-w30-pro-official-launch-in-india-price-specifications-samsung-realme-xiaomi-in-marathi/feed/ 0