LG ने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या डब्ल्यू सीरीजच्या नवीन स्मार्टफोन W30 Pro ची किंमत सांगून हा भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध केला आहे. हा स्मार्टफोन 12,490रुपयांमध्ये शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. LG W30 Pro लॉन्च नंतर आता कंपनी एका नवीन टॅबलेट डिवाईस बाजारात आणण्यास तयार आहे, ज्याची एक्सक्लूसिव माहिती 91मोबाईल्सच्या टीमला मिळाली आहे.
91मोबाईल्सला एलजीच्या टॅबलेट डिवाईस LG G Pad 8 ची एक्सक्सूसिव ईमेज मिळाली आहे. फोटो सोबतच या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण मिळाली आहे ज्यावरून समजते कि LG G Pad 8 मोठ्या डिस्प्ले सोबतच पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाईल. LG G Pad 8 ची डिजाईन आणि लुक पाहता हा टॅबलेट बटण लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यावर कोणतीही नॉच नसेल.

डिजाईन
टॅबलेटच्या फ्रंट पॅनल वर सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. LG G Pad 8 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला LG चा लोगो आहे. टॅबलेटच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. या पोर्टच्या दोन्ही बाजूंना स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. LG G Pad 8 मध्ये 3.5एमएम जॅक दिला जाईल कि ते सजून समजले नाही.
स्पेसिफिकेशन्स
LG G Pad 8 चे स्पेसिफिकेशन्स पाहता प्राप्त माहितीनुसार आपल्या नावाप्रमाणे हा टॅबलेट 8 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या डिस्प्लेचे रेज्ल्यूशन किती असेल हे सांगता येणार नाही. LG G Pad 8 च्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल तर सेल्फी साठी हा टॅबलेट डिवाईस 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
LG G Pad 8 मध्ये पावर बॅकअप साठी 8,200एमएएच ची दमदार बॅटरी असेल. आशा आहे कि LG G Pad 8 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह लॉन्च केला जाईल. आम्हला मिळालेल्या माहितीनुसार LG G Pad 8 367 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 26,000 रुपयांच्या आसपास असेल.
हे देखील वाचा: फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा
LG W30 Pro
फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता एलजी डब्ल्यू सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. LG W30 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W30 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी LG W30 Pro 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: LG W सीरीज आली भारतात! लॉन्च झाले 3 नवीन फोन, Samsung-Realme-Xiaomi च्या अडचणी वाढल्या
LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर सह येतो. पावर बॅकअप साठी LG W30 Pro मध्ये 4,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यामुळे फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.















