Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी LG अनेक दिवसांपासून आपल्या नवीन आणि शानदार स्मार्टफोन्सना टेक मार्केट मध्ये सादर करत आहे. आता समोर आलेल्या बातमीनुसार LG आपल्या W-Series अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे, ज्याचे नाव LG W31 असेल. हा फोन आता गूगल प्ले कंसोल वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच फोनची पहिली झलक पण या लिस्टिंग मध्ये दिसली आहे. प्रथमदर्शनी हा फोन LG W30 Plus चा अपग्रेडेड वर्जन वाटत आहे.
लिस्टिंग मध्ये फोनचा फ्रंट लुक समोर आला आहे, त्यानुसार स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिजाइन असेल, ज्यात सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी कॅमेरा देण्यात येईल. गूगल प्ले कंसोल वर लिस्ट इमेजनुसार हँडसेट मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन असेल. तसेच डावीकडे ऑन एक बटन दिसत आहे जो वॉयस असिसटेंटसाठी वापरता येईल.
लिस्टिंगनुसार LG W31 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो P22 चिपसेट असेल आणि यात 4GB रॅम असेल. तसेच गूगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये समजले आहे कि फोनची स्क्रीन रिज्युलेशन 720 x 1600 असेल. फोनच्या स्क्रीन साइजबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि W31 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच लिस्टिंगनुसार डिवाइस अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.
आधीच्या लीकनुसार, एलजी डब्ल्यू 31 आईपीएस एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. तसेच डिवाइसच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. रियर कॅमेरा मॉड्यूल मध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा + 12MP + 2MP सेंसर असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन मध्ये सेल्फीसाठी फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याचा अंदाज आहे. अफवांमधून असे पण समजले आहे कि LG W31 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी असेल. कंपनीने आतापर्यंत या आगामी स्मार्टफोन बाबत कोणतीही माहिती दिली नाही.















