Maharashtra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Jul 2023 12:03:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Emergency Alert Severe च्या नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रात भीतीचं वातावरण; सरकारनं दिलं स्पष्टीकरण https://www.91mobiles.com/marathi/emergency-alert-severe-notification-sent-by-government-of-india-creates-fear-among-people-of-maharashtra-know-details/ https://www.91mobiles.com/marathi/emergency-alert-severe-notification-sent-by-government-of-india-creates-fear-among-people-of-maharashtra-know-details/#respond Thu, 20 Jul 2023 12:03:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22496 भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झालं आहे. हे एक टेस्ट नोटिफिकेशन असलं तरी त्यात ‘इशारा’ लिहल्यामुळे तसेच महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही भीती आणखी वाढली. परंतु त्यामागील सत्य समोर आल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया काय होतं नोटिफिकेशन आणि सरकारनं ते का पाठवलं होतं. आज […]

The post Emergency Alert Severe च्या नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रात भीतीचं वातावरण; सरकारनं दिलं स्पष्टीकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झालं आहे. हे एक टेस्ट नोटिफिकेशन असलं तरी त्यात ‘इशारा’ लिहल्यामुळे तसेच महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही भीती आणखी वाढली. परंतु त्यामागील सत्य समोर आल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया काय होतं नोटिफिकेशन आणि सरकारनं ते का पाठवलं होतं.

आज म्हणजे 20 जुलैच्या सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक अँड्रॉइड फोन युजर्सच्या स्क्रीनवर एक नोटिफिकेशन फ्लॅश होऊ लागलं. ह्या नॉफिकेशनचं हेडिंग ‘Emergency Alert Severe’ असं होतं. तसेच पुढे ‘हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे,’ असं लिहिण्यात आलं होतं. ह्यातील ‘इशारा’ शब्द तसेच सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडत असलेला मुसळधार पाऊस आणि इर्शाळवाडीची दुर्घटनेच्या बातम्यांमुळे लोकांनी हा मेसेज गांभीर्याने घेतला. अनेकांनी ह्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून विचारणा देखील केली. परंतु ह्याचा अर्थ खूप सोपा होता तो जाणून घेऊया.

नोटिफिकेशनचा अर्थ

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागानं हा अलर्ट पाठवला होता. आणीबाणीच्या परिस्थितीच्या वेळी किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या एक यंत्रणा सरकारकडे आहे. ह्या यंत्रणेची चाचणी केली जात होती. त्यामुळे भविष्यात वादळ, पूर, भूकंप किंवा अन्य नैसर्गिक संकट आल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळू शकेल. ह्या यंत्रणेच्या टेस्टिंगसाठी आज म्हणजेच 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास अनेक मोबाईलधारकांना हे नोटीफिकेशन आधी इंग्रजीत आणि मग मराठीतून आलं होतं.

सरकारनं दिलं स्पष्टीकरण

आज आलेलं नोटिफिकेशन फक्त टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ह्या नोटिफिकेशनमधील ओके बटनावर टॅप केल्यावर तुम्हाला असे आपत्कालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारलं जातं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते.

नोटिफिकेशन बंद करण्याची पद्धत

अँड्रॉइड

  • अँड्रॉइड फोनमध्ये Settings > Safety and Emergency > Wireless emergency alerts मध्ये जाऊन सर्व अलर्ट बंद करता येतील.

आयफोन

  • आयफोनमध्ये Settings > Notifications > and disable Government Alerts जाऊन येणारे असे अलर्ट बंद करता येतील.

The post Emergency Alert Severe च्या नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रात भीतीचं वातावरण; सरकारनं दिलं स्पष्टीकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/emergency-alert-severe-notification-sent-by-government-of-india-creates-fear-among-people-of-maharashtra-know-details/feed/ 0
डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-domicile-certificate-maharashtra-online/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-domicile-certificate-maharashtra-online/#respond Thu, 06 Apr 2023 12:36:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20091 डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजेच वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र. हा एखाद्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाच्या अधिवासाचा पुरावा असतो. महाराष्ट्राच्या डोमेसाइल सर्टिफिकेट द्वारे तुम्ही महाराष्ट्राचे कायस्वरूपी रहिवाशी आहात हे सिद्ध होते. डोमेसाइल सर्टिफिकेट स्कॉलरशिप आणि सरकारी योजनांच्या कामी येतं. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही गेली 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे किंवा तुमचे पालक गेली 6 […]

The post डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • महाराष्ट्राचे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
  • 50 रुपये शुल्क आकारून सर्टिफिकेट घरी पोहोचवले जाते.
  • ऑफलाइन देखील डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येतो.

डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजेच वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र. हा एखाद्या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाच्या अधिवासाचा पुरावा असतो. महाराष्ट्राच्या डोमेसाइल सर्टिफिकेट द्वारे तुम्ही महाराष्ट्राचे कायस्वरूपी रहिवाशी आहात हे सिद्ध होते. डोमेसाइल सर्टिफिकेट स्कॉलरशिप आणि सरकारी योजनांच्या कामी येतं. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही गेली 15 वर्ष महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे किंवा तुमचे पालक गेली 6 वर्ष राज्यात राहत असले पाहिजेत. तसेच महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषांशी लग्न करणाऱ्या महिला देखील डोमेसाइल सर्टिफिकेट मिळवू शकतात. यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करता येतो. पुढे आम्ही ऑनलाइन पद्धत सांगितली आहे.

महाराष्ट्राचं डोमेसाइल सर्टिफिकेट ऑनलाइन मिळवण्याची पद्धत

पायरी 1: सर्वप्रथम आपले सरकार वेबसाइटला भेट द्या. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

पायरी 2: होम पेजवरच ‘न्यू युजर? रजिस्टर हेअर’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

पायरी 3: पुढे आलेल्या दोन पर्यायांमधून ‘व्हेरिफाय मोबाइल युजींग ओटीपी’ किंवा ‘उपलोड कम्प्लिट प्रोफाइल युजींग ओटीपी’ यातील एकाची निवड करा.

पायरी 4: आवश्यक ती माहिती भरून ‘रजिस्टर’ बटनवर क्लिक करा.

पायरी 5: तुम्ही निवडलेला युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन आपले सरकार वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 6: आता डावीकडे असलेल्या मेन्यूमधून ‘रेव्हेन्यू डिपार्टमेंट’ वर क्लिक करा.

पायरी 7: नंतर ड्रॉप डाउन यादीतून ‘रेव्हेन्यू सर्व्हिस’ उपविभागाची निवड करा.

पायरी 8: त्यानंतर ‘एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल’ ची निवड करा.

पायरी 9: आवश्यक ती माहिती भरा, कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा.

तुम्हाला एक अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर मिळेल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेटची स्थिती जाणून घेण्यासाठी करू शकता. लक्षात असू द्या या वेबसाइटवरून तुम्ही फक्त अर्ज करू शकता, तुमचं सर्टिफिकेट मात्र तुमच्या 15 दिवसाच्या पत्यावर पाठवलं जाईल. तसेच डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी 50 रुपये शुल्क आकरेल जाईल. एकदा काढलेलं प्रमाणपत्र आयुष्यभर वापरता येतं. हे देखील वाचा: पुणे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाइन कसा भरावा, जाणून घ्या

डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी आवश्यक कागदपत्र

पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, लाइट बिल, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, ड्रायविंग लायसन्स, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 आणि 8 अ चा उतारा

ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, ‘आरएसबीवाय’ कार्ड, ड्रायविंग लायसन्स

वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)

रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला

The post डोमेसाइल सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-apply-for-domicile-certificate-maharashtra-online/feed/ 0