Emergency Alert Severe च्या नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रात भीतीचं वातावरण; सरकारनं दिलं स्पष्टीकरण

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून पाठवलेल्या एका नोटिफिकेशनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झालं आहे. हे एक टेस्ट नोटिफिकेशन असलं तरी त्यात ‘इशारा’ लिहल्यामुळे तसेच महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही भीती आणखी वाढली. परंतु त्यामागील सत्य समोर आल्यावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया काय होतं नोटिफिकेशन आणि सरकारनं ते का पाठवलं होतं.

आज म्हणजे 20 जुलैच्या सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक अँड्रॉइड फोन युजर्सच्या स्क्रीनवर एक नोटिफिकेशन फ्लॅश होऊ लागलं. ह्या नॉफिकेशनचं हेडिंग ‘Emergency Alert Severe’ असं होतं. तसेच पुढे ‘हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे,’ असं लिहिण्यात आलं होतं. ह्यातील ‘इशारा’ शब्द तसेच सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडत असलेला मुसळधार पाऊस आणि इर्शाळवाडीची दुर्घटनेच्या बातम्यांमुळे लोकांनी हा मेसेज गांभीर्याने घेतला. अनेकांनी ह्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून विचारणा देखील केली. परंतु ह्याचा अर्थ खूप सोपा होता तो जाणून घेऊया.

नोटिफिकेशनचा अर्थ

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागानं हा अलर्ट पाठवला होता. आणीबाणीच्या परिस्थितीच्या वेळी किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या एक यंत्रणा सरकारकडे आहे. ह्या यंत्रणेची चाचणी केली जात होती. त्यामुळे भविष्यात वादळ, पूर, भूकंप किंवा अन्य नैसर्गिक संकट आल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळू शकेल. ह्या यंत्रणेच्या टेस्टिंगसाठी आज म्हणजेच 20 जुलै रोजी सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास अनेक मोबाईलधारकांना हे नोटीफिकेशन आधी इंग्रजीत आणि मग मराठीतून आलं होतं.

सरकारनं दिलं स्पष्टीकरण

आज आलेलं नोटिफिकेशन फक्त टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ह्या नोटिफिकेशनमधील ओके बटनावर टॅप केल्यावर तुम्हाला असे आपत्कालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारलं जातं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते.

नोटिफिकेशन बंद करण्याची पद्धत

अँड्रॉइड

  • अँड्रॉइड फोनमध्ये Settings > Safety and Emergency > Wireless emergency alerts मध्ये जाऊन सर्व अलर्ट बंद करता येतील.

आयफोन

  • आयफोनमध्ये Settings > Notifications > and disable Government Alerts जाऊन येणारे असे अलर्ट बंद करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here