Marathi Movie - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 15 Feb 2023 10:46:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/ https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/#respond Wed, 15 Feb 2023 10:46:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17839 13 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर मराठी चित्रपट (Marathi movie) ‘वाळवी’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. येत्या 24 फेब्रुवारीला वाळवी ZEE5 वर उपलब्ध होईल. यात स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे. Vaalvi On Zee5 वाळवी आयएमडीबीवरील हाय रेटेड मराठी […]

The post Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डार्क कॉमेडी असलेला मराठी चित्रपट ‘वाळवी’ येतोय ओटीटीवर
  • झी5 वर घर बसल्या पाहता येणार ‘वाळवी’
  • स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे प्रमुख भूमिकेत

13 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर मराठी चित्रपट (Marathi movie) ‘वाळवी’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. येत्या 24 फेब्रुवारीला वाळवी ZEE5 वर उपलब्ध होईल. यात स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Vaalvi On Zee5

वाळवी आयएमडीबीवरील हाय रेटेड मराठी चित्रपटांपैकी एक आहे, ज्यात 8.8 रेटिंग मिळाली आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या गोष्टीचं, धक्कातंत्राचं आणि यातील अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. येत्या 24 फेब्रुवारी 2023 ला मराठी चित्रपट वाळवी झी5 रिलीज केला जाईल, जो 190 पेक्षा जास्त देशांमधून पाहता येईल. झी5 वर पांडू, झोंबिवली, हर हर महादेव आणि टाइमपास 3 सारखे मराठी चित्रपट देखील आहेत. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली

वाळवीची गोष्ट

वाळवी चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अवनी (अनिता दाते-केळकर) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. कर्जबाजारीपणावर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे असे त्यांना वाटत असते. परंतु हा आत्महत्येचा प्रत्यन नसून अनिकेत आणि त्याची गर्लफ्रेंड देविका (शिवानी सुर्वे) यांनी मिळून अवनीच्या हत्येचा रचलेला कट असतो.

घटस्फोट न देणाऱ्या अवनीपासून सुटका करवून घेण्यासाठी दोघांनी हा घाट घातलेला असतो. यात ते यशस्वी देखील होतात परंतु अवनीचा मृतदेह गायब होतो आणि अनिकेतच्या फोनवर तिचा कॉल येतो. तेव्हा चित्रपटातील गमतीदार भागाला सुरुवात होते. सुबोध भावेने यात एका सायकॅट्रिस्टची भूमिका बजावली आहे. हे देखील वाचा: New OTT releases this week: शाहिद करणार ओटीटीवर पदार्पण; या आठवड्यात येत आहेत जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की ते प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून भारावून गेले आहेत. लोकांनी एका वेगळ्या प्रयोगाचा आनंद घेतला आणि कौतुकही केलं आहे. वाळवी एक हटके डार्क थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे, या पद्धतीचे चित्रपट मराठीत खूप कमी बनतात. झी5 वरील चित्रपटाच्या प्रीमियरमुळे वाळवीच्या डिजिटल प्रवासाची उत्सुकता त्यांनाही आहे. जर अजूनही कोणी हा चित्रपट पहिला नसेल तर नक्कीच हा चित्रपट तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल अशी खात्री त्यांना वाटते.

The post Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/feed/ 0
De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर https://www.91mobiles.com/marathi/de-dhakka-2-ott-release-zee5/ https://www.91mobiles.com/marathi/de-dhakka-2-ott-release-zee5/#respond Wed, 11 Jan 2023 10:34:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16779 गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट 2008 साली आलेल्या ‘दे धक्का’ या लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग आहे. थिएटर गाजवाल्यांनंतर आता हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दे धक्का 2 भारतातील लोकप्रिय ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी5 च्या माध्यमातून डिजिटली रिलीज केला […]

The post De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट 2008 साली आलेल्या ‘दे धक्का’ या लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग आहे. थिएटर गाजवाल्यांनंतर आता हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दे धक्का 2 भारतातील लोकप्रिय ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी5 च्या माध्यमातून डिजिटली रिलीज केला जाईल.

‘दे धक्का 2’ या चित्रपटानं चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर टीव्हीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर केलं होतं. आणि आता ‘दे धक्का 2’ हा सिनेमा झी5 वर सिनेरसिकांना 13 जानेवारी 2023 पासून स्ट्रीम करता येईल. हा चित्रपट पाहण्यासाठी तुमच्याकडे झी5 चं सब्सस्क्रिप्शन असणं आवश्यक असेल, त्याशिवाय तुम्ही हा चित्रपट ऑनलाइन पाहू शकणार नाही.

दे धक्का 2 चित्रपटाची गोष्ट

‘दे धक्का 2’ च्या माध्यमातून चाहत्यांना आता पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव आणि त्याच्या कुटुंबियांना पाहण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या भागातील सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसन या पात्रांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या दे धक्कामध्ये या कुटुंबीयांची धमाल ट्रीप मुंबई ते कोल्हापूर अशी होते. परंतु यावेळी प्रकरण देशाबाहेर गेलं आहे. आता जाधव कुटुंबियांना कोल्हापूरवरून थेट लंडनला जाणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टर, टीझर, ट्रेलरने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. लंडनची झलक या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मनोरंजनाचा नवा डोस हा सिनेप्रेमींना मिळणार आहे.

दे धक्का 2 मधील कलाकार

या चित्रपटाचं लेखन प्रताप फड यांनी केलं आहे तर दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर आणि सुदेश मांजेरकर यांनी मिळून पार पाडली आहे. दे धक्का 2 ला अजून लोबोनं संगीत दिलं आहे तर चित्रीकरण कारण रावत यांनी केलं आहे. चित्रपटाच्या एडिटिंगची जबाबदारी सतीश पडवळ यांनी पार पाडली आहे.

पहिल्या भागाप्रमाणे या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी आणि मेधा मांजरेकर प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर संजय खापरे, प्रवीण तरडे, भरती आचरेकर, आनंद इंगळे आणि विद्याधर जोशी देखील दिसतील. दुसऱ्या भागात सायली जाधवची भूमिका मात्र पांघरून फेम गौरी इंगवलेला देण्यात आली आहे.

काही मराठी सिनेमे सिनेरसिक कितीही वेळा आवडीने पाहतात. या यादीत दे धक्का या सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दे धक्का 2 हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्डदेखील झळकले होते. दे धक्का 2 मधील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

The post De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/de-dhakka-2-ott-release-zee5/feed/ 0
Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; थेट ओटीटीवर होणार रिलीज https://www.91mobiles.com/marathi/three-national-award-winning-marathi-film-sumi-is-set-release-directly-on-planet-marathi-ott/ https://www.91mobiles.com/marathi/three-national-award-winning-marathi-film-sumi-is-set-release-directly-on-planet-marathi-ott/#respond Thu, 10 Nov 2022 09:21:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14810 Sumi Marathi Movie OTT Release: 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ पुरस्कार मिळवणारा ‘सुमी’ चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये न रिलीज करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला आहे. अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन […]

The post Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; थेट ओटीटीवर होणार रिलीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Sumi Marathi Movie OTT Release: 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ पुरस्कार मिळवणारा ‘सुमी’ चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये न रिलीज करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला आहे. अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित ‘सुमी’ हा चित्रपट ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर 14 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित केला जाईल.

हा चित्रपट एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची गोष्ट सांगतो. ‘सुमी’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी ‘सुमी’ दिसत आहे. ‘सुमी’ चित्रपटाला 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये फक्त ‘सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट’ हा पुरस्कार मिळालं नसून यातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर यांना ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ पुरस्कार मिळाला आहे. हे देखील वाचा: Hostel Daze Season 3 असेल Raju Srivastava यांची शेवटची वेब सीरीज; जाणून घ्या कुठे होणार रिलीज

‘सुमी’मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायलं आहे. संगीतकार रोहन-रोहन यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. ‘या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा – पटकथा संजीव झा यांची आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाचे संवाद व गीत प्रसाद नामजोशी यांचे आहेत.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. “’सुमी’ सारख्या विलक्षण, प्रायोगिक कथा असलेला चित्रपट जागतिक व्यासपीठास पात्र आहे. प्रेक्षकांना वेगवेगळे आशय देऊन मनोरंजन करणे आमचं कर्तव्य आहे. ‘सुमी’ ची ही गोड कहाणी सर्वांनाच आवडेल. ‘सुमी’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे”, असे अक्षय बर्दापूरकर म्हणाले आहेत. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम

दिग्दर्शक अमोल गोळे यांनी चित्रपटाविषयी सांगताना म्हटले आहे की, “’सुमी’ चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आणि आता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून आनंद होतोय. प्लॅनेट मराठीच्या साथीने आम्ही ‘सुमी’ ला तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. एक ध्येयवेडी मुलगी म्हणजे ‘सुमी’. तुमच्या आमच्यातलीच ध्येयाचा ध्यास पूर्ण करणारी ‘सुमी’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.’’

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Sumi Marathi Movie: तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; थेट ओटीटीवर होणार रिलीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/three-national-award-winning-marathi-film-sumi-is-set-release-directly-on-planet-marathi-ott/feed/ 0