दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट कांतारा चित्रपटगृहांत दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. दर्शकांसह हा चित्रपट समीक्षकांना देखील आवडला आहे. परंतु काही फॅन्स या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत आहेत. परंतु अजूनतरी ओटीटी दर्शकांसाठी गुड न्यूज येण्यास वेळ लागणार आहे कारण चित्रपटाचे प्रोड्यूसर कार्तिक गौडा यांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगू केव्हा हा चित्रपट ओटीटीवर येईल. त्यामुळे या चित्रपटाच्या OTT Release साठी थोडी वाट बघावी लागू शकते. परंतु, तुम्ही ओटीटीवर Kantara (Best Kantara like South Movies to watch online) सारखे काही दाक्षिणात्य चित्रपट बघू शकता.
Best Kantara like South Movies to watch online
- Garuda Gamana Vrishabha Vahan
- Asura
- KGF 2
- Pushpa
- Karnan
Garuda Gamana Vrishabha Vahan
जर तुम्ही Kantara मधील काम पाहून Rishab Shetty चे फॅन झाला असाल तर त्याचा एक शानदार दाक्षिणात्य चित्रपट Garuda Gamana Vrishabha Vahana ओटीटीवर बघू शकता. हा चित्रपट Zee5 वर स्ट्रीम केली जाऊ शकते. चित्रपट कन्नड भाषेत आहे आणि याचे सबटाइटल इंग्लिशसह मल्याळममध्ये दिसतात. तसेच यात दोन मित्र शिवा आणि हरी मधील संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात राज बी. शेट्टी आणि ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत.
Asuran
साल 2019 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटासाठी धनुषला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे. असुरनमध्ये जोरदार अॅक्टिंग करून धनुषनं दर्शकांसह चित्रपट समीक्षकांची मने देखील जिंकली होती. या चित्रपटाची गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर बघू शकता. तसेच युट्युबवर देखील हा चित्रपट मोफत बघता येईल.
KGF 2
कन्नड सिनेसृष्टीतील धमाकेदार चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF Chapter 2) देखील ओटीटीवर बघता येईल, जो अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर आहे. तुम्हाला आठवत असेल की मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यावर या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले होते. ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF Chapter 2) मध्ये यश व्यतिरिक्त Sanjay Dutt, Raveena Tandon, Srinidhi Shetty आणि Anant Nag सारखे स्टार आहेत.
Pushpa
साउथ सुपरस्टार Allu Arjun चा चित्रपट Pushpa: The Rise हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये ओटीटीवर बघता येईल. Amazon Prime Video वरील हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. चित्रपटातील स्टार कास्ट पाहता यात टॉलीवुड अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.
Karnan
साउथचा सुपरस्टार धनुषचा चित्रपट कर्णन (Karnan) देखील अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बघता येईल. या चित्रपटाची गोष्ट सत्य घटनांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. तामिळनाडुमध्ये 90 च्या दशकात एका गावात ही घटना घडली होती, ज्यात मोठया प्रमाणावर पोलिसांनी गावकऱ्यांवर हल्ला केला होता. चित्रपटात धनुष व्यतिरिक्त लाल पॉल, योगी बाबू, नटराजन सुब्रमण्यम, राजिशा विजयन, गौरी जी किशन आणि लक्ष्मी प्रिया चंद्रामौली सारखे कलाकार आहेत.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.