Marathi Web Series - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 16 Jan 2023 10:24:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुन्हा घडणार शांतीत क्रांती; मराठी वेब सीरिज दुसऱ्या सीजनच्या शूटिंगचे काहीच दिवस शिल्लक https://www.91mobiles.com/marathi/shantit-kranti-season-2-shooting-almost-over-to-stream-on-sony-liv-this-year/ https://www.91mobiles.com/marathi/shantit-kranti-season-2-shooting-almost-over-to-stream-on-sony-liv-this-year/#respond Mon, 16 Jan 2023 10:24:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16910 सोनी लिव्ह वरच्या शांतीत क्रांती या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनच्या (Shantit Kranti Season 2) शूटिंगचे फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत, अशी माहिती भाडीपाची सहसंस्थापक Paula McGlynn हिने दिली आहे. पॉला शांतीत क्रांतीच्या दुसऱ्या सीजनच दिग्दर्शन देखील करत आहे. आपल्या लिंक्डइन पोस्ट मधून पॉलानं आपल्या सुरु असलेल्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. सोनी लिव्हनं काही महिन्यांपूर्वी माहिती […]

The post पुन्हा घडणार शांतीत क्रांती; मराठी वेब सीरिज दुसऱ्या सीजनच्या शूटिंगचे काहीच दिवस शिल्लक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • शांतीत क्रांती सीजन 2 चं शूटिंग आलं संपत.
  • पॉला आणि सारंगवर दिग्दर्शनाची जाबाबदारी.
  • सोनी लिव्हवर येणार सहा मराठी वेब सीरिज

सोनी लिव्ह वरच्या शांतीत क्रांती या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनच्या (Shantit Kranti Season 2) शूटिंगचे फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत, अशी माहिती भाडीपाची सहसंस्थापक Paula McGlynn हिने दिली आहे. पॉला शांतीत क्रांतीच्या दुसऱ्या सीजनच दिग्दर्शन देखील करत आहे. आपल्या लिंक्डइन पोस्ट मधून पॉलानं आपल्या सुरु असलेल्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

सोनी लिव्हनं काही महिन्यांपूर्वी माहिती दिली होती की शांतीत क्रांती या मराठी वेब सीरिजचा नवा सीजन येणार आहे. मीडियाशी बोलताना सोनीच्या डिजिटल बिजनेस हेडनं माहिती दिली होती की, “शांतीत क्रांतीच्या पहिल्या सीजननं चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.” हे देखील वाचा: 16GB RAM सह दमदार OPPO A78 5G भारतात लाँच; किंमत आहे खिशाला परवडणारी

आता पॉलानं आपल्या पोस्टमधून या सीजनच्या शूटिंगचे फक्त 2 आठवडे शिल्लक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे यंदा पुन्हा शांतीत क्रांती घडणार हे नक्की. पॉला लिहते, “पुन्हा एकदा दिग्दर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे. सारंग आणि मी शांतीत क्रांती सीजन 2 ची शूटिंग करत आहोत. दैनंदिन कामे करण्यासाठी एक विश्वासू टीम मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजते.” पुढील 2 आठवडे शूटिंग असल्यामुळे लिंक्डइनवर पोस्ट करता येणार नाही असं देखील तिने लिहलं आहे.

सहा नवीन मराठी वेब सीरिज

सोनी लिव्हनं फक्त भाडीपाच्या शांतीत क्रांती वेब सीरिजची माहिती दिली नाही तर आणखी मराठी शोजच्या निर्मतीची माहिती दिली आहे. सोनीच्या डिजिटल बिजनेस हेडनं एका वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार ओटीटी प्लॅटफॉर्म पाच-सहा नवीन मराठी शोजची निर्मिती करणार आहे.

शांतीत क्रांतीमधील कलाकार आणि गोष्ट

शांतीत क्रांतीच्या पहिल्या सीजनमध्ये अलोक राजवाडे, ललित प्रभाकर आणि अभय महाजन यांचं त्रिकुट मुख्य भूमिकेत दिसलं होतं. या सीरिज मधून शिखा तलसानियानं मराठीत पदार्पण केलं होतं. त्याचबरोबर विजय निकम, सुहिता थत्ते, सखी गोखले, मृण्मयी गोडबोले, विभावरी देशपांडे आणि इतर अनेक कलाकारांचा सहभाग होता. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

शांतीत क्रांती ही मानसिक दृष्ट्या त्रासलेल्या तीन मित्रांची गोष्ट आहे, जे गोवा ट्रिपला जाण्याची योजना बनवतात. परंतु एक मित्र त्यांना फसवून थेट वेलनेस रिसॉर्टमध्ये नेतो. जिथे त्यांच्याकडे फोन किंवा इतर फॅसिलिटी नसतात. या वेलनेस रिसॉर्टमध्ये ते टिकतात का कि तिथून फरार होऊन आपल्या नेहमीच्या आयुष्यात जातात? आपल्या समस्यांचा सामना करताना त्यांना मनशांती मिळते का? हे पहिल्या सीजनमध्ये दखवण्यात आलं आहे. दुसऱ्या सीजनच्या गोष्टीसाठी आता वेब सिरीजच्या रिलीजची वाट पाहावी लागेल.

The post पुन्हा घडणार शांतीत क्रांती; मराठी वेब सीरिज दुसऱ्या सीजनच्या शूटिंगचे काहीच दिवस शिल्लक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/shantit-kranti-season-2-shooting-almost-over-to-stream-on-sony-liv-this-year/feed/ 0
प्रशांत दामले वेबविश्वात करणार पदार्पण; ‘एका काळेचे मणी’ मध्ये समीर चौघुले देखील दिसणार https://www.91mobiles.com/marathi/prashant-damle-makes-web-series-debut-with-eka-kaleche-mani/ https://www.91mobiles.com/marathi/prashant-damle-makes-web-series-debut-with-eka-kaleche-mani/#respond Fri, 02 Sep 2022 04:06:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12732 नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनवर काम करणारे दिग्गज मराठी प्रशांत दामले (Prashant Damle) आता ‘एका काळेचे मणी!’ (Eka Kaleche Mani) या मराठी वेब सीरिज (Marathi Web Series) मधून वेब विश्वात पदार्पण करणार आहे. Jio Studios नं देखील पहिल्यांदाच वेब सीरिज प्रोड्युस केली आहे, सोबतीला महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) देखील आहेत. प्रशांत दामलेंचं वेबविश्वात पदार्पण या वेब […]

The post प्रशांत दामले वेबविश्वात करणार पदार्पण; ‘एका काळेचे मणी’ मध्ये समीर चौघुले देखील दिसणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनवर काम करणारे दिग्गज मराठी प्रशांत दामले (Prashant Damle) आता ‘एका काळेचे मणी!’ (Eka Kaleche Mani) या मराठी वेब सीरिज (Marathi Web Series) मधून वेब विश्वात पदार्पण करणार आहे. Jio Studios नं देखील पहिल्यांदाच वेब सीरिज प्रोड्युस केली आहे, सोबतीला महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) देखील आहेत.

प्रशांत दामलेंचं वेबविश्वात पदार्पण

या वेब सीरिजची कल्पना हरीशी मनोहर यांची असून लोकप्रिय अभिनेता ओम भुतकरनं हा शो सिद्धार्थ महाशब्दे सोबत लिहिला आहे. या आगामी मराठी वेब सीरिजचे दिग्दर्शन अतुल केतकर यांनी केलं आहे. प्रशांत दामले या सीरिजमध्ये आहेतच जोडीला हृता दुर्गुळे, वंदना गुप्ता, पूर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, ऋतुराज शिंदे, समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार देखील आहेत. हे देखील वाचा: Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

नुकताच या सीरिजचा टीजर महेश मांजरेकर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. जियो स्टुडिओ निर्मित या सीरिजमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट दाखवली जाईल असे दिसत आहे. प्रशांत दामले यात श्री. काळे यांची भूमिका साकारत आहेत. जोडीला समीर चौगुले श्री. पांढरे यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या दोन शेजाऱ्यांच्या जुगलबंदीतून अनेक हास्याचे फवारे उडवले जाणार आहेत.

या शो विषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणले की, “मला आनंद आहे की आम्ही ‘एका काळेचे मणी’ या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखे यशस्वी व्हावं आणि आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवावा. पण इथेच या सीरिजची खरी गंमत सुरु होते. कारण, सध्याच्या जनरेशनच्या आवडीनिवडी या भन्नाट, वेगळ्या असतात, आणि त्यामुळेच आपल्या दैनंदिन आयुष्यात एका विरोधाभास आणि धमाल निर्माण होते. आणि हीच जुन्या विरूद्ध नव्या विचारांची गंमत जंमत या सीरिजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.”

त्यांनी या वेब सीरिजचा टीजर इंस्टाग्रामवर शेयर करताना लिहलं आहे, “आंबट गोड नात्यांची, गोड रुसव्या-फुगव्यांची, आहे ही supercool कहाणी, थोडे lovely, थोडे इरसाल, आहेत मात्र सगळे ‘एका काळेचे मणी..! बघा या अतरंगी family ची पहिली झलक!” हे देखील वाचा: 43 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतेय 22,000 रुपयांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी सुवर्णसंधी

प्रशांत दामले यांनी 70 च्या दशकात मराठी नाटकांमधून केली. मोरूची मावशी, बहुरूपी आणि तू तिथे मी या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांच्याकडे आज गुणी आणि अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलं जातं. असंख्य गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे प्रशांत दामले या शोच्या माध्यमातून तरुणाईला आवडणाऱ्या वेब सीरिजच्या फॉरमॅटमध्ये पदार्पण करत आहेत.

The post प्रशांत दामले वेबविश्वात करणार पदार्पण; ‘एका काळेचे मणी’ मध्ये समीर चौघुले देखील दिसणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/prashant-damle-makes-web-series-debut-with-eka-kaleche-mani/feed/ 0