43 इंचाच्या 4K Smart TV वर मिळतेय 22,000 रुपयांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी सुवर्णसंधी

जर तुम्ही एक क्वॉलिटी स्मार्ट टीव्ही (Smart TV) विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. LG च्या टीव्हीवर ऑनलाइन चांगली डील मिळत आहे. सध्या एलजीच्या LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर खूप कमी किंमतीत विकला जात आहेत. हा स्मार्ट टीव्ही 4K Ultra HD रिजॉल्यूशन सह येतो. तसे यात दमदार प्रोसेसर आणि अनलिमिटेड ओटीटी (OTT) अ‍ॅप्लिकेशन्स सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनी या स्मार्ट टीव्हीवर 22,000 रुपयांचा सूट देत आहे. तसेच, तुम्ही बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर इत्यादींचा लाभ घेऊ शकता.

LG 43 Inch 4K Ultra HD Smart LED TV वरील ऑफर

एलजीच्या या स्मार्ट टीव्हीची एमआरपी अ‍ॅमेझॉनवर 59,990 रुपये आहे. परंतु सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर हा टीव्ही 37 टक्के म्हणजे 22,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळं हा टीव्ही तुम्ही फक्त 37,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. परंतु ही ऑफर इथेच संपत नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री

20000 discount on lg 43 inch 4k ultra hd smart led tv 32999

या शानदार स्मार्ट टीव्हीची खरेदी HSBC Cashback Card Credit Card केल्यास तुम्ही 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता. हा टीव्ही तुम्ही ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता, यासाठी 1,815 रुपयांचा मासिक हप्ता द्यावा लागेल. कंपनी या 4K स्मार्ट टीव्हीवर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. या टीव्हीच्या इंस्टॉलेशनसाठी Amazon सेल सपोर्ट स्टाफ तुमच्या घरी येतात.

LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV चे फीचर्स

LG च्या या स्मार्ट टीव्हीचे फीचर्स पाहता यात 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला जातो. ज्यात 3840×2160 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळतो. तसेच दमदार ऑडियोसाठी यात 20W आउटपुटचे स्पिकर देण्यात आले आहेत. यात अनलिमिटेड OTT अ‍ॅपचा सपोर्ट देखील मिळतो. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

प्रोसेसर पाहता टीव्हीमध्ये α5 Gen5 AI प्रोसेसर देण्यात आला आहे. या टेलिव्हिजनमध्ये WEB22 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. या टीव्हीमध्ये 1.5 जीबी रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात गेमिंगची सुविधा देखील मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात एचडीएमआय, ब्लूटूथ 5 आणि यूएसबी 2.0 चा सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here