
गेली कित्येक दिवस ओप्पोच्या ए सीरिजचा स्मार्टफोन भारतात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. जागतिक बाजारात आल्यांनतर आज भारतीय बाजारात कंपनीनं OPPO A78 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत मिडबजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. या ओप्पो मोबाइलमध्ये आकर्षक लुकसह MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. किंमत परवडणारी असून देखील यात 50MP Dual Rear Camera, 33W SUPERVOOC आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात.
OPPO A78 5G ची किंमत
OPPO A78 5G चा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे. हा ओप्पो मोबाइल 8GB RAM + 128GB storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 18,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची सेल 18 जानेवारी पासून देशात सुरु केली जाईल तसेच ओप्पो ए78 5जी फोन Glowing Blue आणि Glowing Black कलरमध्ये विकत घेता येईल. ICICI, SBI, BOB, IDFC, ONECARD आणि AU FINANCE banks बँक युजर्सना स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचा फायदा मिळेल. हे देखील वाचा: एकच नंबर! Airtel युजर्सना मिळतोय मोफत 2GB डेटा; 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर भन्नाट ऑफर
OPPO A78 5G चे स्पेसिफिकेशन्स
- 6.56″ HD+ 90Hz डिस्प्ले
- 33W 5,000mAh Battery
- Dimensity 700 प्रोसेसर
- 8GB RAM + 256GB Storage
- 50MP ड्युअल रियर कॅमेरा
ओप्पो ए78 5जी फोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. ही फोन स्क्रीन 600निट्स ब्राइटनेस, 96% कलर गामुट आणि एआय आय कम्फर्ट फीचरसह येते. या ओप्पो मोबाइलचे डायमेंशन 163.8×75.1×7.99एमएम आणि वजन 188ग्राम आहे.
OPPO A78 5G अँड्रॉइड 13 वर आधारित कलर ओएस 12 सह बाजारात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आणि 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा ओप्पो मोबाइल 8GB RAM expansion टेक्नॉलॉजीसह येतो जी गरज पडल्यास 16जीबी रॅमची पावर देते.
फोटोग्राफीसाठी ओप्पो ए78 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात
OPPO A78 5G ड्युअल सिम आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
















