MI India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 23 Oct 2019 12:50:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi फोन विकत घेण्याची शानदार संधी, 11 स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट आणि मोफत भेटवस्तू https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-diwali-with-mi-sale-offer-redmi-note-8-7-pro-y3-a3-k20-poco-f1-india-price-discount/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-diwali-with-mi-sale-offer-redmi-note-8-7-pro-y3-a3-k20-poco-f1-india-price-discount/#respond Wed, 23 Oct 2019 12:50:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5568 चला बघूया काय काय आहे खास Xiaomi Diwali With Mi मध्ये.

The post Xiaomi फोन विकत घेण्याची शानदार संधी, 11 स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट आणि मोफत भेटवस्तू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Diwali साजरी करण्यासाठी सर्व टेक कंपन्या आपल्या यूजर्ससाठी नवनवीन ऑफर घेऊन आल्या आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर डील्स सुरु आहेत तर दुसरीकडे टेक ब्रँड्सनी पण आपला फेस्टिवल सेल सुरु केला आहे. भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी असलेल्या Xiaomi ने पण आपल्या फॅन्स साठी Diwali With Mi सेलची सुरवात केली आहे. हा सेल येत्या 25 ऑक्टोबर पर्यंत चालेल ज्यात कंपनीच्या स्मार्टफोन्स सोबतच इतर प्रोडक्ट्स भरपूर डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध आहेत, सोबतच कंपनी कडून अनेक ऑफर व आर्कषक भेटवस्तू पण मिळत आहेत. चला बघूया काय काय आहे खास Xiaomi Diwali With Mi मध्ये.

Redmi Note 7 Pro पासून सुरवात कार्याची झाल्यास 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट आता फक्त 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट आता 13,999 रुपयांमध्ये आणि 16,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट आता फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi Note 7S चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांच्या लॉन्च प्राइज ऐवजी फक्त 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे तर 12,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट Diwali With Mi सेल मध्ये 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे Redmi 7A चा 2जीबी रॅम + 16जीबी वेरिएंट 5,999 रुपयांच्या ऐवजी फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि 6,199 रुपयांचा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 5,799 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Xiaomi Diwali With Mi मध्ये Redmi 7 चा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi Y3 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट जो 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तो Xiaomi च्या Diwali With Mi सेल मध्ये 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे तसेच 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 4जीबी रॅम+ 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi 8 सीरीज पाहता Diwali With Mi सेल मध्ये रेडमी 8 स्मार्टफोनचा 3जीबी रॅम +32जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट दोन्ही 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. Redmi 8A चा 2जीबी रॅम + 32 स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपये आणि 3जीबी रॅम + 32 वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Xiaomi Mi A3 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपये आणि 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Diwali With Mi सेल मध्ये POCO F1 चा 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपये, 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपये तसेच 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजचा पावरफुल वेरिएंट फक्त 18,999 रुपयांमध्ये मिळवता येईल. तसेच सेल मध्ये Redmi K20 Pro चा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट डिस्काउंट नंतर 24,999 रुपये आणि Redmi K20 चा 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये मिळेल.

The post Xiaomi फोन विकत घेण्याची शानदार संधी, 11 स्मार्टफोन्स वर मिळत आहे भरभक्कम सूट आणि मोफत भेटवस्तू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-diwali-with-mi-sale-offer-redmi-note-8-7-pro-y3-a3-k20-poco-f1-india-price-discount/feed/ 0
Xiaomi चा दावा आता 24 तासांत होईल फोन डिलीवर, नाही झाला तर पैसे परत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-guaranteed-next-day-delivery-rs-49-india-150-cities/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-guaranteed-next-day-delivery-rs-49-india-150-cities/#respond Thu, 06 Jun 2019 13:56:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4512 शनिवार व रविवारच्या दिवशी तसेच सरकारी सुट्टीच्या दिवशी Guaranteed Next-Day delivery लागू नसेल.

The post Xiaomi चा दावा आता 24 तासांत होईल फोन डिलीवर, नाही झाला तर पैसे परत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये जे स्मार्टफोन लॉन्च करते ते सर्व मार्केट मध्ये हिट होतात. Xiaomi स्मार्टफोन्सचे फ्लॅश सेल नेहमी आउट ऑफ स्टॉक होतात. गेल्या काही दिवसांपासून शाओमीने एकापाठोपाठ एक अनेक हिट स्मार्टफोन्स देशात ओपन सेल साठी उपलब्ध केले आहेत. तर आज आपल्या फॅन्सना कमीत कमी वेळात त्यांचा फोन देण्याच्या उद्देशाने Xiaomi ने ‘Guaranteed Next-Day delivery’ ची सुरवात केली आहे.

Xiaomi द्वारा भारतात ‘Guaranteed Next-Day delivery’ ची सुरवात केली गेली आहे. या खास सुविधेचा मुख्य उद्देश्य शाओमी स्मार्टफोन विकत घेणाऱ्या यूजर्सना कमीत कमी वेळात त्यांचा स्मार्टफोन उपलब्ध करवून देणे हा आहे. Guaranteed Next-Day delivery सर्विस अंतर्गत शाओमी एका दिवसांनंतरच स्मार्टफोन डिलीवर करण्याचा दावा करत आहे. या दाव्यासोबतच कंपनीने यूजर्सना असा शब्द दिला आहे कि एका दिवसात फोन डिलीवर न केल्यास डिलीवरी चार्ज फ्री केला जाईल.

Xiaomi ने आपल्या हि फास्ट डिलीवरी सर्विस देशातील 150 शहरांत सुरु केली आहे. कंपनी द्वारा Guaranteed Next-Day delivery सर्विस अंतर्गत 90 पेक्षा जास्त प्रोडक्ट्सचा समावेश केला आहे ज्यांची डिलीवरी प्रोडक्ट ऑर्डर केल्यांनतर पुढल्या दिवशी केली जाईल. या 150 शहरांची यादी कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध करवण्यात आहे. गॅरंटीड नेक्स्ट डे डिलीवरी अंतर्गत त्याच तेच प्रोडक्ट्स वर फास्ट डिलीवरीचा लाभ मिळेल जे मी डॉट कॉम वरून विकत घेतले जातील.

या आहेत अटी
Xiaomi च्या Guaranteed Next-Day delivery सर्विसचा लाभ घेण्यासाठी यूजर्सना कंपनीच्या वेबसाइट वरून कोणताही प्रोडक्ट दुपारी 3 बवाजल्याच्याआधी ऑर्डर करावा लागेल. या सर्विस अंतर्गत विकत घेतल्या जाणाऱ्या डिवाईसेज वर डिलीवरी साठी 49 रुपयांचा अतिरिक्स डिलीवरी चार्ज द्यावा लागेल. या नेक्स्ट डे डिलीवरी अंतर्गत सोमवार ते शुक्रवार पर्यंतच ऑर्डर करता येतील. शनिवार व रविवारच्या दिवशी तसेच सरकारी सुट्टीच्या दिवशी Guaranteed Next-Day delivery लागू नसेल.

विशेष म्हणजे जर Guaranteed Next-Day delivery सर्विस अंतर्गत स्मार्टफोन विकत घेतल्यावर दुसऱ्या दिवशी निर्धारित वेळेत प्रोडक्ट डिलीवर न झाल्यास Xiaomi कडून 49 रुपयांचा डिलीवरी चार्ज फ्री केला जाईल. तसेच हि ऑफर एक्सचेंज ऑडर्स वर लागू असणार नाही.

जाता जाता सांगू इच्छितो कि Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनी आपली के सीरीज लवकरच भारतात लॉन्च करेल. भारतात रेडमी के सीरीजचे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन Redmi K20 आणि Redmi K20 Pro घेऊन येणार आहे. जुलै महिन्यात Redmi K सीरीज इंडियन स्मार्टफोन बाजारात येईल.

The post Xiaomi चा दावा आता 24 तासांत होईल फोन डिलीवर, नाही झाला तर पैसे परत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-guaranteed-next-day-delivery-rs-49-india-150-cities/feed/ 0
87 लाखांचे शाओमी स्मार्टफोन चोरणारा पकडला गेला, जप्त केले 4,200 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/4200-xiaomi-smartphones-worth-rs-87-lakhs-recovered-in-delhi-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/4200-xiaomi-smartphones-worth-rs-87-lakhs-recovered-in-delhi-in-marathi/#respond Tue, 28 Aug 2018 13:01:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1847 मामला असा आहे की मे महिन्यात गुरुग्राम मधील शाओमी च्या वेयरहाउस मध्ये चोरी झाली होती.

The post 87 लाखांचे शाओमी स्मार्टफोन चोरणारा पकडला गेला, जप्त केले 4,200 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फोन चोरी चे कितीतरी किस्से तुम्ही ऐकले असतील. तुमच्या पैकी काहीजण असे असतील ज्यांचा स्वतःचा फोन पण चोरीला गेला असेल. काही लोकांचा फोन चोरी झाल्यानंतर पण मिळतो, पण अनेकांना प्रयत्न करून देखील फोन मिळत नाही. पण चोरी झालेल्या स्मार्टफोन्स संबधी एक असे प्रकरण समोर आले आहे ज्यात एक नव्हे तर चार हजार पेक्षा जास्त चोरी झालेले स्मार्टफोन्स जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व स्मार्टफोन शाओमी चे होते आणि चोरीच्या सामानाची किंमत 87 लाख रुपये आहे.

शाओमी स्मार्टफोन च्या चोरी संबधी ची ही घटना दिल्ली मधील आहे. मीडिया रिपोर्ट वरून समजले आहे की दिल्ली मध्ये एक व्यक्ति पकडला गेला आहे ज्याच्याकडून 4,200 शाओमी चे फोन जप्त करण्यात आले आहेत. चोरीच्या या मालाची किंमत 87 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. या मास्टर माइंड चोराचे नाव रमेश आहे जो बिहार चा रहिवाशी आहे.

मामला असा आहे की मे महिन्यात गुरुग्राम मधील शाओमी च्या वेयरहाउस मध्ये चोरी झाली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा पोलिसांकडे फिर्याद दिली होती ज्यानुसार शाओमी वेयरहाउस मधून 4,200 शाओमी चे स्मार्टफोन तसेच वॉशिंग मशीन आणि इतर अनेक शाओमी प्रोडक्ट पण चोरी झाले होते. आता पोलिसांनी तपासानंतर रमेश आणि त्यांच्या तीन साथीदारांना पकडले आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

रिपोर्ट नुसार चोरांकडून मिळालेल्या सामानात 4,200 शाओमी चे स्मार्टफोन्स आहेत आणि या स्मार्टफोन्स ची किंमत 87 लाख रुपये आहे. पोलिसांनी चोरट्यांना पकडल्या नंतर सांगितले की त्यांनी वेयरहाउस मधून चोरी झालेले सर्व शाओमी स्मार्टफोन्स जप्त केले आहेत.

The post 87 लाखांचे शाओमी स्मार्टफोन चोरणारा पकडला गेला, जप्त केले 4,200 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4200-xiaomi-smartphones-worth-rs-87-lakhs-recovered-in-delhi-in-marathi/feed/ 0
शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-design-feature-specification-price-first-impression-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-design-feature-specification-price-first-impression-in-marathi/#respond Wed, 08 Aug 2018 13:13:57 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1634 फोनचा 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट च्या किंमतीसाठी वाट बघावी लागेल.

The post शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शाओमी फॅन्स साठी कंपनी ने आज भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन मी ए2 लॉन्च केला आहे. मी ए2 लॉन्च सोबत शाओमी इंडिया ने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोनच्या संख्येत वाढ केली आहे. शाओमी ने मी ए2 चे दोन रॅम वेरिंएट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी मी ए2 येत्या 16 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन मी डॉट कॉम सोबतच शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

शाओमी मी ए2

डिजाईन
शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन चा बॅक पॅनल थोडा कर्व्ड आहे. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच कॅमेरा सेटअप जवळच फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बटन आणि वाल्यूम रॉकर उजव्या पॅनल वर आहेत तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि स्पीकर फोन च्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

डिस्प्ले
शाओमी ने मी ए2 स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले प्रोटेक्शन साठी हा गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे.

ओएस आणि प्रोसेसर
एकीकडे शाओमी चे सर्व फोन मीयूआई वर चालतात तर मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजेच यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्ष फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी
शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

रॅम आणि स्टोरेज
शाओमी ने भारतीय बाजारात मी ए2 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहेत. 4जीबी रॅम सोबत 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी रॅम वेरिएंट सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सिक्योरिटी व कनेक्टिविटी
मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत.

बॅटरी
शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.

किंमत
शाओमी मी ए2 गोल्ड, रोज गोल्ड, लेक ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिंट मध्ये विकत घेता येईल. फोनचा 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट च्या किंमतीसाठी वाट बघावी लागेल.

The post शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a2-india-launch-design-feature-specification-price-first-impression-in-marathi/feed/ 0
उद्या शाओमी साजरा करेल भारतात आपला चौथा वाढदिवस, फक्त 4 रुपयांमध्ये मिळेल रेडमी स्मार्टफोन आणि मी टीवी, जाणून घ्या कसे ते https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-4th-anniversary-sale-offers-discount-deals-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-4th-anniversary-sale-offers-discount-deals-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 13:00:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1199 शाओमी मी ऐनिवर्सरी सेल मध्ये एक्सचेंज ऑफर पण आहे ज्यात जुन्या स्मार्टफोन च्या बदल्यात नवीन स्मार्टफोन विकत घेता येईल.

The post उद्या शाओमी साजरा करेल भारतात आपला चौथा वाढदिवस, फक्त 4 रुपयांमध्ये मिळेल रेडमी स्मार्टफोन आणि मी टीवी, जाणून घ्या कसे ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतीय मोबाइल बाजारातील सर्वात मोठे नाव झाले आहे. देशात शाओमी चे फॅन्स लाखोंच्या संख्येने आहेत. शाओमी ला भारतात येऊन 4 वर्ष झाले आहेत आणि यावर्षी कंपनी आपला चौथा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने शाओमी कडून मी एनिवर्सरी सेल ची सुरवात करणार आहे जो उद्या म्हणजे 10 जुलै ला सुरू होऊन 12 जुलै पर्यंत चालू असेल.

शाओमी मी एनिवर्सरी सेल मध्ये कंपनी चे स्मार्टफोन्स, स्मार्ट टीवी, मी एक्सेसरीज, मी बँड 2 सारखे प्रोडक्ट्स आकर्षक ऑफर्स आणि चांगल्या डील्स सह सेल साठी उपलब्ध होतील. या सेल मध्ये शाओमी कंपनी चे काही डिवाइस साठी 4 रुपयांचा फ्लॅश सेल ठेवणार आहे. या फ्लॅश सेल मध्ये रेडमी नोट 5 प्रो, रेडमी वाय2, मी एलईडी स्मार्ट टीवी 4 55 इंच, मी बॉडी कंपोझिशन स्केल, रेडमी वाय2 आणि मी बँड 2 विकत घेता येतील. 4 रुपये वाला हा फ्लॅश सेल तिन दिवस संध्याकाळी 4 वाजता आयोजित होईल.

या सेल मध्ये संध्याकाळी 6 वाजता कॉम्बो ऑफर दिली जाईल. या आॅफर मध्ये मी बॉडी कंपोझिशन स्केल आणि मी बँड 2 3798 रुपयांच्या ऐवजी फक्त 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे रेडमी नोट 5 आणि मी वीआर प्ले 2 कॉम्बो 9,999 रुपये, रेडमी वाई1 आणि मी ब्लूटूथ हेडसेट 8,999 रुपये तसेच मी एयर प्यूरिफायर 2 आणि फिल्टर 11,498 रुपयांच्या ऐवजी फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळेल.

शाओमी मी ऐनिवर्सरी सेल मध्ये एक्सचेंज ऑफर पण आहे ज्यात जुन्या स्मार्टफोन च्या बदल्यात नवीन स्मार्टफोन विकत घेता येईल. तसेच 469 रुपयांच्या सुरवाती किंमतीत कंपनी मी प्रोटेक्ट ऑफर पण देत आहे. या सेल मध्ये 29 रुपयांमध्ये मोबाईल कवर सेल साठी असतील. विशेष म्हणजे शाओमी मी ऐनिवर्सरी सेल मध्ये एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 500 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. सेल मध्ये पेटीएम वरून खरेदी केल्यास 500 रुपयांचा कॅशबॅक तर मोबिक्विक वरून पे केल्यास अधिकतम 3,000 रूपयांची सुपरकॅश मिळेल.

शाओमी मी ऐनिवर्सरी सेल सोबत जोडले जाण्यासाठी इथे क्लिक करा

The post उद्या शाओमी साजरा करेल भारतात आपला चौथा वाढदिवस, फक्त 4 रुपयांमध्ये मिळेल रेडमी स्मार्टफोन आणि मी टीवी, जाणून घ्या कसे ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-4th-anniversary-sale-offers-discount-deals-in-marathi/feed/ 0
शाओमी ने भारतात सुरू केला 1,000वा सर्विस सेंटर, 600 शहरांमध्ये कंपनी देत आहे आपली सेवा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-now-has-1000-service-centres-in-600-cities-across-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-now-has-1000-service-centres-in-600-cities-across-india-in-marathi/#respond Wed, 20 Jun 2018 11:54:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=984 विशेष म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे जून 2017 मध्ये शाओमी ने बेंगलुरु मध्ये आपला 500वा सर्विस सेंटर बनावाला होता.

The post शाओमी ने भारतात सुरू केला 1,000वा सर्विस सेंटर, 600 शहरांमध्ये कंपनी देत आहे आपली सेवा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ब्रांड आज भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वात नावाजलेला ब्रांड बनला आहे. शाओमी स्मार्टफोन देशातील नंबर एक स्मार्टफोन च्या लिस्ट मध्ये आला आहे आणि कंपनी ची फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे. शाओमी चे फोन आज हातो हात विकले जातात. त्याचबरोबर शाओमी पण आपल्या कस्टमर्स ची खास काळजी घेते. कंपनी फक्त कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्मार्टफोन देत नाही तर यूजर्स साठी अनेक आर्कषक आॅफर्स पण घेऊन येते. तसेच आज शाओमी ने ही
घोषणा पण केली आहे की संपूर्ण भारतात शाओमी चे 1,000 सर्विस सेंटर स्थापित करण्यात आले आहेत.

शाओमी इंडिया ने प्रेस रिलीज जारी करून सांगितले की कंपनी ने देशात आपला 1,000वा सर्विस सेंटर पण उघडला आहे. शाओमी ने एक हजार सर्विस सेंटर चा हा आकडा हैदराबाद मध्ये नवीन सर्विस सेंटर उघडून पार केला आहे. या 1000व्या सर्विस सेंटर सह शाओमी आज देशातील 600 शहरांमध्ये यशस्वीरित्या आपले सर्विस सेंटर चालवत आहे. एक हजार सर्विस सेंटर sah कपंनी ने हे पण सांगितले आहे की कंपनी आता भारतात 500 अधिकृत मी टीवी सर्विस सेंटर पण सुरु केले आहेत.

विशेष म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे जून 2017 मध्ये शाओमी ने बेंगलुरु मध्ये आपला 500वा सर्विस सेंटर बनावाला होता. अशा प्रकारे एका वर्षात शाओमी ने 500 नवीन सर्विस सेंटर बनवले आहेत. एका वर्षातच भारतात शाओमी सर्विस सेंटर ची संख्या दुप्पट झाली आहे. तर दुसरीकडे शाओमी ने हे पण सांगितले आहे की भारतात कस्टमर सॅटिस्फॅक्शन च्या बाबतीत कंपनी ने 86 टक्के दर मिळवला आहे.

शाओमी ने सांगितले आहे की कंपनी आज सरासरी 4 तासांमध्ये 95 टक्के रिपेयर चे मामले सोडवते तसेच सरासरी 2 तासांमध्ये कंपनी कडून 84 टक्के यूजर्स च्या समस्यांचे समाधान यशस्वीरित्या केले जाते. शाओमी आपल्या काही स्मार्टफोंस मुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात टॉप वर आली आहे. अशात शाओमी स्मार्टफोन मध्ये आलेल्या समस्यांचे लवकरात लवकर समाधान देण्याच्या दृष्टीने कंपनी अनेक कामे करत आहे.

The post शाओमी ने भारतात सुरू केला 1,000वा सर्विस सेंटर, 600 शहरांमध्ये कंपनी देत आहे आपली सेवा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-now-has-1000-service-centres-in-600-cities-across-india-in-marathi/feed/ 0