शाओमी मी ए2 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि फुल स्पेसिफिकेशन्स

इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शाओमी फॅन्स साठी कंपनी ने आज भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन मी ए2 लॉन्च केला आहे. मी ए2 लॉन्च सोबत शाओमी इंडिया ने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोनच्या संख्येत वाढ केली आहे. शाओमी ने मी ए2 चे दोन रॅम वेरिंएट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. शाओमी मी ए2 येत्या 16 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन मी डॉट कॉम सोबतच शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

शाओमी मी ए2

डिजाईन
शाओमी ने आपला हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर केला आहे. फोन चा बॅक पॅनल थोडा कर्व्ड आहे. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच कॅमेरा सेटअप जवळच फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बटन आणि वाल्यूम रॉकर उजव्या पॅनल वर आहेत तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि स्पीकर फोन च्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

डिस्प्ले
शाओमी ने मी ए2 स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाची आईपीएस फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले प्रोटेक्शन साठी हा गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे.

ओएस आणि प्रोसेसर
एकीकडे शाओमी चे सर्व फोन मीयूआई वर चालतात तर मी ए2 कंपनी द्वारा एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला आहे. म्हणजेच यात तुम्हाला प्योर एंडरॉयड मिळेल. हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि पुढील दोन वर्ष फोन ला लेटेस्ट एंडरॉयड चा अपडेट मिळेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी
शाओमी मी ए2 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स486 प्राइमरी सेंसर आणि 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/1.75 अपर्चर वाले आहेत तसेच एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात. त्याचप्रमाणे सेल्फी साठी मी ए2 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स376 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या सेल्फी कॅमेरा मध्ये पण एआई टेक्नॉलजी आहे तसेच लो लाईट फोटोग्राफी साठी यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

रॅम आणि स्टोरेज
शाओमी ने भारतीय बाजारात मी ए2 दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. यात 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम आॅप्शन आहेत. 4जीबी रॅम सोबत 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी रॅम वेरिएंट सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सिक्योरिटी व कनेक्टिविटी
मी ए2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. डुअल सिम, 4जी वोएलटीई, वाईफाई व ब्लूटूथ 5.0 हे या फोन मध्ये कनेक्टिविटी आॅप्शन्स म्हणून उपलब्ध आहेत.

बॅटरी
शाओमी मी ए2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी क्विक चार्ज 4.0 सपोर्ट सह सादर करण्यात आली आहे.

किंमत
शाओमी मी ए2 गोल्ड, रोज गोल्ड, लेक ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिंट मध्ये विकत घेता येईल. फोनचा 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट च्या किंमतीसाठी वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here