शाओमी ने भारतात सुरू केला 1,000वा सर्विस सेंटर, 600 शहरांमध्ये कंपनी देत आहे आपली सेवा

शाओमी ब्रांड आज भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वात नावाजलेला ब्रांड बनला आहे. शाओमी स्मार्टफोन देशातील नंबर एक स्मार्टफोन च्या लिस्ट मध्ये आला आहे आणि कंपनी ची फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे. शाओमी चे फोन आज हातो हात विकले जातात. त्याचबरोबर शाओमी पण आपल्या कस्टमर्स ची खास काळजी घेते. कंपनी फक्त कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स वाले स्मार्टफोन देत नाही तर यूजर्स साठी अनेक आर्कषक आॅफर्स पण घेऊन येते. तसेच आज शाओमी ने ही
घोषणा पण केली आहे की संपूर्ण भारतात शाओमी चे 1,000 सर्विस सेंटर स्थापित करण्यात आले आहेत.

शाओमी इंडिया ने प्रेस रिलीज जारी करून सांगितले की कंपनी ने देशात आपला 1,000वा सर्विस सेंटर पण उघडला आहे. शाओमी ने एक हजार सर्विस सेंटर चा हा आकडा हैदराबाद मध्ये नवीन सर्विस सेंटर उघडून पार केला आहे. या 1000व्या सर्विस सेंटर सह शाओमी आज देशातील 600 शहरांमध्ये यशस्वीरित्या आपले सर्विस सेंटर चालवत आहे. एक हजार सर्विस सेंटर sah कपंनी ने हे पण सांगितले आहे की कंपनी आता भारतात 500 अधिकृत मी टीवी सर्विस सेंटर पण सुरु केले आहेत.

विशेष म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे जून 2017 मध्ये शाओमी ने बेंगलुरु मध्ये आपला 500वा सर्विस सेंटर बनावाला होता. अशा प्रकारे एका वर्षात शाओमी ने 500 नवीन सर्विस सेंटर बनवले आहेत. एका वर्षातच भारतात शाओमी सर्विस सेंटर ची संख्या दुप्पट झाली आहे. तर दुसरीकडे शाओमी ने हे पण सांगितले आहे की भारतात कस्टमर सॅटिस्फॅक्शन च्या बाबतीत कंपनी ने 86 टक्के दर मिळवला आहे.

शाओमी ने सांगितले आहे की कंपनी आज सरासरी 4 तासांमध्ये 95 टक्के रिपेयर चे मामले सोडवते तसेच सरासरी 2 तासांमध्ये कंपनी कडून 84 टक्के यूजर्स च्या समस्यांचे समाधान यशस्वीरित्या केले जाते. शाओमी आपल्या काही स्मार्टफोंस मुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात टॉप वर आली आहे. अशात शाओमी स्मार्टफोन मध्ये आलेल्या समस्यांचे लवकरात लवकर समाधान देण्याच्या दृष्टीने कंपनी अनेक कामे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here