Mi Pad 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 25 Jun 2018 08:47:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000एमएएच बॅटरी आणि 8-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला शाओमी मी पॅड 4 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pad-4-launched-with-redmi-6-pro-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pad-4-launched-with-redmi-6-pro-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 25 Jun 2018 08:47:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1038 सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर सपोर्ट आहे तर पावर बॅकअप साठी मी पॅड 4 मध्ये 6,000एमएएच ची ताकदवान बॅटरी देण्यात आली आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 8-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला शाओमी मी पॅड 4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आज चीन मध्ये ईवेंट आयोजित करून अंर्तराष्ट्रीय बाजारात दोन शानदार डिवाईस सादर केले आहेत. शाओमी ने एकीकडे आपल्या रेडमी सीरीज चा नवीन स्मार्टफोन रेडमी 6 प्रो लॉन्च केला आहे आणि दुसरीकडे आपली मी पॅड सीरीज पुढे नेत नवीन टॅबलेट मी पॅड 4 पण बाजारात आणला आहे. हे दोन्ही डिवाईस कंपनी ने कमी किंमतीत सादर केले आहेत ज्यात दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत. रेडमी 6 प्रो ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). मी पॅड 4 ची सविस्तर माहिती खाली दिली आहे :

मी पॅड 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर करण्यात आला आहे. या डिवाईस मध्ये 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 8-इंच की फुलएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी मी पॅड 4 मध्ये ऐड्रेनो 512 जीपीयू आहे.

शाओमी ने मी पॅड 4 दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी पॅड 4 च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

मी पॅड 4 मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व यूएसबी टाईप-सी सोबत 4जी सपोर्ट पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर सपोर्ट आहे तर पावर बॅकअप साठी मी पॅड 4 मध्ये 6,000एमएएच ची ताकदवान बॅटरी देण्यात आली आहे. मी पॅड 4 चा वाईफाई एडिशन 1,099 युआन (जवळपास 11,400 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर मी पॅड 4 च्या 4जी एलटीई एडिशन ची किंमत 1,499 युआन (जवळपास 15,600 रुपये) ठेवण्यात आली आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 8-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला शाओमी मी पॅड 4 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pad-4-launched-with-redmi-6-pro-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
लवकरच लॉन्च होऊ शकतो शाओमी मी पॅड 4, अनेक ​सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pad-4-listed-on-teena-and-fcc-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pad-4-listed-on-teena-and-fcc-in-marathi/#respond Fri, 15 Jun 2018 08:41:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=918 मी पॅड 4 चीन आणि अमेरिकेच्या अनेक सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

The post लवकरच लॉन्च होऊ शकतो शाओमी मी पॅड 4, अनेक ​सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी फोन व्यतिरिक्त यांची टॅबलेट सीरीज पण खुप लोकप्रिय आहे. कंपनी याला मी पॅड नावाने सादर करते. मी पॅड सीरीज मध्ये कपंनी ने आता पर्यंत तिन डिवाइस लॉन्च केले आहेत. तसेच आता मी पॅड 4 ची तयारी पण जोरात चालू आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी मी पॅड 3 च्या अपग्रेड वर्जन मी पॅड 4 वर काम करत आहे. तसेच आता या टॅबलेट संबंधी खास माहिती समोर आली आहे. मी पॅड 4 चीन आणि अमेरिकेच्या अनेक सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

हा टॅबलेट चीनी सर्टिफिकेशन साइट 3सी आणि चीन च्या खासगी सर्टिफिकेशन साइट एमआईआईटी वर दिसला आहे आणि 91मोबाईल्स ने सर्वात आधी याला स्पॉट केले आहे. त्याचबरोबर हा अमेरिकन सर्टिफिकेशन साइट एफसीसी वर पण लिस्ट करण्यात आला आहे. पण इथे टॅबलेट संबधी स्पेसिफिकेशन नाहीत परंतु मॉडेल नंबर दिसत आहे आणि त्यावरून अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच याला सादर करणार आहे.

या सर्व सर्टिफिकेशन साइट वर शाओमी मी पॅड 4 मॉडेल नंबर एम1806डी9डब्लयू नावाने लिस्ट करण्यात आला आहे. जास्त स्पेसिफिकेशन ची नाही पण सर्व जागी 5 वोल्ट च्या 2ए चार्जर ची माहिती समोर आली आहे. तसेच एफसीसी आणि एमआईआईटी वर कनेक्टिविटी बद्दल माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार शाओमी मी पॅड 4 मध्ये डुअल बँड वाईफाई सह ब्लूटूथ असेल.

विशेष म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल 2017 मध्ये शाओमी ने मी पॅड 3 चीन मध्ये लॉन्च केला होता. हा मॉडेल लॉन्च होऊन एका वर्षा पेक्षा जास्त काळ झाला आहे त्यामुळे अशा आहे की कंपनी लवकरच मी पॅड 4 लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

शाआमी मी पॅड 4 बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या टॅबलेट मध्ये तुम्हाला 6,000 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. कंपनी याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर सादर करू शकते आणि टॅबलेट मध्ये 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर असू शकतो. पण रॅम बद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण सांगण्यात आले आहे की या टॅबलेट मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट नसेल.

मी पॅड 4 मध्ये कंपनी 13—मेगापिक्सल चा कॅमेरा देऊ शकते आणि यात ओमनिवीजन ओवी13855 कॅमेरा सेंसर असू शकतो जो एफ/2.0 अपर्चर सह येऊ शकतो. तसेच सेल्फी साठी यात सॅमसंग एस5ाकेई8 कॅमेरा सेंसर चा वापर केला जाऊ शकतो जो एफ/2.0 एपर्चर सह येईल.

आधी मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी पॅड एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर केला जाऊ शकतो आणि यावेळी कंपनी आपल्या टॅबलेट मध्ये पण 18:9 आसपेक्ट रेशियो वाला डिस्प्ले देणार आहे.

The post लवकरच लॉन्च होऊ शकतो शाओमी मी पॅड 4, अनेक ​सर्टिफिकेशन साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-pad-4-listed-on-teena-and-fcc-in-marathi/feed/ 0