शाओमी फोन व्यतिरिक्त यांची टॅबलेट सीरीज पण खुप लोकप्रिय आहे. कंपनी याला मी पॅड नावाने सादर करते. मी पॅड सीरीज मध्ये कपंनी ने आता पर्यंत तिन डिवाइस लॉन्च केले आहेत. तसेच आता मी पॅड 4 ची तयारी पण जोरात चालू आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी मी पॅड 3 च्या अपग्रेड वर्जन मी पॅड 4 वर काम करत आहे. तसेच आता या टॅबलेट संबंधी खास माहिती समोर आली आहे. मी पॅड 4 चीन आणि अमेरिकेच्या अनेक सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.
हा टॅबलेट चीनी सर्टिफिकेशन साइट 3सी आणि चीन च्या खासगी सर्टिफिकेशन साइट एमआईआईटी वर दिसला आहे आणि 91मोबाईल्स ने सर्वात आधी याला स्पॉट केले आहे. त्याचबरोबर हा अमेरिकन सर्टिफिकेशन साइट एफसीसी वर पण लिस्ट करण्यात आला आहे. पण इथे टॅबलेट संबधी स्पेसिफिकेशन नाहीत परंतु मॉडेल नंबर दिसत आहे आणि त्यावरून अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच याला सादर करणार आहे.
या सर्व सर्टिफिकेशन साइट वर शाओमी मी पॅड 4 मॉडेल नंबर एम1806डी9डब्लयू नावाने लिस्ट करण्यात आला आहे. जास्त स्पेसिफिकेशन ची नाही पण सर्व जागी 5 वोल्ट च्या 2ए चार्जर ची माहिती समोर आली आहे. तसेच एफसीसी आणि एमआईआईटी वर कनेक्टिविटी बद्दल माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार शाओमी मी पॅड 4 मध्ये डुअल बँड वाईफाई सह ब्लूटूथ असेल.
विशेष म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल 2017 मध्ये शाओमी ने मी पॅड 3 चीन मध्ये लॉन्च केला होता. हा मॉडेल लॉन्च होऊन एका वर्षा पेक्षा जास्त काळ झाला आहे त्यामुळे अशा आहे की कंपनी लवकरच मी पॅड 4 लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
शाआमी मी पॅड 4 बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या टॅबलेट मध्ये तुम्हाला 6,000 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. कंपनी याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर सादर करू शकते आणि टॅबलेट मध्ये 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर असू शकतो. पण रॅम बद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण सांगण्यात आले आहे की या टॅबलेट मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट नसेल.
मी पॅड 4 मध्ये कंपनी 13—मेगापिक्सल चा कॅमेरा देऊ शकते आणि यात ओमनिवीजन ओवी13855 कॅमेरा सेंसर असू शकतो जो एफ/2.0 अपर्चर सह येऊ शकतो. तसेच सेल्फी साठी यात सॅमसंग एस5ाकेई8 कॅमेरा सेंसर चा वापर केला जाऊ शकतो जो एफ/2.0 एपर्चर सह येईल.
आधी मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी पॅड एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर केला जाऊ शकतो आणि यावेळी कंपनी आपल्या टॅबलेट मध्ये पण 18:9 आसपेक्ट रेशियो वाला डिस्प्ले देणार आहे.

















