6,000एमएएच बॅटरी आणि 8-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला शाओमी मी पॅड 4

शाओमी ने आज चीन मध्ये ईवेंट आयोजित करून अंर्तराष्ट्रीय बाजारात दोन शानदार डिवाईस सादर केले आहेत. शाओमी ने एकीकडे आपल्या रेडमी सीरीज चा नवीन स्मार्टफोन रेडमी 6 प्रो लॉन्च केला आहे आणि दुसरीकडे आपली मी पॅड सीरीज पुढे नेत नवीन टॅबलेट मी पॅड 4 पण बाजारात आणला आहे. हे दोन्ही डिवाईस कंपनी ने कमी किंमतीत सादर केले आहेत ज्यात दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत. रेडमी 6 प्रो ची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). मी पॅड 4 ची सविस्तर माहिती खाली दिली आहे :

मी पॅड 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर करण्यात आला आहे. या डिवाईस मध्ये 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 8-इंच की फुलएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी मी पॅड 4 मध्ये ऐड्रेनो 512 जीपीयू आहे.

शाओमी ने मी पॅड 4 दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी पॅड 4 च्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

मी पॅड 4 मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व यूएसबी टाईप-सी सोबत 4जी सपोर्ट पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर सपोर्ट आहे तर पावर बॅकअप साठी मी पॅड 4 मध्ये 6,000एमएएच ची ताकदवान बॅटरी देण्यात आली आहे. मी पॅड 4 चा वाईफाई एडिशन 1,099 युआन (जवळपास 11,400 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर मी पॅड 4 च्या 4जी एलटीई एडिशन ची किंमत 1,499 युआन (जवळपास 15,600 रुपये) ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here