MIUI 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Oct 2018 13:02:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी रेडमी नोट 5 प्रो यूजर्स साठी मोठी बातमी, फोनला मिळाला मीयूआई 10 चा सर्वात नवीन अपडेट, असा करा इंस्टाल https://www.91mobiles.com/marathi/miui-10-new-version-update-on-xiaomi-redmi-note-5-pro-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/miui-10-new-version-update-on-xiaomi-redmi-note-5-pro-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 13:02:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2624 जर तुम्हाला मीयूआई 10 चा ओटीए अपडेट मिळाला नसेल तर फोनच्या सेटिंग्स मधील अबाउट फोन मध्ये जाऊन सिस्टम अपडेट वर क्लिक करून उपलब्ध अपडेट मॅनुअली चेक करू शकता.

The post शाओमी रेडमी नोट 5 प्रो यूजर्स साठी मोठी बातमी, फोनला मिळाला मीयूआई 10 चा सर्वात नवीन अपडेट, असा करा इंस्टाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आपला आठवा वर्धापनदिन वेगळ्याच पद्धतीने साजरा केला होता. या निमित्ताने कंपनीने मी 8 स्मार्टफोन सीरीज लॉन्च करण्यासोबतच आपला सर्वात वेगवान आणि स्मार्ट यूजर इंटरफेस मीयूआई 10 पण सादर केला होता. मीयूआई 10 सप्टेंबर मधेच भारतात आला आहे आणि रेडमी नोट 5 व नोट 5 प्रो सारख्या स्मार्टफोन साठी जाहीर झाला आहे. तर आता शाओमी ने हा यूआई अजून एडवांस केला आहे. हा सर्वात नवीन व फास्ट अपडेट रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन वर रोलआउट झाला आहे. मीयूआई 10 च्या या अपडेटने रेडमी नोट 5 प्रो ची प्रोसेसिंग आणि वापर बदलला आहे.

शाओमी ने मीयूआई 10 चा हा नवीन अपडेट को मीयूआई फोरम वर सादर करण्यात आला आहे. फोरम वर मीयूआई 10 चा नवीन अपडेट V10.0.2.0.OEIMIFH सॉफ्टवेयर वर्जन नंबर सह दिसला आहे. भारतात रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन सध्या 10.0.1.0.OEIMIFH वर्जन वर चालत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मीयूआई10 च्या या नवीन अपडेट नंतर रेडमी नोट 5 प्रो मध्ये फेस अनलॉक आधीपेक्षा फास्ट होईल. तसेच फिंगरप्रिंट सेंसर च्या टच आणि रिस्पांसचा वेग वाढेल.

रेडमी नोट 5 प्रो वरील नवीन यूआई अपडेट बद्दल बोलले जात आहे कि हा फोनचा रॅम मॅनॅजमेन्ट आधीपेक्षा जास्त चांगला झाला आहे तसेच या अपडेटने 60 फ्रेम पर सेकेंड स्पीडने फुलएचडी वीडियो रेकॉर्डिंग करता येईल. मीयूआई 10 चा नवीन वर्जन फोन मधील बग्स ठीक करेल तसेच लॉक स्क्रीन, स्टेटस बार आणि नोटिफिकेशन्स बार वर येणारे नको असलेल्या नोटिफिकेशन्स पासून यूजर्सची सुटका करेल.

शाओमी मीयूआई फोरम वर नवीन अपडेट ची साइज 597एमबी सांगण्यात आली आहे. पण जर तुमच्या रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन मध्ये आधीपासूनच मीयूआई 10 असल्यास हा नवीन अपडेट फक्त 152एमबी साइज ने फोन मध्ये डाउनलोड होईल. शाओमी मीयूआई 10 चा नवीन अपडेट ओवर द एयर म्हणजे ओटीए च्या माध्यमातून रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन्सना देत आहे. आपल्या फोन मध्ये नवीन अपडेटची उपलब्धता जाणून घेण्यासाठी मीयूआई फोरम वर जा किंवा सिस्टम अपडेट चेक करा.

असा करा इंस्टाल

जर तुम्हाला मीयूआई 10 चा ओटीए अपडेट मिळाला नसेल तर फोनच्या सेटिंग्स मधील अबाउट फोन मध्ये जाऊन सिस्टम अपडेट वर क्लिक करून उपलब्ध अपडेट मॅनुअली चेक करू शकता.

तुमच्या फोन मध्ये मीयूआई 10 च्या नवीन वर्जनचा अपडेट आला असेल तर तो डाउनलोड करा.

फाईल डाउनलोड झाल्यावर इंस्टाल अपडेट वर क्लिक करा, तुमचा फोन आपोआप बूट मोड मध्ये जाईल.

काही मिनिटांत तुमचा शाओमी स्मार्टफोन कंपनीच्या लेटेस्ट यूजर इंटरफेस मीयूआई 10 च्या नवीन वर्जन वर अपडेट होईल.

लक्षात ठेवा नवीन अपडेट इंस्टाल होत असताना फोनची बॅटरी कमीत कमी 30 टक्के असावी.

The post शाओमी रेडमी नोट 5 प्रो यूजर्स साठी मोठी बातमी, फोनला मिळाला मीयूआई 10 चा सर्वात नवीन अपडेट, असा करा इंस्टाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/miui-10-new-version-update-on-xiaomi-redmi-note-5-pro-in-marathi/feed/ 0
शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 10:21:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=702 शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ला चीन ची अॅप्पल बोलले जाते. चीन च्या बाहेर भारतीय मोबाइल बाजारात पण ही कंपनी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. शाओमी ला जागतिक टेक बाजारात पाऊल ठेऊन 8 वर्ष झाली आणि कपंनी आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. खुप काळापासून वाट बघितली जात होती कि शाओमी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8 लॉन्च करेल याची, त्या नुसार आज कंपनी ने हा शानदार स्मार्टफोन जागासमोर आणला आहे. शाओमी मी 8 टेक बाजारात आला आहे.

शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे ज्यात फ्रंट पॅनल च्या डिस्प्ले खाली इनविजिबल फिंगर​प्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही. तसेच या फोन चा बॅक पॅनल पण पारदर्शक म्हणजे ट्रांसपेरेंट आहे, ज्यात फोन चे इंटरनल पार्ट्स पण बाहेरून बघता येतात. हा फोन 3डी फेस रेक्नेशन टेक्निक ला पण सपोर्ट करतो.

शाओमी मी 8 शाओमी द्वारा आजच सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. कंपनी कडून हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे जे 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करताता. तसेच मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेल्या डुअल रियर कॅमेरा आहे. यात 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे डुअल टोन एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर क्षमतेला सपोर्ट करतात. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो.

शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी स्मार्टफोन होतील अजून ताकदवान, येत आहे सुपर फास्ट आणि एडवांस ‘मीयूआई 10’, 31 मे ला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-fast-and-powerful-miui-10-official-on-31-may-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-fast-and-powerful-miui-10-official-on-31-may-in-marathi/#respond Thu, 24 May 2018 15:23:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=632 शाओमी च्या या नवीन यूजर इंटरफेस मीयूआई 10 ला ‘फास्टर दॅन लाइटिंग’ बोलले जात आहे.

The post शाओमी स्मार्टफोन होतील अजून ताकदवान, येत आहे सुपर फास्ट आणि एडवांस ‘मीयूआई 10’, 31 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी यावर्षी आपला आठवा वर्धापनदिन साजरा करत आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी कंपनी एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन वर काम करत आहे जो मी 8 नावाने लॉन्च केला जाईल. कंपनी ने सांगितले आहे की शाओमी येणार्‍या 31 मे ला चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करत आहे आणि या ईवेंट च्या माध्यमातुन कंपनी चा एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8 सादर केला जाईल. तर आता शाओमी कडून हे पण सांगण्यात आले आहे की कंपनी त्याचदिवशी आपला नवीन यूजर इंटरफेस मीयूआई 10 पण रोलआउट करणार आहे.

शाओमी ने घोषणा केली आहे की 31 मे ला होणार्‍या शाओमी च्या वार्षिक कार्यक्रमात कंपनी नवीन मीयूआई वर्जन लॉन्च करणार आहे शाओमी चा हा नवीन यूजर इंटरफेस खासकरून आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर आणि मशीन लर्निंग टेक्निक वर चालेल. शाओमी च्या या नवीन यूजर इंटरफेस मीयूआई 10 ला ‘फास्टर दॅन लाइटिंग’ बोलले जात आहे. म्हणजे कंपनी मीयूआई ला विजे पेक्षा वेगवान बोलून याच्या फास्ट प्रोसेसिंग कडे ईशारा करत आहे.

शाओमी मीयूआई 10 च्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर हा यूआई फक्त जल्द आणि स्मूथ प्रोसेसिंग करणार नाही तर एआई फीचर सह फोन चा कॅमेरा पण चांगला बनवेल. या यूजर इंटरफेस मध्ये बॅटरी सेविंग फीचर पण असेल त्याचबरोबर फेस रेक्ग्नेशन फीचर ला पण हा यूजर इंटरफेस फास्ट बनवेल. बोलले जात आहे की मी 8 स्मार्टफोन मीयूआई 10 सोबत लॉन्च होईल आणि त्यामुळे हा फोन 3डी फेस सेंसिंग टेक्निक ला पण सपोर्ट करेल.

माहितीनुसार मीयूआई 10 एंडरॉयड 6.0 मार्शमेलो आणि त्यावरील वर्जन वर चालेल. तर दुसरीकडे ही बातमी पण आली आहे की आपल्या नवीन यूजर इंटरफेस मुळे शाओमी ने मीयूआई 9 च्या डेवलपमेंट चे काम बंद केले आहे. शाओमी चा नवीन यूजर इंटरफेस मीयूआई 10 31 मे नंतर कोणत्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात आधी रोलआउट करेल आणि भारतात कधी पर्यंत हा शाओमी स्मार्टफोन वर येईल, याची माहिती तुम्हाला लवकरच दिली जाईल.

The post शाओमी स्मार्टफोन होतील अजून ताकदवान, येत आहे सुपर फास्ट आणि एडवांस ‘मीयूआई 10’, 31 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-fast-and-powerful-miui-10-official-on-31-may-in-marathi/feed/ 0