शाओमी ला चीन ची अॅप्पल बोलले जाते. चीन च्या बाहेर भारतीय मोबाइल बाजारात पण ही कंपनी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. शाओमी ला जागतिक टेक बाजारात पाऊल ठेऊन 8 वर्ष झाली आणि कपंनी आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. खुप काळापासून वाट बघितली जात होती कि शाओमी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8 लॉन्च करेल याची, त्या नुसार आज कंपनी ने हा शानदार स्मार्टफोन जागासमोर आणला आहे. शाओमी मी 8 टेक बाजारात आला आहे.
शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे ज्यात फ्रंट पॅनल च्या डिस्प्ले खाली इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही. तसेच या फोन चा बॅक पॅनल पण पारदर्शक म्हणजे ट्रांसपेरेंट आहे, ज्यात फोन चे इंटरनल पार्ट्स पण बाहेरून बघता येतात. हा फोन 3डी फेस रेक्नेशन टेक्निक ला पण सपोर्ट करतो.
शाओमी मी 8 शाओमी द्वारा आजच सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. कंपनी कडून हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे जे 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करताता. तसेच मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेल्या डुअल रियर कॅमेरा आहे. यात 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे डुअल टोन एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर क्षमतेला सपोर्ट करतात. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो.
शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.