Mobile Tips And Tricks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 17 Jun 2023 15:31:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 WiFi चा पासवर्ड कसा शोधायचा; मोबाइल आणि कंप्यूटरवरच्या 2 सोप्या पद्धती https://www.91mobiles.com/marathi/wifi-cha-password-kasa-shodhu-how-to-know-wifi-password/ https://www.91mobiles.com/marathi/wifi-cha-password-kasa-shodhu-how-to-know-wifi-password/#respond Sat, 17 Jun 2023 04:04:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21128 ह्या लेखात आम्ही तुम्हाला Mobile आणि Windows कंप्यूटरवरून WiFi पासवर्ड कसा शोधायचा हे सांगणार आहोत. कारण WiFi पासवर्ड आपण रोज वापरत नाही त्यामुळे विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा डिवाइस फॉर्मेट करता किंवा एखादा नवीन डिवाइस आला तर वायफाय पासवर्ड आठवावा लागतो. त्याहीपेक्षा वायफाय पासवर्डची जास्त गरज मित्र किंवा नातेवाईक आल्यावर त्यांना कनेक्शन देण्यासाठी असते. तेव्हा […]

The post WiFi चा पासवर्ड कसा शोधायचा; मोबाइल आणि कंप्यूटरवरच्या 2 सोप्या पद्धती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ह्या लेखात आम्ही तुम्हाला Mobile आणि Windows कंप्यूटरवरून WiFi पासवर्ड कसा शोधायचा हे सांगणार आहोत. कारण WiFi पासवर्ड आपण रोज वापरत नाही त्यामुळे विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा डिवाइस फॉर्मेट करता किंवा एखादा नवीन डिवाइस आला तर वायफाय पासवर्ड आठवावा लागतो. त्याहीपेक्षा वायफाय पासवर्डची जास्त गरज मित्र किंवा नातेवाईक आल्यावर त्यांना कनेक्शन देण्यासाठी असते. तेव्हा पासवर्ड देण्यासाठी तुम्हाला रिसेट करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्सच्या माध्यमातून WiFi Password शोधायला शिकवणार आहोत.

वायफायचा पासवर्ड कसा शोधायचा?

आम्ही इथे ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीनं तुम्ही विंडोज कंप्यूटर आणि अँड्रॉइड फोनवरून वायफाय पासवर्ड पाहू शकता. एक गोष्ट लक्षात असू दे की ही ट्रिक वायफाय पासवर्ड चोरण्याची पद्धत नाही तर तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील वायफाय पासवर्ड विसरल्यास पाहण्याची पद्धत आहे.

कंप्यूटरमधून कसा पाहायचा WiFi चा पासवर्ड

कंप्यूटरवरून वायफाय पासवर्ड शोधण्याची पद्धत सोपी आहे आणि सर्वात खास बाब म्हणजे ह्यासाठी तुम्हाला कोणतंही वेगळं सॉफ्टवेयर इंस्टॉल करण्याची गरज नाही. फक्त CMD commands वापरून तुम्ही पासवर्ड जाणून घेऊ शकता. ज्या वायफायशी तुमचा कंप्यूटर कनेक्ट असेल त्याचा पासवर्ड जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला

स्टेप 1: तुमच्या विंडोज कंप्यूटरवर Command Prompt ओपन करा. तुम्ही ह्यासाठी शॉर्टकट की Windows + R चा वापर करू शकता.

स्टेप 2: किंवा सर्च बार ओपन झाल्यावर तुम्ही CMD लिहून एंटर करू शकता.

स्टेप 3: त्याचबरोबर कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. आता तुम्हाला netsh wlan show profile लिहावं लागेल किंवा कॉपी करून पेस्ट करा.

स्टेप 4: हे लिहिताच तुमच्या कंप्यूटरशी कनेक्टेड सर्व WiFi चं नाव समोर येईल.

स्टेप 5: इथे Command Prompt वर NETSH WLAN SHOW PROFILE ABC KEY=CLEAR लिहा. पण ABC च्या जागी तुम्हाला त्या वायफायचं नाव लिहावं लागेल ज्याचा वायफाय पासवर्ड तुम्हाला हवा आहे.

स्टेप 6: ही कमांड टाकताच तुमच्या कंप्यूटर स्क्रीनवर बरीच माहिती येईल आणि इथे तुम्हाला कनेक्टच्या समोर तुमच्या WiFi चा पासवर्ड दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही विंडोज कंप्यूटरमधून तुमच्या WiFi चा पासवर्ड शोधू शकता.

मोबाइलवरून कसा शोधायचा WiFi चा पासवर्ड

मोबाइलवरून WiFi चा पासवर्ड शोधणं सोपं आहे. ह्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1: तुमच्या फोन सेटिंगमध्ये जा.

स्टेप 2: इथे कनेक्शनची निवड करा.

स्टेप 3: त्यानंतर WiFi वर क्लिक करा.

स्टेप 4: वायफायवर क्लिक करताच फोनवर ते सर्व वायफाय नेटवर्क दिसतील जे उपलब्ध आहेत. ह्यातून कनेक्टेड वायफाय ज्याचा तुम्हाला पासवर्ड हवा आहे त्याच्या सेटिंगमध्ये जा.

स्टेप 5: इथून वायफाय शेयर किंवा अनेक फोनमध्ये थेट QR चा ऑप्शन खाली दिसतो. त्यावर क्लिक करा. तसेच QR च्या खाली तुम्हाला वायफाय मिळेल.

स्टेप 6: सॅमसंग आणि मी सहित अनेक कंपन्यांनी फोनमध्ये QR कोड मधून वायफाय पासवर्ड हटवला आहे. त्यामुळे तुम्ही गुगल लेन्सच्या मदतीनं हे स्कॅन करू शकता. गुगल लेन्स द्वारे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला खाली वायफाय पासवर्ड दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाइल आणि कंप्यूटरवरून वाय-फाय पासवर्ड शोधू शकता.

The post WiFi चा पासवर्ड कसा शोधायचा; मोबाइल आणि कंप्यूटरवरच्या 2 सोप्या पद्धती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/wifi-cha-password-kasa-shodhu-how-to-know-wifi-password/feed/ 0
कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत https://www.91mobiles.com/marathi/navin-android-phone-kasa-set-karayacha/ https://www.91mobiles.com/marathi/navin-android-phone-kasa-set-karayacha/#respond Wed, 07 Jun 2023 08:43:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21446 कीपॅड असलेले फोन वापरणं सोपं आहे, ह्यात दुमत नाही. फक्त फोनमध्ये सिम टाका, तो ओपन केला आणि काम सुरु. परंतु आता अँड्रॉइड स्मार्टफोनचं युग आलं आहे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा फोन सेट करण्याची पद्धत फीचर फोनपेक्षा वेगळी असते. जी समजण्यासाठी वेळ लागतो आणि आजच्या लेखात आम्ही तुम्हाला नवीन […]

The post कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कीपॅड असलेले फोन वापरणं सोपं आहे, ह्यात दुमत नाही. फक्त फोनमध्ये सिम टाका, तो ओपन केला आणि काम सुरु. परंतु आता अँड्रॉइड स्मार्टफोनचं युग आलं आहे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा फोन सेट करण्याची पद्धत फीचर फोनपेक्षा वेगळी असते. जी समजण्यासाठी वेळ लागतो आणि आजच्या लेखात आम्ही तुम्हाला नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन सेट करण्याची पद्धत सांगणार आहोत.

नवीन स्मार्टफोन सेट करण्याची पद्धत

नवीन अँड्रॉइड फोन सेटअपमध्ये तुम्हाला तीन प्रोसेस पूर्ण कराव्या लागतात. पहिली प्रोसेस बेसिक सेटअप, दूसरी इंटरनेट सेटअप आणि तीसरी प्रक्रिया आहे ईमेल आयडी सेटअप. सर्वप्रथम बेसिक सेटअपबद्धल जाणून घेऊया.

बेसिक सेटअप

जेव्हा तुम्ही नवीन अँड्रॉइड फोन घेता तेव्हा रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला फोनसह, चार्जर, केबल, एक पिन ज्याला सिम इजेक्टर टूल म्हणतात आणि काही डॉक्यूमेंट मिळतात. आता फोनमध्ये वेगळी बॅटरी मिळत नाही. फोनमध्ये बॅटरी आधीपासूनच असते. त्यामुळे फोन बाॅक्समधून काढल्यानंतर

स्टेप 1 : सर्वप्रथम बॉक्समधील सिम इजेक्टर टूल द्वारे फोन सिम ट्रे काढा. फोनमध्ये सिम ट्रे साइड पॅनल किंवा खालच्या बाजूला दिला असेल.

स्टेप 2 : सिम ट्रे च्या बाजूला एक छोटासा होल असेल ज्यात पिननं प्रेस केल्यावर ट्रे बाहेर येईल.

स्टेप 3 : सिम ट्रे मध्ये सिमसाठी खाचा बनवलेला असतो ज्यात सिम ठेऊन ट्रे बंद करा. एकदा सिम चांगल्याप्रकारे लागला तर फोन ऑन करा. पावर बटन फोनच्या साइड पॅनलवर असतं. इथून तुम्ही फोन ऑन करता येतो.

इंटरनेट सेटअप

एकदा फोन ऑन झाला की डेटा म्हणजे इंटरनेट सेटअप करावं लागेल. तुम्ही इंटरनेटविना देखील फोन ऑन करू शकता परंतु इंटरनेटविना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरण्यात मजा येणार नाही. त्यामुळे जेव्हा फोन ऑन होईल तेव्हा सर्वप्रथम तुमच्या पसंतीची भाषा निवडण्यास सांगितलं जाईल.

स्टेप 1 : फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला स्टार्ट लिहलेलं दिसेल त्यावर इंग्रजी शब्द लिहलेला दिसेल त्याच्या बाजुंच्या बाणावर टच केल्यास सर्व भाषांचे पर्याय तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही तुमच्या आवडीची भासह निवडू शकता.

स्टेप 2 : भाषा निवडल्यानंतर तुमच्या समोर काही दिशा निर्देश येतील जे वाचून तुम्हाला मान्य करून पुढे जावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला जुन्या फोनमधून डेटा काॅपी करायचं आहे की नाही ते विचारलं जाईल. जर तुमच्याकडे आधी अँड्रॉइड फोन किंवा आयफोन असेल तर डेटा ट्रांसफर करता येईल. परंतु पहिल्यांदा अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्ही स्किप करू शकता.

स्टेप 4 : त्यानंतर तुम्हाला वायफाय नेटवर्क सेटअप करण्याचा पर्याय दिसेल. जर तुमच्या घरी वायफाय सर्व्हिस असेल तर तुम्ही सेटअप करून घेऊ शकता अन्यथा स्किपवर क्लिक करून पुढे जाता येईल.

स्टेप 5 : वायफाय सेट करण्यासाठी स्क्रीनवरील वायफाय लिस्टमधून तुमच्या घरातील वायफायवर क्लिक करून पासवर्ड टाकून वायफाय सेट करा. वायफाय नसेल तर फोन आपोआप मोबाइल डेटावर शिफ्ट होईल.

स्टेप 6 : अशाप्रकारे तुमचा फोन सेटअप होण्यास थोडा वेळ लागेल आणि थोड्या वेळात स्क्रीनवर जुन्या फोनमधून अ‍ॅप्लिकेशन आणि डेटा कॉपी करण्याचा मेसेज येईल. परंतु तुम्ही नवीन फोन सेटअप करत असल्यामुळे तुम्ही हे देखील स्किप करू शकता.

ईमेल आयडी सेटअप

वरील प्रोसेस पूर्ण झाल्यावर ईमेल आयडी सेटअप करण्याची वेळ येईल. जर तुम्ही अँड्रॉइड फोन सेटअप करत असाल तर गुगल आयडी योग्य ठरेल. कारण आयडी सेटअप करून तुम्ही स्मार्ट फीचर्स जसे की अ‍ॅप, ईमेल आणि गेम इत्यादी वापरू शकाल. नाही तर हा एख्याद्या सामान्य फोनप्रमाणे वापरता येईल. म्हणून

स्टेप 1 : जेव्हा तुम्ही पुढे जात तेव्हा गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करण्याचा पर्याय मिळतो. त्यामुळे जर तुमच्याकडे आधीपासून गुगलचं अकाऊंट असेल तर ह्यात तुमचा आयडी टाका आणि पासवर्ड टाकून साइन इन करा म्हणजे फोन सेट होईल. परंतु जर गुगलचं अकाऊंट नसेल तर अकाऊंट बनवण्याचा ऑप्शन निवडा.

स्टेप 2 : इथे तुम्ही तुमच्या नावानं अकाऊंट बनवू शकता किंवा मोबाइल नंबरनं देखील गुगल अकाऊंट बनवता येईल.

स्टेप 3 : नवीन अकाऊंट बनवताना तुमचं नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती विचारली जाईल आणि मग एक ओटीपी तुमच्या फोन नंबरवर येईल.

स्टेप 4 : त्यानंतर अकाऊंटसाठी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता.

स्टेप 5 : गुगल अकाऊंट बनवल्यानंतर गुगल सेवांसाठी काही दिशा निर्देश येतील आणि ते मान्य केल्यावर तुम्हाला पिन, पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक सारख्या सिक्योरिटी मधू एकाची निवड करावी लागेल.

स्टेप 6 : हे वगळता येईल परंतु फोनच्या सुरक्षेसाठी सिक्योरिटी सेटअप आवश्यक आहे.

स्टेप 7 : पिन पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला थीम सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. आवडीची थीम सेट करून पुढे जा म्हणजे तुमचा फोन सेट होईल.

त्यानंतर थोड्यावेळाने फोन सेट होऊन वापरण्यासाठी सज्ज होईल. आता तुम्ही तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू शकता.

The post कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/navin-android-phone-kasa-set-karayacha/feed/ 0