कसा करायचा नवीन अँड्रॉइड फोन सेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

कीपॅड असलेले फोन वापरणं सोपं आहे, ह्यात दुमत नाही. फक्त फोनमध्ये सिम टाका, तो ओपन केला आणि काम सुरु. परंतु आता अँड्रॉइड स्मार्टफोनचं युग आलं आहे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा फोन सेट करण्याची पद्धत फीचर फोनपेक्षा वेगळी असते. जी समजण्यासाठी वेळ लागतो आणि आजच्या लेखात आम्ही तुम्हाला नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन सेट करण्याची पद्धत सांगणार आहोत.

नवीन स्मार्टफोन सेट करण्याची पद्धत

नवीन अँड्रॉइड फोन सेटअपमध्ये तुम्हाला तीन प्रोसेस पूर्ण कराव्या लागतात. पहिली प्रोसेस बेसिक सेटअप, दूसरी इंटरनेट सेटअप आणि तीसरी प्रक्रिया आहे ईमेल आयडी सेटअप. सर्वप्रथम बेसिक सेटअपबद्धल जाणून घेऊया.

बेसिक सेटअप

जेव्हा तुम्ही नवीन अँड्रॉइड फोन घेता तेव्हा रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला फोनसह, चार्जर, केबल, एक पिन ज्याला सिम इजेक्टर टूल म्हणतात आणि काही डॉक्यूमेंट मिळतात. आता फोनमध्ये वेगळी बॅटरी मिळत नाही. फोनमध्ये बॅटरी आधीपासूनच असते. त्यामुळे फोन बाॅक्समधून काढल्यानंतर

स्टेप 1 : सर्वप्रथम बॉक्समधील सिम इजेक्टर टूल द्वारे फोन सिम ट्रे काढा. फोनमध्ये सिम ट्रे साइड पॅनल किंवा खालच्या बाजूला दिला असेल.

स्टेप 2 : सिम ट्रे च्या बाजूला एक छोटासा होल असेल ज्यात पिननं प्रेस केल्यावर ट्रे बाहेर येईल.

स्टेप 3 : सिम ट्रे मध्ये सिमसाठी खाचा बनवलेला असतो ज्यात सिम ठेऊन ट्रे बंद करा. एकदा सिम चांगल्याप्रकारे लागला तर फोन ऑन करा. पावर बटन फोनच्या साइड पॅनलवर असतं. इथून तुम्ही फोन ऑन करता येतो.

इंटरनेट सेटअप

एकदा फोन ऑन झाला की डेटा म्हणजे इंटरनेट सेटअप करावं लागेल. तुम्ही इंटरनेटविना देखील फोन ऑन करू शकता परंतु इंटरनेटविना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरण्यात मजा येणार नाही. त्यामुळे जेव्हा फोन ऑन होईल तेव्हा सर्वप्रथम तुमच्या पसंतीची भाषा निवडण्यास सांगितलं जाईल.

स्टेप 1 : फोनच्या स्क्रीनवर तुम्हाला स्टार्ट लिहलेलं दिसेल त्यावर इंग्रजी शब्द लिहलेला दिसेल त्याच्या बाजुंच्या बाणावर टच केल्यास सर्व भाषांचे पर्याय तुमच्यासमोर येतील आणि तुम्ही तुमच्या आवडीची भासह निवडू शकता.

स्टेप 2 : भाषा निवडल्यानंतर तुमच्या समोर काही दिशा निर्देश येतील जे वाचून तुम्हाला मान्य करून पुढे जावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला जुन्या फोनमधून डेटा काॅपी करायचं आहे की नाही ते विचारलं जाईल. जर तुमच्याकडे आधी अँड्रॉइड फोन किंवा आयफोन असेल तर डेटा ट्रांसफर करता येईल. परंतु पहिल्यांदा अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुम्ही स्किप करू शकता.

स्टेप 4 : त्यानंतर तुम्हाला वायफाय नेटवर्क सेटअप करण्याचा पर्याय दिसेल. जर तुमच्या घरी वायफाय सर्व्हिस असेल तर तुम्ही सेटअप करून घेऊ शकता अन्यथा स्किपवर क्लिक करून पुढे जाता येईल.

स्टेप 5 : वायफाय सेट करण्यासाठी स्क्रीनवरील वायफाय लिस्टमधून तुमच्या घरातील वायफायवर क्लिक करून पासवर्ड टाकून वायफाय सेट करा. वायफाय नसेल तर फोन आपोआप मोबाइल डेटावर शिफ्ट होईल.

स्टेप 6 : अशाप्रकारे तुमचा फोन सेटअप होण्यास थोडा वेळ लागेल आणि थोड्या वेळात स्क्रीनवर जुन्या फोनमधून अ‍ॅप्लिकेशन आणि डेटा कॉपी करण्याचा मेसेज येईल. परंतु तुम्ही नवीन फोन सेटअप करत असल्यामुळे तुम्ही हे देखील स्किप करू शकता.

ईमेल आयडी सेटअप

वरील प्रोसेस पूर्ण झाल्यावर ईमेल आयडी सेटअप करण्याची वेळ येईल. जर तुम्ही अँड्रॉइड फोन सेटअप करत असाल तर गुगल आयडी योग्य ठरेल. कारण आयडी सेटअप करून तुम्ही स्मार्ट फीचर्स जसे की अ‍ॅप, ईमेल आणि गेम इत्यादी वापरू शकाल. नाही तर हा एख्याद्या सामान्य फोनप्रमाणे वापरता येईल. म्हणून

स्टेप 1 : जेव्हा तुम्ही पुढे जात तेव्हा गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करण्याचा पर्याय मिळतो. त्यामुळे जर तुमच्याकडे आधीपासून गुगलचं अकाऊंट असेल तर ह्यात तुमचा आयडी टाका आणि पासवर्ड टाकून साइन इन करा म्हणजे फोन सेट होईल. परंतु जर गुगलचं अकाऊंट नसेल तर अकाऊंट बनवण्याचा ऑप्शन निवडा.

स्टेप 2 : इथे तुम्ही तुमच्या नावानं अकाऊंट बनवू शकता किंवा मोबाइल नंबरनं देखील गुगल अकाऊंट बनवता येईल.

स्टेप 3 : नवीन अकाऊंट बनवताना तुमचं नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती विचारली जाईल आणि मग एक ओटीपी तुमच्या फोन नंबरवर येईल.

स्टेप 4 : त्यानंतर अकाऊंटसाठी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता.

स्टेप 5 : गुगल अकाऊंट बनवल्यानंतर गुगल सेवांसाठी काही दिशा निर्देश येतील आणि ते मान्य केल्यावर तुम्हाला पिन, पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक सारख्या सिक्योरिटी मधू एकाची निवड करावी लागेल.

स्टेप 6 : हे वगळता येईल परंतु फोनच्या सुरक्षेसाठी सिक्योरिटी सेटअप आवश्यक आहे.

स्टेप 7 : पिन पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला थीम सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. आवडीची थीम सेट करून पुढे जा म्हणजे तुमचा फोन सेट होईल.

त्यानंतर थोड्यावेळाने फोन सेट होऊन वापरण्यासाठी सज्ज होईल. आता तुम्ही तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here