Moto E7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k12-global-variant-render-leak-as-re-branded-motorola-moto-e7/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k12-global-variant-render-leak-as-re-branded-motorola-moto-e7/#respond Fri, 18 Dec 2020 17:19:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9378 Motorola संबंधित हि बातमी टिपस्टर सुधांशूने शेयर केली आहे. या टिपस्टरने Lenovo K12 स्मार्टफोनच्या रेंडर इंटरनेट वर अपलोड केले आहेत जे लुक आणि डिजाईन मध्ये पूर्णपणे मोटो ई7 स्मार्टफोन सारखे आहेत.

The post स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo ने काही दिवसांपूर्वी चीनी बाजारात आपला कमी किंमत असलेला स्मार्टफोन Lenovo K12 लाॅन्च केला होता. तसेच दुसरीकडे लेनोवो द्वारे अधिकृत Motorola ने पण यूरोप मध्ये लो बजेट स्मार्टफोन Moto E7 आणला होता. या दोन्ही ब्रँड्सने आपल्या फोनच्या इंडिया लाॅन्च बद्दल सध्या कोणतीही माहिती दिली नाही. पण एका ताजा रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि मोटोरोला कंपनी लवकरच भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये मोटो ई7 स्मार्टफोन लाॅन्च करू शकते आणि लीकनुसार मोटोरोलाचा हा फोन लेनोवो के12 नावाने बाजारात उपलब्ध होईल.

Motorola संबंधित हि बातमी टिपस्टर सुधांशूने शेयर केली आहे. या टिपस्टरने Lenovo K12 स्मार्टफोनच्या रेंडर इंटरनेट वर अपलोड केले आहेत जे लुक आणि डिजाईन मध्ये पूर्णपणे मोटो ई7 स्मार्टफोन सारखे आहेत. रेंडर ईमेज शेयर करण्यासोबतच लीक मध्ये दावा केला गेला आहे कि लेनोवो के12 चा जो मॉडेल चीनच्या बाहेर ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल तसेच यूरोप मध्ये लाॅन्च झाले Moto E7 स्मार्टफोनचा रिब्रँडिड वर्जन असेल. हा फोन भारतीय बाजारात कधी एंट्री घेईल हे समजले नाही.

Moto E7

मोटो ई7 पाहता हा फोन को वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर सादर केला गेला आहे, ज्यात रुंद चिन असलेला नॅरो बेजल्स डिस्प्ले देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मध्यभागी चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली Motorola लोगो असलेला रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. मोटो ई7 स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे.

हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन

कंपनीने फोटोग्राफीसाठी Moto E7 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात पहला 48MP चा प्राइमरी सेंसर आणि दुसरी 2MP ची मॅक्रो लेंस आहे. सोबतच या हँडसेट मध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फीचर पाहता मोटो ई7 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सह येते. तसेच फोन कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.0, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारख्या फीचरला सपोर्ट मिळाला आहे.

Moto E7 स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. तसेच मोटो ई7 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसर, 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो एसडी कार्डची जागा देण्यात आली आहे. Moto E7 स्मार्टफोन यूरोप मध्ये 119.99 यूरो (जवळपास 10,550 रुपये) आहे. हा डिवाइस ग्राहकांसाठी Aqua Blue, Mineral Gray आणि Satin Coral कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

The post स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k12-global-variant-render-leak-as-re-branded-motorola-moto-e7/feed/ 0
Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-image-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-image-specs-leaked/#respond Thu, 12 Nov 2020 14:05:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8931 Moto E7 च्या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत स्वस्त Moto E7 Plus लॉन्च केला होता. हा फोन फक्त 9,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो 5,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोटो ई7 प्लसच्या लॉन्च नंतर चर्चा सुरु झाली आहे कि कंपनी या सीरीजचा अजून एक स्वस्त स्मार्टफोन Moto E7 नावाने आणण्याची तयारी करत आहे. मोटो ई7 संबंधित अनेक लीक्स मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले आहेता, तसेच आज बाजारात येण्याआधी Moto E7 स्मार्टफोनचे फोटोज पण इंटरनेट वर वायरल झाले आहेत.

Moto E7 च्या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे. मोटो ई7 वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे ज्यात रुंद चिन पार्ट असलेला नॅरो बेजल्स डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मधोमध चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली Motorola लोगो असलेला रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. मोटो ई7 स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे.

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि यह Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये राईट पॅनल वर जिथे वॉल्यूम रॉकर दाखवण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर गुगल अस्सिटेंट बटन आहे. लीकनुसार हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च होईल. तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलच्या दोन कॅमेरा सेंसर्स तसेच फ्रंट पॅनल वर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाईल. Moto E7 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होणार असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे.

Moto E7 Plus

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस पाहता हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टला स्पर्श करतात तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये आला आहे.

Moto E7 Plus ने अँड्रॉइड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E7 लॉन्चच्या आधीच आला समोर, 4000एमएएच बॅटरी सह येईल 48एमपी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-image-specs-leaked/feed/ 0
लॉन्चच्या आधी वेबसाइट वर समोर आला स्वस्त Moto E7 स्मार्टफोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-fcc-nbtc-tuv-certifications-battery-capacity-and-charging-support/ https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-fcc-nbtc-tuv-certifications-battery-capacity-and-charging-support/#respond Fri, 30 Oct 2020 14:01:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8739 Moto E7 ची किंमत यूरोपीयन मार्केट मध्ये €120 (जवळपास 10,400 रुपये) असेल. स्मार्टफोन आधी 6.2 इंचाच्या एचडी + एलसीडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह येण्याची अफवा होती. Moto E7 मध्ये मागच्या बाजूला 12MP + 2MP चा डुअल कॅमेरा सेटअप आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा पण दिला जाऊ शकतो.

The post लॉन्चच्या आधी वेबसाइट वर समोर आला स्वस्त Moto E7 स्मार्टफोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘मोटो ई’ सीरीज अंतगर्त Moto E7 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. तसेच अनेक दिवसांपासुन माहिती समोर येत आहे कि कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो Moto E7 नावाने येईल. आतापर्यंत या डिवाइसच्या लॉन्चची माहिती दिली नाही. पण मोटो ई7 ऑफिशियल होण्याआधी याची बरीच माहिती समोर आली आहे. तसेच आता Moto E7 मॉडेल नंबर XT2095-3 सह FCC, NBTC आणि TUV सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला आहे.

स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून अफवा येत आहेत. पण आतापर्यंत डिवाइसच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण या लेटेस्ट सर्टिफिकेशन्स वरून वाटत आहे कि डिवाइस लवकरच लॉन्च होऊ शकतो. 91mobiles ने यावर्षी जुलै मध्ये फोनची एक्सक्लूसिव इमेज शेयर केली होती. तसेच आम्ही Moto E7 च्या यूरपोयिन प्राइसची माहिती दिली होती. आता Moto E7 के FCC, NBTC आणि TUV वर डिवाइसची अजून थोडी माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : 1,24,999 रुपयांचा हा अनोखा Motorola फोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या इतका महाग असण्याचे कारण

NBTC सर्टिफिकेशन मध्ये मोटो XT2095-3 मॉडेल नंबरच्या फोनची जास्त माहिती समोर आली नाही. पण XT2095-1 वेरिएंट FCC वर ऍक्सेसरीज सह लिस्ट केला गेला आहे, ज्यात एसी एडेप्टर, बॅटरी, ईयरफोन, आणि यूएसबी केबल आहे जे बॉक्स सह येतील.

KG40 बॅटरी मॉडेल TUV सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला आहे. यावरून समोर आले आहे कि Moto E7 मध्ये 4,000mAh ची बॅटरी असेल. तसेच फोन मध्ये 5W चार्जिंग सपोर्ट असेल.

हे देखील वाचा : Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus

Moto E7 ची किंमत यूरोपीयन मार्केट मध्ये €120 (जवळपास 10,400 रुपये) असेल. स्मार्टफोन आधी 6.2 इंचाच्या एचडी + एलसीडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह येण्याची अफवा होती. Moto E7 मध्ये मागच्या बाजूला 12MP + 2MP चा डुअल कॅमेरा सेटअप आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा पण दिला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार Motorola Moto E7 मध्ये 2 जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबतच 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. मोटो ई7 4जी एलटीई सह येईल ज्यात 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअपसाठी या डिवायस मध्ये 3,550एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post लॉन्चच्या आधी वेबसाइट वर समोर आला स्वस्त Moto E7 स्मार्टफोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-e7-fcc-nbtc-tuv-certifications-battery-capacity-and-charging-support/feed/ 0
Motorola चा स्वस्त स्मार्टफोन Moto E7 शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-listed-online-full-specs-reveal/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-listed-online-full-specs-reveal/#respond Fri, 16 Oct 2020 14:32:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8554 Moto E7 स्मार्टफोन एका कॅनेडियन रिटेलर साइट वर लिस्ट झाला होता. हि लिस्टिंग एक चूक असल्याचे बोलले जात आहे पण या चुकीमुळे लॉन्चच्या आधीच मोटोरोला मोटो ई7 चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

The post Motorola चा स्वस्त स्मार्टफोन Moto E7 शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपल्या ‘मोटो ई’ सीरीज अंतगर्त Moto E7 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. 5,000एमएएच आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा मोबाईल फोन फक्त 9,499 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. आता असे वाटत आहे कि मोटोरोला या सीरीज मध्ये अजून नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो Moto E7 नावाने येईल. मोटोरोलाने आतापर्यंत या डिवाईसच्या लॉन्चची माहिती दिली नाही पण मोटो ई7 ऑफिशियल होण्याआधी एका शॉपिंग साइट वर फुल स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट झाला आहे.

Moto E7 स्मार्टफोन एका कॅनेडियन रिटेलर साइट वर लिस्ट झाला होता. हि लिस्टिंग एक चूक असल्याचे बोलले जात आहे पण या चुकीमुळे लॉन्चच्या आधीच मोटोरोला मोटो ई7 चे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. फोनच्या फोटो व फीचर्स सोबतच या साइट वर फोनच्या किंमतीचा पण खुलासा करण्यात आला होता. हि लिस्टिंग समोर आल्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे कि मोटोरोला कंपनी आता मोटो ई7 स्मार्टफोन बाजारात लवकरच घेऊन येईल.

Moto E7

मोटोरोला मोटो ई7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करेल. फोन मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिली जाईल ज्यात चारही बेजल्स असतील. या फोनचे डायमेंशन159.8 x 76.6 x 8.7mm आणि वजन 181.2ग्राम असेल.

Moto E7 स्मार्टफोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. लिस्टिंगनुसार या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल तसेच 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी मोटो ई7 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लिस्टिंग मध्ये समोर आले आहे.

Motorola Moto E7 या लिस्टिंग मध्ये 2 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे सोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. मोटो ई7 4जी एलटीई सह येईल ज्यात 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये 3,550एमएएचची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोटो ई7 लिस्टिंग मध्ये अँड्रॉइड 10 ओएस सह दिसला आहे. इथे फोन मधील चिपसेटची माहिती तर समोर आली नाही पण लीक्स मध्ये बोलले जात आहे कि मोटोरोला आपला हा स्वस्त स्मार्टफोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर लॉन्च करेल. Moto E7 इंडियन मार्केट मध्ये कधी येईल या माहितीसाठी थोडी वाट बघावी लागेल.

The post Motorola चा स्वस्त स्मार्टफोन Moto E7 शॉपिंग साइट वर झाला लिस्ट, कमी किंमतीत मिळतील चांगले स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e7-listed-online-full-specs-reveal/feed/ 0