लॉन्चच्या आधी वेबसाइट वर समोर आला स्वस्त Moto E7 स्मार्टफोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री

Motorola ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘मोटो ई’ सीरीज अंतगर्त Moto E7 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. तसेच अनेक दिवसांपासुन माहिती समोर येत आहे कि कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो Moto E7 नावाने येईल. आतापर्यंत या डिवाइसच्या लॉन्चची माहिती दिली नाही. पण मोटो ई7 ऑफिशियल होण्याआधी याची बरीच माहिती समोर आली आहे. तसेच आता Moto E7 मॉडेल नंबर XT2095-3 सह FCC, NBTC आणि TUV सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला आहे.

स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून अफवा येत आहेत. पण आतापर्यंत डिवाइसच्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण या लेटेस्ट सर्टिफिकेशन्स वरून वाटत आहे कि डिवाइस लवकरच लॉन्च होऊ शकतो. 91mobiles ने यावर्षी जुलै मध्ये फोनची एक्सक्लूसिव इमेज शेयर केली होती. तसेच आम्ही Moto E7 च्या यूरपोयिन प्राइसची माहिती दिली होती. आता Moto E7 के FCC, NBTC आणि TUV वर डिवाइसची अजून थोडी माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : 1,24,999 रुपयांचा हा अनोखा Motorola फोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या इतका महाग असण्याचे कारण

NBTC सर्टिफिकेशन मध्ये मोटो XT2095-3 मॉडेल नंबरच्या फोनची जास्त माहिती समोर आली नाही. पण XT2095-1 वेरिएंट FCC वर ऍक्सेसरीज सह लिस्ट केला गेला आहे, ज्यात एसी एडेप्टर, बॅटरी, ईयरफोन, आणि यूएसबी केबल आहे जे बॉक्स सह येतील.

KG40 बॅटरी मॉडेल TUV सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला आहे. यावरून समोर आले आहे कि Moto E7 मध्ये 4,000mAh ची बॅटरी असेल. तसेच फोन मध्ये 5W चार्जिंग सपोर्ट असेल.

हे देखील वाचा : Motorola ने लॉन्च केला 5,000एमएएच बॅटरी आणि 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला पावरफुल स्मार्टफोन Moto G9 Plus

Moto E7 ची किंमत यूरोपीयन मार्केट मध्ये €120 (जवळपास 10,400 रुपये) असेल. स्मार्टफोन आधी 6.2 इंचाच्या एचडी + एलसीडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह येण्याची अफवा होती. Moto E7 मध्ये मागच्या बाजूला 12MP + 2MP चा डुअल कॅमेरा सेटअप आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा पण दिला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार Motorola Moto E7 मध्ये 2 जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबतच 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. मोटो ई7 4जी एलटीई सह येईल ज्यात 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअपसाठी या डिवायस मध्ये 3,550एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here