स्वस्त Moto E7 लवकरच होऊ शकतो भारतात लाॅन्च, पण नावात होऊ शकतो मोठा बदल

Lenovo ने काही दिवसांपूर्वी चीनी बाजारात आपला कमी किंमत असलेला स्मार्टफोन Lenovo K12 लाॅन्च केला होता. तसेच दुसरीकडे लेनोवो द्वारे अधिकृत Motorola ने पण यूरोप मध्ये लो बजेट स्मार्टफोन Moto E7 आणला होता. या दोन्ही ब्रँड्सने आपल्या फोनच्या इंडिया लाॅन्च बद्दल सध्या कोणतीही माहिती दिली नाही. पण एका ताजा रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि मोटोरोला कंपनी लवकरच भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये मोटो ई7 स्मार्टफोन लाॅन्च करू शकते आणि लीकनुसार मोटोरोलाचा हा फोन लेनोवो के12 नावाने बाजारात उपलब्ध होईल.

Motorola संबंधित हि बातमी टिपस्टर सुधांशूने शेयर केली आहे. या टिपस्टरने Lenovo K12 स्मार्टफोनच्या रेंडर इंटरनेट वर अपलोड केले आहेत जे लुक आणि डिजाईन मध्ये पूर्णपणे मोटो ई7 स्मार्टफोन सारखे आहेत. रेंडर ईमेज शेयर करण्यासोबतच लीक मध्ये दावा केला गेला आहे कि लेनोवो के12 चा जो मॉडेल चीनच्या बाहेर ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च केला जाईल तसेच यूरोप मध्ये लाॅन्च झाले Moto E7 स्मार्टफोनचा रिब्रँडिड वर्जन असेल. हा फोन भारतीय बाजारात कधी एंट्री घेईल हे समजले नाही.

Moto E7

मोटो ई7 पाहता हा फोन को वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर सादर केला गेला आहे, ज्यात रुंद चिन असलेला नॅरो बेजल्स डिस्प्ले देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मध्यभागी चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली Motorola लोगो असलेला रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. मोटो ई7 स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे.

हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन

कंपनीने फोटोग्राफीसाठी Moto E7 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात पहला 48MP चा प्राइमरी सेंसर आणि दुसरी 2MP ची मॅक्रो लेंस आहे. सोबतच या हँडसेट मध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फीचर पाहता मोटो ई7 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सह येते. तसेच फोन कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.0, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारख्या फीचरला सपोर्ट मिळाला आहे.

Moto E7 स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आहे. तसेच मोटो ई7 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसर, 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो एसडी कार्डची जागा देण्यात आली आहे. Moto E7 स्मार्टफोन यूरोप मध्ये 119.99 यूरो (जवळपास 10,550 रुपये) आहे. हा डिवाइस ग्राहकांसाठी Aqua Blue, Mineral Gray आणि Satin Coral कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here