Moto G40 Fusion - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 20 Apr 2021 11:45:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto G40 Fusion स्मार्टफोन Snapdragon 732G SoC आणि 6000mAh सह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/moto-g40-fusion-price-in-india-revealed-check-specification-sale-offers-and-all-features/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g40-fusion-price-in-india-revealed-check-specification-sale-offers-and-all-features/#respond Tue, 20 Apr 2021 11:45:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10645 मोटोरोलाच्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G40 Fusion स्मार्टफोनची डिजाइन पाहता हा मोटोरोलाच्या Moto G 5G सारखा आहे. पण बॅक पॅनल आणि कॅमेरा मॉड्यूलमध्ये कंपनीने बदल केला आहे.

The post Moto G40 Fusion स्मार्टफोन Snapdragon 732G SoC आणि 6000mAh सह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये गेले काही दिवस खूप आक्रमकरीत्या फोन लॉन्च करत आहे. मोटोरोलाने भारतात Moto G सीरीजचे दोन स्मार्टफोन Moto G60 आणि Moto G40 Fusion स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बजेट प्राइस सेगमेंटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर केले गेले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीने क्वालकॉमच्या Snapdragon 732G चिपसेटसह सादर केले आहेत. मोटोरोलाचे दोन्ही स्मार्टफोन लेटेस्ट Android 11 चिपसेटसह सादर केले गेले आहेत. इथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या लेटेस्ट Moto G40 Fusion स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर आणि किंमतीबाबत सांगणार आहोत. (Moto G40 Fusion price in India revealed check specification sale offers and all features)

Moto G40 Fusion : डिजाइन आणि डिस्प्ले

मोटोरोलाच्या लेटेस्ट स्मार्टफोन Moto G40 Fusion स्मार्टफोनची डिजाइन पाहता हा मोटोरोलाच्या Moto G 5G सारखा आहे. पण बॅक पॅनल आणि कॅमेरा मॉड्यूलमध्ये कंपनीने बदल केला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह येतो, त्यामुळे हा थोडा जाडा वाटत आहे. फ्रंटला पाहता सेल्फीसाठी पंच होल कटआउट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : BSNL चा सर्वात स्वस्त प्लान! फक्त 13 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 2GB डेटा, Jio-Airtel कडे पण नाही याचे उत्तर

Moto G40 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा मॅक्स विजन डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. मोटोरोलानुसार या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला डिस्प्ले HDR10 कॉम्पेटिबल आहे जो युजर्सना शानदार व्यूविंग एक्सपीरियंस देतो.

Moto G40 Fusion : स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Moto G40 Fusion स्मार्टफोनची परफॉर्मन्स पाहता हा फोन क्वालकॉमच्या Snapdragon 732G चिपसेटसह सादर केला गेला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजच्या दोन वेरिएंट्समध्ये सादर केला गेला आहे. Moto G40 Fusion स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे कि हा 54 तासांचा बॅकअप ऑफर करतो. तसेच युजर्सच्या डेटा सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये Think Shield ची सुरक्षा देण्यात आली आहे. Moto G40 Fusion स्मार्टफोन लेटेस्ट Android 11 वर चालतो.

हे देखील वाचा : लो बजेट असलेला पावरफुल Poco M2 Reloaded भारतात लॉन्चसाठी तयार, किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी

कनेक्टिविटी पाहता मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये Hybrid Dual SIM (नॅनो सिम+नॅनो सिम किंवा माइक्रो एसडी कार्ड) स्लॉट, 3.5mm हेडसेट जॅक, चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी Type C पोर्ट (USB 2.0), Bluetooth® 5.0, WiFi आणि NFC देण्यात आले आहेत.

Moto G40 Fusion : कॅमेरा

Moto G40 Fusion स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या बॅक पॅनलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश दिला आहे. या स्मार्टफोनचा प्राइमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे, तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड कॅमेरा लेंस देण्यात आली आहे जो मॅक्रो फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच तिसरा कॅमेरा सेंसर डेप्थ सेंसर आहे. फ्रंट कॅमेरा सेंसर पाहता Moto G40 Fusion स्मार्टफोन 16 मेगापिक्सलचा आहे.

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये डुअल कॅप्चर मोड देण्यात आला आहे. तसेच नाइट विजन, पोर्टेट आणि AI शॉट ऑप्टिमाइजेशन, प्रो मोड, टाइमलॅप्स आणि स्लो मोशन, पॅनोरोमा सारखे कॅमेरा फीचर देण्यात आले आहेत.

Moto G40 Fusion : किंमत

Moto G40 Fusion स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. लॉन्च ऑफर पाहता मोटोरोलाच्या या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन विक्रीसाठी 1 मेला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर येईल. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन डायनेमिक ब्लू आणि फॉरेस्टेड शॅम्पेनमध्ये सादर केला गेला आहे.

The post Moto G40 Fusion स्मार्टफोन Snapdragon 732G SoC आणि 6000mAh सह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g40-fusion-price-in-india-revealed-check-specification-sale-offers-and-all-features/feed/ 0
Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-moto-g40-fusion-india-launch-on-20th-april-108mp-camera-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-moto-g40-fusion-india-launch-on-20th-april-108mp-camera-6000mah-battery/#respond Fri, 16 Apr 2021 12:55:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10610 मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत एकसारखे आहेत.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने अलीकडेच सांगितले होते कि कंपनी भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे जे Moto G60 आणि Moto G40 Fusion नावाने भारतात लॉन्च केले जातील. तसेच आज ‘जी’ सीरीजमध्ये जोडल्या जाणाऱ्या या मोबाईल फोन्सची लॉन्च डेट पण समोर आली आहे. मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन येत्या 20 एप्रिलला भारतात लॉन्च केले जातील. हा मोबाईल फोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरी आणि 108मेगापिक्सलच्या ताकदवान कॅमेऱ्याला सपोर्ट करतील. (Motorola Moto G60 and Moto G40 Fusion India launch on 20th April 108mp camera 6000mah battery)

Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या लॉन्चची माहिती शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून समोर आली आहे. फ्लिपकार्टवर मोटोरोलाच्या आगामी स्मार्टफोन्सचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे ज्याच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे कि हे दोन्ही मोबाईल फोन 20 एप्रिल दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च केले जातील. या प्रोडक्ट पेजवर मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजनच्या फोटो सोबतच यांच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण करण्यात आला आहे त्यामुळे लॉन्चपूर्वी Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या ताकदीचा अंदाज लागला आहे.

असा असेल लुक

मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत एकसारखे आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सचा पंच होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे ज्यात होल स्क्रीनच्या वर मध्यभागी देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा तर बेजल लेस आहेत पण खाली चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात कॅमेरा सेंसर स्क्रीनच्या वर आलेला आहे आणि वर्टिकल शेपमध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनलवर Moto लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो. राईट पॅनलवर वाल्यूम रॉकर आणि पावर बटणसह एक एक्स्ट्रा बटण पण देण्यात आला आहे जो गुगल असिस्टंट बटण असू शकतो.

हे देखील वाचा : Realme 8 5G फोन 22 एप्रिलला होईल भारतात लॉन्च

असे असतील स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाने सांगितले आहे कि Moto G60 आणि Moto G40 Fusion 6.8 इंचाच्या मोठ्या एचडीआर स्क्रीनवर लॉन्च केले जातील जे 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हे दोन्ही मोबाईल फोन अँड्रॉइड 11 च्या स्टॉक वर्जनसह बाजारात येतील तसेच प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट दिला जाईल. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी असल्याची पुष्टी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी हे मोबाईल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतील. यातील Moto G60 च्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 8 मेगापिक्सल वाइड अँगल + 8 मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली जाईल. तसेच Moto G40 Fusion च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा दिला जाईल. सेल्फीसाठी मोटो जी60 फोन 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion भारतात 20 एप्रिलला होतील लॉन्च, मिळेल 108MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-moto-g40-fusion-india-launch-on-20th-april-108mp-camera-6000mah-battery/feed/ 0
Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-g40-fusion-india-launch-soon-with-snapdragon-732g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-g40-fusion-india-launch-soon-with-snapdragon-732g-soc/#respond Mon, 12 Apr 2021 13:10:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10570 Moto G60 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे. तसेच दुसरीकडे Moto G40 Fusion बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बाबत गेल्या आठवड्यातच एक बातमी आली होती कि लेनोवो अधिकृत हि कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. लीकमध्ये सांगण्यात आले होते कि हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या ‘जी’ सीरीजमध्ये जोडले जातील ज्यातील एकाचे नाव Moto G100 असू शकते. आता या मोबाईल फोन्सबद्दल नवीन अपडेट आला आहे ज्यात दावा केला गेला आहे हे दोन्ही मोटोरोला फोन भारतात Moto G60 आणि Moto G40 Fusion नावाने लॉन्च केले जातील. (Motorola Moto G60 and G40 fusion India launch soon with Snapdragon 732G soc)

Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने शेयर केली आहे. विशेष म्हणजे याच टिपस्टरने मागे मोटोरोला भारतात नवीन फोन लॉन्च करणार आहे अशी बातमी दिली होती. तसेच आता मुकुलने फोन्सच्या नावाचा खुलासा केला आहे. मोटोरोला इंडियाने अजूनतरी आपल्या नवीन प्रोडक्ट्स व लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण लीकनुसार मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लवकरच भारतीय बाजारात येतील. आशा आहे कि एप्रिलच्या शेवटपर्यंत हे फोन भारतात उपलब्ध होतील.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

फोन्सच्या नावांसोबत Moto G60 आणि Moto G40 Fusion चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण टिपस्टरने शेयर केले आहेत. टिप मिळाली आहे कि मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन दोन्ही स्मार्टफोन्स क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेटसह बाजारात येतील. तसेच लीकमध्ये सांगण्यात आले आहे कि मोटो जी60 मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल तसेच अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि मॅक्रो लेंस पण मिळेल.

Moto G60 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे. तसेच दुसरीकडे Moto G40 Fusion बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच हा मोबाईल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोन्समध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची बॅटरी असल्याचे पण लीकमध्ये सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन

Motorola ने आतापर्यंत भारतात आपले नवीन फोन लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे Moto G60 आणि Moto G40 Fusion कधी देशात लॉन्च होतील यासाठी कोणतीही टाईमलाईन मिळाली नाही. आशा आहे कि मोटोरोला येत्या काही दिवसांत आपला नवीन लॉन्च टीज करायला सुरुवात करेल आणि पुन्हा फोनची लॉन्च डेट पण घोषित करेल.

The post Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g60-and-g40-fusion-india-launch-soon-with-snapdragon-732g-soc/feed/ 0