लो बजेट असलेला पावरफुल Poco M2 Reloaded भारतात लॉन्चसाठी तयार, किंमत असेल 10 हजारांपेक्षा कमी

Poco भारतात आपल्या ग्राहकांसाठी लेटेस्ट स्मार्टफोन पोको एम2 रीलोडेड लॉन्च करणार आहे. या नवीन वेरिएंटच्या लॉन्चची माहिती कंपनीने ऑफिशियल ट्विटरवर दिली आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर वेगळे पेज तयार करण्यात आले आहे ज्यात लॉन्च तारीख समोर आली आहे. फक्त लॉन्च डेट नव्हे तर, फ्लिपकार्टवर बनलेल्या पेजवरून हँडसेटमध्ये मिळणाऱ्या चिपसेट आणि त्याचबरोबर उपलब्धतेबाबत पण माहिती मिळाली आहे. लक्षात असू दे कि कंपनीने भारतात पोको एम2 गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सादर केला होता. (Poco M2 reloaded India launch date April 21 sale Flipkart)

Poco M2 Reloaded लॉन्च डेट

पोको एम2 रीलोडेड स्मार्टफोन भारतात ग्राहकांसाठी 21 एप्रिल 2021 दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. जर तुम्हाला या फोनचा लॉन्च बघायचा असेल तर कंपनी याची सोय आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर करेल. तुम्ही पोकोच्या यूट्यूब, ट्विटर आणि फेसबुकवर या फोनचा लाइव लॉन्च बघता येईल.

Poco M3 Reloaded ची उपलब्धता

उपलब्धता पाहता, हँडसेटचा सेल त्याच दिवशी म्हणजे 21 एप्रिल दुपारी 3 वाजता सुरु होईल. हे आधीच स्पष्ट झाले आहे कि फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर केली जाईल. पण किंमतीबाबत अजूनही ऑफिशियल माहिती मिळाली नाही.

हे देखील वाचा : Realme Q3 Pro मध्ये असतील हे शानदार फीचर्स, 22 एप्रिलला होईल लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी?

Poco M3 Reloaded चे स्पेसिफिकेशन्स

Poco M2 Reloaded स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G80 SoC चा वापर केला जाईल. याची माहिती फ्लिपकार्टवरून समोर आली आहे. लीकनुसार या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. पोको एम2 रिलोडेडची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Poco M2 Reloaded ची डिजाइन

फ्लिपकार्टवर समोर आलेल्या फोटोज नुसार POCO M2 Realoaded कंपनी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लॉन्च करेल, ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट असेल. तसेच फोनच्या मागे वर्टिकल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये कंपनी पोको एम2 प्रमाणेच क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल.

हे देखील वाचा : BSNL चा सर्वात स्वस्त प्लान! फक्त 13 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 2GB डेटा, Jio-Airtel कडे पण नाही याचे उत्तर

Poco M2

POCO M2 पाहता फोन दोन रॅम वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. किंमत पाहता पोको एम2 चा 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी मेमरी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

शाआोमी पोको एम2 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here