टेलीकॉम कंपन्यांमध्ये कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स असलेले प्लान सादर करण्याची शर्यत सुरु आहे. या शर्यतीत खाजगी कंपनी Jio, Airtel आणि Vi सोबतच बीएसएनएल पण सामील आहे. BSNL कडे असे अनेक स्वस्त प्लान आहेत ज्यांचा तोड जियो आणि एयरटेलकडे पण नाही. जर तुम्ही पण BSNL युजर असाल आणि एका किफायतशीर आणि फायदेशीर प्लानचा शोध घेत असाल तर आज आम्ही तुम्हाला सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलच्या 15 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानची माहिती देणार आहोत. BSNL चा सर्वात किफायतशीर रिचार्ज प्लान 13 रुपयांचा आहे, आणि यात मिळणार बेनिफिट्स जाणून तुम्ही हैराण व्हाल. चला जाणून घेऊया या प्लानबाबत सर्वकाही. (BSNL recharge plan of 13 Rupees get 2GB data)
BSNL चा 13 रुपयांच्या प्लान
BSNL चा 13 रुपयांचा रिचार्ज प्लान पाहता यात ग्राहकांना 2GB इंटरनेट डेटा मिळतो. विशेष म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज पॅकची वॅलिडिटी फक्त 1 दिवस आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्हाला 1 दिवसासाठी 2जीबी डेटा मिळतो. तसेच प्लानमध्ये कोणताही फायदा मिळत नाही.
हे देखील वाचा : Xiaomi Mi 11X सीरीज आणि Mi 11 Ultra लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या RAM आणि स्टोरेज क्षमता
BSNL चा 249 रुपयांचा प्लान
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा लाभ दिला जात आहे. त्याचबरोबर युजर्सना या प्लानमध्ये 60 दिवसांची वैधता मिळते. इतकेच नव्हे तर युजर्सना प्रतिदिन 1GB डेटा मिळेल. या हिशोबाने युजर्सना एकूण या प्लानमध्ये 60GB डेटा मिळतो. युजर्सना रोज 100 SMS ची सुविधा मिळते.
हे देखील वाचा : Realme Q3 Pro मध्ये असतील हे शानदार फीचर्स, 22 एप्रिलला होईल लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी?
BSNL चा 298 रुपयांचा प्लान
BSNL च्या 298 रुपयांच्या STV प्लानबद्दल बोलायचे तर या प्लानमध्ये पण 249 रुपयांच्या प्लान प्रमाणेच बेनिफिट्स मिळत आहेत. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगच्या सुविधेसह डेली 1GB डेटा मिळत आहे. तसेच रोज 100SMS ची सुविधा मिळते. या प्लानवर 56 दिवसांची वैधता मिळत आहे. इतकेच नव्हे तर युजर्सना या प्लानमध्ये Eros Now चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. जास्त वैधतेमुळे BSNL च्या 249 रुपयांच्या प्लानमध्ये Eros Now चे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार नाही.















