Motorola One Macro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 09 Oct 2019 11:33:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी असलेला Motorola One Macro https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-macro-launched-india-price-rs-9999-sale-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-macro-launched-india-price-rs-9999-sale-specifications-feature/#respond Wed, 09 Oct 2019 11:33:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5488 हा फोन 9999 रुपयांमध्ये येत्या 12 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Motorola One Macro स्पेस ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी असलेला Motorola One Macro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात लो बजेट स्मार्टफोन Moto E6s लॉन्च केला होता. या फोन सोबत कंपनीने स्मार्ट टीवी मार्केट मध्ये पाऊल टाकत आपली नवीन टीवी रेंज सादर केली होती. आज पुन्हा भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Motorola ने अजून एक नवीन डिवाईस Motorola One Macro पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 9999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे जो 12 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन

Motorola One Macro वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे. डिस्प्ले दोन्ही बाजूनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर ‘यू’ शेप नॉच आहे. Motorola One Macro च्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप डावीकडे देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एक सेंसर वर वेगळा देण्यात आला आहे तर इतर सेंसर आणि फ्लॅश, सेटअप मधेच आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे. त्याचप्रमाणे पावर बटण आणि वाल्यूम रॉकर फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

Motorola One Macro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.2 इंचाच्या एचडी+ मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Motorola One Macro मध्ये माली जी72 जीपीयू आहे.

Motorola One Macro कंपनीने ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तेवढ्याच अपर्चरची 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Motorola One Macro एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola One Macro डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Motorola One Macro मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन आईपीएक्स2 रेटेड आहे, ज्यामुळे हा धूळ आणि पाण्यापासून वाचतो.

Motorola One Macro भारतात 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे, ज्याची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन 9999 रुपयांमध्ये येत्या 12 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Motorola One Macro स्पेस ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी असलेला Motorola One Macro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-macro-launched-india-price-rs-9999-sale-specifications-feature/feed/ 0
Exclusive: Motorola One Macro पुढल्या आठवड्यात भारतात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-macro-india-launch-scheduled-for-next-week-with-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-macro-india-launch-scheduled-for-next-week-with-triple-rear-camera/#respond Tue, 01 Oct 2019 12:19:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5455 अपकमिंग मोटोरोला वन मार्को ची किंमत SAR 899 (जवळपास 17,000 रुपये) असू शकते.

The post Exclusive: Motorola One Macro पुढल्या आठवड्यात भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola पुढल्या आठवड्यात भारतीय बाजारात Motorola One Marco स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 91मोबाईल्सला हि माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून इंटरनेट वर माहिती समोर येत होती. काही दिवसांपूर्वी फोनची लाइव इमेज लीक झाली होती. या इमेज मधून फोनच्या डिजाइनचा अंदाज मिळाला होता.

तसेच सौदी अरेबियातील ई-कॉमर्स वेबसाइट Extra.com वर फोनची किंमत समोर आली आहे. जरी याची किंमत काढून टाकण्यात आली असली तरी अपकमिंग मोटोरोला वन मार्को ची किंमत SAR 899 (जवळपास 17,000 रुपये) असू शकते.

Extra.com च्या मदतीने आम्हाला फोनचे नवीन रेंडर्स मिळाले आहेत. तुम्ही फोटो बघून अंदाज लावू शकता कि Motorola One Macro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश असेल. तसेच मागे मोटो लोगो मध्ये फिंगरप्रिंट सेंसर असेल. डिवाइस वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सह सादर केला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर व पावर बटण असेल.

काही दिवसांपूर्वी हा फोन एफसीसी वर दिसला होता. लिस्टिंग नुसार Motorola One Macro 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. चर्चा अशी आहे कि Motorola One Macro मीडियाटेक हेलीयो चिपसेट वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये हेलीयो पी60 किंवा हेलीयो पी70 चिपसेट असू शकतो.

Motorola One Macro बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते आणि फोन मध्ये 32जीबी मेमरी तसेच 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. पावर बॅकअप साठी Motorola One Macro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. एफसीसी लिस्टिंग मध्ये हा फोन एनएफसी, डुअल सिम, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि एलटीई बॅंड सह दाखवण्यात आला आहे.

The post Exclusive: Motorola One Macro पुढल्या आठवड्यात भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-macro-india-launch-scheduled-for-next-week-with-triple-rear-camera/feed/ 0