Exclusive: Motorola One Macro पुढल्या आठवड्यात भारतात होईल लॉन्च

Motorola पुढल्या आठवड्यात भारतीय बाजारात Motorola One Marco स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 91मोबाईल्सला हि माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून इंटरनेट वर माहिती समोर येत होती. काही दिवसांपूर्वी फोनची लाइव इमेज लीक झाली होती. या इमेज मधून फोनच्या डिजाइनचा अंदाज मिळाला होता.

तसेच सौदी अरेबियातील ई-कॉमर्स वेबसाइट Extra.com वर फोनची किंमत समोर आली आहे. जरी याची किंमत काढून टाकण्यात आली असली तरी अपकमिंग मोटोरोला वन मार्को ची किंमत SAR 899 (जवळपास 17,000 रुपये) असू शकते.

Extra.com च्या मदतीने आम्हाला फोनचे नवीन रेंडर्स मिळाले आहेत. तुम्ही फोटो बघून अंदाज लावू शकता कि Motorola One Macro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश असेल. तसेच मागे मोटो लोगो मध्ये फिंगरप्रिंट सेंसर असेल. डिवाइस वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सह सादर केला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम रॉकर व पावर बटण असेल.

काही दिवसांपूर्वी हा फोन एफसीसी वर दिसला होता. लिस्टिंग नुसार Motorola One Macro 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. चर्चा अशी आहे कि Motorola One Macro मीडियाटेक हेलीयो चिपसेट वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये हेलीयो पी60 किंवा हेलीयो पी70 चिपसेट असू शकतो.

Motorola One Macro बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते आणि फोन मध्ये 32जीबी मेमरी तसेच 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. पावर बॅकअप साठी Motorola One Macro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. एफसीसी लिस्टिंग मध्ये हा फोन एनएफसी, डुअल सिम, रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि एलटीई बॅंड सह दाखवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here