Mukesh Ambani - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Feb 2023 12:51:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं https://www.91mobiles.com/marathi/ipl-free-on-jio-cinema-but-ambani-makes-money-from-mobile-data-cost/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-free-on-jio-cinema-but-ambani-makes-money-from-mobile-data-cost/#respond Thu, 23 Feb 2023 03:39:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18069 यंदा IPL 2023 च्या सर्व सामान्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमाच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आनंदले आहेत कारण यंदा आयपीएलसाठी कोणतंही सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार नाही आणि सर्व सामने मोफत बघता येतील. परंतु तुम्हाला माहित आहे का जरी प्रेक्षकांनी वेगळं सब्सक्रिप्शन घेतलं नाही आणि फ्री आयपीएल मॅच पहिल्या तरी यातून देखील Ambani कोट्यवधी कमवणार […]

The post Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इंडियन प्रीमियर लीग 2023 चं प्रसारण जियो सिनेमावरून केलं जाईल.
  • आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला होईल.
  • फोनवर 4K क्वॉलिटीमध्ये आयपीएल मॅच पाहता येईल.

यंदा IPL 2023 च्या सर्व सामान्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमाच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आनंदले आहेत कारण यंदा आयपीएलसाठी कोणतंही सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार नाही आणि सर्व सामने मोफत बघता येतील. परंतु तुम्हाला माहित आहे का जरी प्रेक्षकांनी वेगळं सब्सक्रिप्शन घेतलं नाही आणि फ्री आयपीएल मॅच पहिल्या तरी यातून देखील Ambani कोट्यवधी कमवणार आहेत. पुढे आम्ही तुम्हाला हे कसं शक्य आहे याची माहिती दिली आहे.

एक मॅच बघण्यासाठी खर्च करावे लागतील 28 रुपये

इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार 3 तासांचा सामना मोबाइलवर बघण्यासाठी प्रेक्षकांना कमीत कमी 2 जीबी डेटा खर्च करावा लागेल. भारतात जरी जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन्स असले तरी एक जीबी डेटाची किंमत जवळपास 14 रुपये आहे. याचा अर्थ असा की जियो सिनेमा अ‍ॅपवर एक लाइव्ह मॅच बघण्यासाठी युजर्सना 28 रुपये खर्च करावे लागतील. हे देखील वाचा: हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय

एकूण 70 लीग सामने आणि चार प्लेऑफ सामने 52 दिवसांत खेळवले जातील. याचा अर्थ असा की मोबाइल किंवा कनेक्टेड टीव्हीवर सर्व 74 सामने बघण्यासाठी 2,072 रुपयांचा डेटा युजर्सना लागेल. तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या ताज्या ग्राहक आकडेवारीनुसार, रिलायन्स जियोकडे सक्रिय ग्राहकांची संख्या जवळपास 425 मिलियन आहे. यावरून तुम्ही देखील हिशोब करू शकता की या सर्व ग्राहकांनी एक सामना जरी पहिला तरी डेटावर 11,900 मिलियन रुपये खर्च केले जातील. वायकॉम18 मीडिया नेटवर्क आपल्या मोफत आयपीएलच्या माध्यमातून 500 मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार Jio च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला सर्व युजर मोबाइल फोनवर आयपीएलचा संपूर्ण सामना बघतील असं अपेक्षित नाही. सरासरी लोक एक तासापेक्षा कमी काळ सामना बघतात, ज्यासाठी वरवर 0.5 जीबी डेटा आवश्यक असतो. एवढा डेटा सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सच्या बहुतांश डेटा प्लॅनमध्ये असतो.”

jio 5g works on 4g sim

वायकॉम18 च्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “टेलीकॉम कंपन्या विशेष प्रचार करून आयपीएलच्या काळात स्वस्त डेटा प्लॅन सादर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” परंतु अद्याप जियो किंवा एयरटेलनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

The post Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-free-on-jio-cinema-but-ambani-makes-money-from-mobile-data-cost/feed/ 0
Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-service-launched-by-mukesh-ambani-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-service-launched-by-mukesh-ambani-in-india/#respond Mon, 29 Aug 2022 09:30:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12576 5G in India : 5जी इन इंडियाचं स्वप्न आता लवकरच सत्यात येणार आहे. याआधी आलेल्या बातम्यांनुसार, Reliance Jio नं आपल्या 45th Annual General Meeting (RIL) मध्ये Jio 5G Service जगासमोर ठेवली आहे. 5G Network ची घोषणा रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानींनी केली आहे आणि आता लवकरच मोबाइल युजर्सना सुपर फास्ट 5G Internet मिळणार आहे. कंपनीनं आपल्या […]

The post Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G in India : 5जी इन इंडियाचं स्वप्न आता लवकरच सत्यात येणार आहे. याआधी आलेल्या बातम्यांनुसार, Reliance Jio नं आपल्या 45th Annual General Meeting (RIL) मध्ये Jio 5G Service जगासमोर ठेवली आहे. 5G Network ची घोषणा रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानींनी केली आहे आणि आता लवकरच मोबाइल युजर्सना सुपर फास्ट 5G Internet मिळणार आहे. कंपनीनं आपल्या 5जी रोलआउटला Jio True 5G असं नाव दिलं आहे.

Mukesh Amabni यांनी घोषणा करताना सांगितलं आहे की यंदा दिवाळीत देशात Jio 5G Network नेटवर्क सुरु करण्यात येईल. रिलायन्स जियो आपली 5जी सर्व्हिस सर्वप्रथम देशातील चार महानगर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सुरु करेल आणि त्यानंतर भारतभर 5जी पोहोचवण्यात येईल. अंबानींनी स्पष्ट केलं आहे की, कंपनीचं 5जी नेटवर्क देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गावापर्यंत पोहोचेल आणि जगातील सर्वात मोठं नेटवर्क असेल.

Jio True 5G

Reliance Jio देशात 5G लाँचसाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 5G च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आणि यामुळे होणाऱ्या फायद्यांची आणि बदलांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की कंपनी 5G चा वापर ब्रॉडबँडसाठी करत आहे आणि हे जगातील सर्वात मोठं आणि प्रभावशाली 5G नेटवर्क असेल.

Jio 5G Service

मुकेश अंबानींनी सांगितलं आहे की अन्य कंपन्या उपलब्ध असलेल्या 4G नेटवर्कमध्ये सुधारणा करून 5G सेवा देण्याचा दावा नॉन-स्टॅन्ड-अलोन पद्धतीनं करत आहेत, परंतु ते सच्चा 5G अनुभव देऊ शकणार नाहीत. तसेच त्यांनी सांगितलं की की जियो स्टॅन्ड-अलोन 5G सेवा घेऊन येत आहे, जी मशीन टू मशीन कन्वर्सेशन किंवा लो-लेटेंसी सारखे फायदे देईल.

कंपनीनं 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वात जास्त 5जी स्पेक्ट्रम मिळवलं असल्याची आठवण देखील मुकेश अंबानींनी करून दिली. रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपये देऊन 24,740 MHz 5G spectrum ताब्यात घेतलं आहे. Jio च्या 5G Bands मध्ये 26 GHz High frequency band तर आहेच त्याचबरोबर या कंपनीनं सर्वात शक्तिशाली व दूरवर रेंज देणारा 700 MHz 5G Band देखील मिळवला आहे. 700 MHz 5G Band या सर्व्हिसचा प्रसार करण्यासाठी खूप महत्वाचं आहे, जे फक्त रियालायन्स जियोकडे आहे. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

तसेच कंपनी कॅरियर अ‍ॅग्रीगेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून 5G नेटवर्कची ताकद वाढवणार आहे. स्टॅन्ड अलोन 5G, जास्त स्पेक्ट्रम आणि कॅरियर अ‍ॅग्रीगेशन ही जियोच्या दिवाळीत लाँच होणाऱ्या 5G नेटवर्कची खासियत असेल, असं देखील कंपनीच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आलं आहे.

The post Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-service-launched-by-mukesh-ambani-in-india/feed/ 0