Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान

5G in India : 5जी इन इंडियाचं स्वप्न आता लवकरच सत्यात येणार आहे. याआधी आलेल्या बातम्यांनुसार, Reliance Jio नं आपल्या 45th Annual General Meeting (RIL) मध्ये Jio 5G Service जगासमोर ठेवली आहे. 5G Network ची घोषणा रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानींनी केली आहे आणि आता लवकरच मोबाइल युजर्सना सुपर फास्ट 5G Internet मिळणार आहे. कंपनीनं आपल्या 5जी रोलआउटला Jio True 5G असं नाव दिलं आहे.

Mukesh Amabni यांनी घोषणा करताना सांगितलं आहे की यंदा दिवाळीत देशात Jio 5G Network नेटवर्क सुरु करण्यात येईल. रिलायन्स जियो आपली 5जी सर्व्हिस सर्वप्रथम देशातील चार महानगर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सुरु करेल आणि त्यानंतर भारतभर 5जी पोहोचवण्यात येईल. अंबानींनी स्पष्ट केलं आहे की, कंपनीचं 5जी नेटवर्क देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गावापर्यंत पोहोचेल आणि जगातील सर्वात मोठं नेटवर्क असेल.

Jio True 5G

Reliance Jio देशात 5G लाँचसाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 5G च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आणि यामुळे होणाऱ्या फायद्यांची आणि बदलांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की कंपनी 5G चा वापर ब्रॉडबँडसाठी करत आहे आणि हे जगातील सर्वात मोठं आणि प्रभावशाली 5G नेटवर्क असेल.

Jio 5G Service

मुकेश अंबानींनी सांगितलं आहे की अन्य कंपन्या उपलब्ध असलेल्या 4G नेटवर्कमध्ये सुधारणा करून 5G सेवा देण्याचा दावा नॉन-स्टॅन्ड-अलोन पद्धतीनं करत आहेत, परंतु ते सच्चा 5G अनुभव देऊ शकणार नाहीत. तसेच त्यांनी सांगितलं की की जियो स्टॅन्ड-अलोन 5G सेवा घेऊन येत आहे, जी मशीन टू मशीन कन्वर्सेशन किंवा लो-लेटेंसी सारखे फायदे देईल.

कंपनीनं 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वात जास्त 5जी स्पेक्ट्रम मिळवलं असल्याची आठवण देखील मुकेश अंबानींनी करून दिली. रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपये देऊन 24,740 MHz 5G spectrum ताब्यात घेतलं आहे. Jio च्या 5G Bands मध्ये 26 GHz High frequency band तर आहेच त्याचबरोबर या कंपनीनं सर्वात शक्तिशाली व दूरवर रेंज देणारा 700 MHz 5G Band देखील मिळवला आहे. 700 MHz 5G Band या सर्व्हिसचा प्रसार करण्यासाठी खूप महत्वाचं आहे, जे फक्त रियालायन्स जियोकडे आहे. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

तसेच कंपनी कॅरियर अ‍ॅग्रीगेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून 5G नेटवर्कची ताकद वाढवणार आहे. स्टॅन्ड अलोन 5G, जास्त स्पेक्ट्रम आणि कॅरियर अ‍ॅग्रीगेशन ही जियोच्या दिवाळीत लाँच होणाऱ्या 5G नेटवर्कची खासियत असेल, असं देखील कंपनीच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here